एक्स्प्लोर

मोबाईल रिपेअर करणाऱ्या पठ्ठ्याने मुख्यमंत्र्यांना हरवलं, चरणजीत चन्नींचा चरणजीत चन्नींकडून पराभव!

Punjab Election Result 2022 : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांना दोन्ही जागांवर पराभवाचा धक्का बसला आहे. पंजाबमधील जनतेने आप पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे.

Punjab Election Result 2022 : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांना दोन्ही जागांवर पराभवाचा धक्का बसला आहे. पंजाबमधील जनतेने आप पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. केजरीवाल यांच्या आपच्या त्सुनामीमध्ये काँग्रेस आणि भाजपसह इतर स्थानिक पक्षांच्या नौका बुडाल्या आहेत. धक्कादायक म्हणजे, विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी दोन्ही जागांवर पराभवाचा धक्का बसला आहे. 

रिपेअरचं काम करणाऱ्याने हरवले -
चरणजीत सिंह चन्नी यांना चमकौर साहिब आणि भदौर या दोन्ही जागांवर पराभवाचा धक्का बसला आहे. भदौर मतदारसंघातून आपच्या लाभ सिंह उगाके यांनी चरणजीत सिंह यांचा पराभव केला आहे. ते फक्त 12 वी पास आहेत. लाभ सिंह उगाके मोबाईल रिपेअरचं काम करतात. त्यांचे वडिल ड्रायव्हर आहेत. तर आई स्वीपर आहे. 2013 पासून लाभ सिंह उगोके आप पक्षासोबत जोडले आहेत. विजयानंतर लाभ सिंह उगाके म्हणाले की, 'चन्नी यांना भदौर मतदारसंघाबाबत काहीही माहिती नाही. या मतदारसंघात 74 गावे येतात. या गावातील सर्व अडचणी मला माहित आहे. ही गावेच माझा परिवार आहेत. चन्नी यांना भदौर मतदार संघातील दहा गावांची नावेही माहित नाहीत. भदौर चन्नी यांच्यासाठी फक्त एक मतदारसंघ आहे.'

चरणजीत चन्नींचा चरणजीत चन्नींकडून पराभव!
चमकौर साहिब या मतदार संघातूनही चन्नी यांना पराभवाचा धक्का बसला आहे. चमकौर साहिब या मतदार संघातून डॉक्टर चरणजीत सिंह यांनी काँग्रेसच्या चरणजीत सिंह यांचा पराभव केला आहे. मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांनी 2017 मध्ये आपच्या डॉक्टर चरणजीत सिंह 12308 मतांनी पराभवाचा धक्का दिला होता. आपच्या चरणजीत सिंह यांनी 2022 मध्ये पराभवाचा वचपा काढत मुख्यमंत्री चन्नी यांचा पराभव केला आहे.  या मतदारसंघातून काँग्रेसच्या चरणजीत सिंह यांनी तीन वेळा निवडणूक जिंकली आहे. 2007 मध्ये चन्नी यांनी अपक्ष निवडणूक जिंकली होती. त्यानंतर 2012 आमि 2017 मध्ये काँग्रेसकडून त्यांनी विजय मिळवला होता.  पण आता चरणजीत सिंह यांना दोन्ही जागांवरुन पराभव स्विकारावा लागला आहे. (Charanjit Singh Channi lost both his seats)  

दिग्गजांना पराभवाचा धक्का - 
पंजाबमधील जनतेने आप पक्षाच्या बाजूने कौल दिला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पंजाबमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, उपमुख्यमंत्री, पंजाब कांग्रेस अध्‍यक्ष नवजोत सिंह सिद्धू यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्याशिवाय कॅप्टन अमरिंदर आणि सुखबीर सिंह बादल यांचाही पराभव झाला आहे. पंजाबमध्ये आलेल्या आपच्या त्सुनामीमध्ये अनेकांच्या नौका बुडाल्या आहेत. 

उपमुख्यमंत्र्यांचाही पराभव -
उपमुख्यमंत्री ओम प्रकाश सोनी यांचाही पराभव झाला आहे. अमृतसर सेंट्रल या विधानसभ मतदार संघातून अजय गुप्ता यांनी ओम प्रकाश सोनी यांचा पराभव केला आहे. ओम प्रकाश सोनी अमृतसह सेंट्रलमधून तीन वेळा आमदार राहिले आहेत. 2007,2012 आणि 2017 मध्ये ओम प्रकाश सोनी यांनी विजय मिळवला होता. मात्र, आता आपच्या त्सुनामीमध्ये त्यांचा पराभव झाला आहे.

काँग्रेसच्या पराभवाचे कारण काय?
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह यांनी दोन जागांवर निवडणूक लढवली होती. या दोन्ही जागांवर त्यांचा पराभव झाला आहे. अंतर्गत कलहाचा पंजाबमध्ये काँग्रेसला जोरदार फटका बसला आहे. निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्रिपदावरुन काँग्रेसमध्ये दोन गट निर्माण झाले होते. याचा फटका काँग्रेसला बसल्याचे राजकीय विश्लेषकांनी सांगितले आहे. चरणजीत सिंह चन्नी यांनी सप्टेंबर 2021 मध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. अंतर्गत वादांमुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर चन्नी यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. पण तरिही पंजाबमध्ये काँग्रेससमोरील अडचणी कमी झाल्या नव्हत्या. नवज्योज सिंह सिद्धू आणि चन्नी यांच्यातील वाद समोर आला होता. याचाही फटका काँग्रेसला बसला. सिद्धू आणि चन्नी यांना आपली जागाही वाचवता आली नाही. दोघांनाही पराभवचा धक्का बसला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget