Municipal Election: केडीएमसीने निवडणूकीसाठी महिला आरक्षण सोडत कार्यक्रम केला जाहीर
KDMC Municipal Corporation Election: कल्याण-डोंबिवली महापालिकेने महिला आरक्षणाची सोडत कार्यक्रमात जाहीर केला आहे.
KDMC Municipal Corporation Election: सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागातील अनुसूचित जाती - जमाती आणि महिला आरक्षणाचा कार्यक्रम पूर्ण करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह 14 महापालिकांना आदेश दिले आहे. यानंतर आता कल्याण-डोंबिवली महापालिकेने महिला आरक्षणाची सोडत कार्यक्रमात जाहीर केला आहे. केडीएमसीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, महापालिकेने महिला आरक्षणाची सोडत 31 मे रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांचा कार्यक्रम 27 मे रोजी उघड केला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
मागील निवडणूकीच्या वेळी एक सदस्यीय पद्धत होती. त्यावेळी महापालिका हद्दीत 27 गावे मिळून 122 प्रभाग होते. मागील निवडणुकीत ओबीसी आरक्षण अबाधित होते. तसेच महिलांचे आरक्षण ही होते. त्यावेळी 122 पैकी 68 प्रभागातून महिला निवडून आल्या होत्या. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा हा न्यायप्रविष्ट आहे.
ओबीसी आरक्षण वगळता महापालिकेची त्रिसदस्य पद्धतीने निवडणूक होणार आहे. 133 प्रभागाकरीता 44 प्रभाग आहेत. अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या 13 प्रभागांपैकी 4 महिलांसाठी तर अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असलेल्या चार प्रभागापैकी 2 प्रभाग हे महिलांसाठी आक्षित आहेत. अनुसूचित जाती जमातीचे हे 17 प्रभाग सोडल्यास उर्वरीत 116 प्रभागांपैकी 58 प्रभाग हे सर्व साधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. त्यासाठी आरक्षणाची सोडत 31 मे रोजी होईल. त्याची वेळ आणि स्थळ 27 मे रोजी जाहिर केले जाणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी सुधाकार जगताप यांनी दिली आहे.
कसा असेल आरक्षण सोडत कार्यक्रम
- 31 मे रोजी महिला आरक्षणाची सोडत.
- 1 जून रोजी महिला आरक्षित प्रभागाचे प्रारुप प्रसिद्ध करणे.
- 1 ते 6 जून दरम्यान महिला आरक्षण सोडतीवर सूचना व हरकती मागविण्यात येतील.
इतर महत्वाच्या बातम्या: