एक्स्प्लोर

Rajya Sabha Election : संभाजीराजेंना दिलेली मुदत संपली, शिवसेना आज सहावा उमेदवार जाहीर करणार?

Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपतींना शिवसेनेने पक्षप्रवेशाची दिलेली मुदत आज संपली. त्यामुळे शिवसेना आज आपला सहावा उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती आहे.

मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून आजच उमेदवार जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी राज्यसभेचे उमेदवार जाहीर करणार आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संभाजीराजेंना दिलेली पक्षप्रवेशाची मुदत आज संपल्याने शिवसेना आपले दोन्ही उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. 

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये चुरस असल्याचं दिसून येतंय. राज्यसभेची सहावी जागा शिवसेना लढवणार असल्याचं पक्षाकडून आधीच जाहीर करण्यात आलं आहे. त्यासाठी संभाजीराजे छत्रपतींना पक्षप्रवेशाचे निमंत्रण देण्यात आलं होतं. पण संभाजीराजेंनी पक्ष प्रवेशाला नकार दिल्याने शिवसेना आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. 

ग्रामीण भागातील शिवसैनिकाला राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संधी मिळू शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी रविवारी संभाजीराजेंची भेट घेतली होती आणि आज 12 वाजेपर्यंत त्यांनी पक्षप्रवेश करावा अशी विनंती केली होती. संभाजीराजेंना दिलेली ही मुदत आता संपली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील एका ज्येष्ठ नेत्याला ही जागा देण्यात येणार असल्याची चर्चा आहे. आजच संध्याकाळी उद्धव ठाकरे यांच्याकडून या जागेसंदर्भात घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, संभाजीराजेंनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. संभाजीराजे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवणार असल्याची माहिती आहे. 

अपक्षाला पाठिंबा देणार नाही, संजय राऊत यांचे स्पष्टीकरण
राज्यसभेची अपक्ष निवडणूक लढवणाऱ्या संभाजीराजे छत्रपतींनी 42 मतांची तजवीज केली का? असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. आम्ही अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही. शिवसेना दोन जागा लढवणार असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आमचा संभाजीराजेंना विरोध नसल्याचेही राऊत म्हणाले. मला बाकी काही माहिती नाही पण शिवसेनेच्या दोन जागा निवडून येणार असल्याचा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. यावेळी शिवसेनेचे दोन उमेदवार राज्यसभेत जाणार असल्याचे राऊत यावेळी म्हणाले.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP Majha : 5 PM : 25 January 2025Maha Kumbha 2025 | Aghori Sadhu | कसे बनतात अघोरी साधू? काय असते दिनचर्या?ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 25 January 2025Dhananjay Deshmukh On Balaji Tandale CCTV : सरपंच हत्येतील आरोपींना बालाजी तांदळेने साहित्य पुरवले? खरेदीचा CCTV समोर, देशमुखांचा गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
अमित शाहंनी पवारसाहेबांवर प्रश्न उपस्थित करण्याचं धाडस करु नये, त्यांनी देश फिरावा, जयंत पाटलांचा हल्लाबोल
Nana Patole : महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
महाराष्ट्र निवडणुकीत 60 लाख अतिरिक्त मते कोठून आली? हे बांगलादेशी मतदार होते का, त्यांना मोदी सरकारने आणले का?? नाना पटोलेंचा गंभीर आरोप
Sanjay Raut : विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपत नाही, राजकारणात सर्वांचे दिवस बदलतात; राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना थेट इशारा
Jitendra Awhad : अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
अत्याचार केलेल्यांना सोडवण्यासाठी अक्षय शिंदेला संपवलं, आरोपी चुपचाप सुटून जाणार; जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Embed widget