Katol Vidhan Sabha Election 2024 : वडिलांचा गड राखण्यात सलील देशमुख अपयशी, काटोलमध्ये भाजपचे चरणसिंग ठाकूर ठरले 'किंग'
Katol Vidhan Sabha Constituency: नागपूरच्या काटोल मतदारसंघातील तरंगी लढतीत यंदा महायुती की मविआ, या पैकी कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार होते. मात्र इथे भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे.

Katol Vidhan Sabha Election Result 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीने (Mahayuti) मोठी मुसंडी मारली. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा धक्का बसलाय. महायुतीचा 236 जागांवर विजय झाला तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर यश मिळाले. दरम्यान, नागपुरातील 12 मतदारसंघातील
'हायप्रोफाइल' लढतीत काटोल विधानसभा मतदारसंघातही (Katol Vidhan Sabha Election) काटेकी टक्कर झाल्याचे बघायला मिळाले. कारण या मतदारसंघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांच्याविरोधात भाजपचे चरणसिंग ठाकूर उभे होते. तर दुसरीकडे ऐन निवडणुकीच्या धामधुमीत अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाल्यामुळे येथील राजकारण तापले होते. मात्र मतदारांनी ठाकूर यांच्यावर विश्वास टाकला व त्यांचा 38 हजार816 मताधिक्याने विजय झाला आहे.
काटोलमध्ये भाजपचे चरणसिंग ठाकूर ठरले 'किंग'
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी काटोल मतदारसंघाच्या निवडणुकीतून यंदा माघार घेतल्याचं पाहायला मिळालं. तर मविआत हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटला असून अनिल देशमुख यांना काटोल मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, ऐनवेळेवर माझ्या एवजी पुत्र सलील देशमुख यासाठी पक्षनेतृत्वाकडे अनिल देशमुखांनी विनंती करत उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सलील देशमुख (Salil Deshmukh) यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचं दिसून आलं.
तर दुसरीकडे भाजपने (BJP) चरणशिंग ठाकूर (Charansingh Thakur) यांना मैदानात उतरवत देशमुख कुटुंबीयांना आव्हान दिले होतं. काटोलमध्ये घराणेशाही संपवून एका सामान्य कार्यकर्त्यांना संधी द्यावी, असे आवाहन चरणसिंग ठाकुर हे मतदारसंघात करत होते. तर या संघर्षात आणखी एक नाव पुढे आले असून काँग्रेसचे युवा नेते याज्ञवलक्य जिचकार यांनी काटोल मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी घेत शड्डू ठोकला होता. त्यामुळे या तिहेरी लढतीत कोण विजयाचा गुलाल उधळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार होते. अखेर अतितटीच्या या लढतीत भाजपने हा गड लढवत चरणशिंग ठाकूर यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.
चरणसिंग ठाकूर (भाजप)- विजयी
मिळालेली मते- 1,04,338
मतदान- 52.40%
सलील देशमुख (राष्ट्रवादी श.प.गट)- पराभूत
मिळालेली मते 65,522
मतदान- 32.90%
नोटा-1543
भाजपच्या चरणसिंग ठाकूर यांच्या विजयाचे कारण काय?
काटोल विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये पराभव झाल्यानंतर भाजपचे चरणसिंग ठाकूर मतदार संघात दुसऱ्याच दिवसांपासून पुन्हा जनतेत गेले. नव्या दमाने संघटनेची उभारणी केली. पारडसिंगा येथील आई अनसूया माता देवस्थानचा विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून कायापायलट केला. तसेच कुणबी, माळी समाजाशी कनेक्ट ठेवला. तर ग्रामीण भागात लाडक्या बहिणींनी डोक्यावर घेत त्यांना फायदा मिळवून दिल्याचे बोलले जात आहे .
2019 मधील मतदारसंघातील राजकीय गणित!
काटोल विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी तब्बल 94 हजार मतं मिळव विजय मिळवला. त्यांनी भाजपचे चरणसिंग ठाकूर यांना पराभूत करून आपला विधानसभा मतदारसंघ पुन्हा काबीज केला होता. सलग चारवेळा काटोल सर करणारे माजी गृहमंत्री तसंच राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भाजपने त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसंच काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली होती.
हे ही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

