एक्स्प्लोर

Rahul Gandhi: 'I'm Unstoppable', कर्नाटकातील काँग्रेसच्या आघाडीवर राहुल गांधींची प्रतिक्रिया

Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांसाठी मतमोजणी सुरु झाली आहे. तसेच आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेस आघाडीवर आहे.

Karnataka Election Results 2023 : कर्नाटक (karnataka Election) विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून निवडणुकांचे कल (Election Result) समोर येत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेस (Congress) चांगलीच आघाडी घेत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. राहुल गांधींनी एक व्हिडिओ ट्विट करत, मी अजिंक्य आहे, मला विश्वास आहे, आणि आज मी थांबणार नाही. असे कॅप्शन या व्हिडिओला दिले आहे. तसेच या व्हिडिओमध्ये त्यांच्याबरोबर अनेक नेते देखील असल्याचं पाहायला मिळत आहे. 

 काँग्रेसची निवडणुकीतील स्थिती

 कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये आघाडी घेतल्यानंतर काँग्रेसने सरकार स्थापनेची तयारी सुरू केली आहे. दरम्यान, कर्नाटकची उपराजधानी आणि सीमावासियांचा आत्मा असलेल्या बेळगावमध्ये काँग्रेसने 18 पैकी 11 जागांवर आघाडी घेतली आहे. सकाळी अकरापर्यंतच्या ट्रेंडनुसार काँग्रेस 118 जागांवर आघाडीवर आहे. म्हणजेच काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत असून मोठी उलथापालथ झाली नाही तर संख्याबळात बदल होण्याची अपेक्षा नाही. सत्ताधारी भाजप 71 जागांवर आघाडीवर असून, बहुमताच्या फार मागे आहेत. त्यावेळी राज्यात किंगमेकर बनण्याची आशा असलेला जेडीएस 28 जागांवर पुढे आहे. 

दुसरीकडे, कर्नाटकातील काँग्रेसला एकही संधी हातातून निसटू द्यायची नाही यासाठी कंबर कसली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः तेथे उपस्थित असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार नक्कीच स्थापन होईल. इतर पक्षांसोबत घोडेबाजार करण्याचा भाजपचा प्रयत्न असेल. दुसरीकडे, कर्नाटकातील गौरीबिदानूर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार केएच पुट्टास्वामी गौडा 11,000 मतांनी आघाडीवर आहेत. एबीपी लाईव्हवर त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. काँग्रेसच्या पाठिंब्याच्या मुद्द्यावर मवाळ भूमिका दाखवत, निकाल आल्यावर बोलू, असे सांगितले.

कर्नाटकात दोन गट

कर्नाटकात विधानसभा निवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. मात्र निवडणुकीपूर्वीच दोन बलाढ्य गट आमनेसामने आले आहेत. पहिला गट ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा तर दुसरा गट डीके शिवकुमार यांचा आहे. दोन्ही नेत्यांचे समर्थक उघडपणे एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. त्यामुळे कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदासाठी या दोन्ही नेत्यांमधील चुरस आणखीच वाढली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Karnataka Election Result Update: कर्नाटकात काँग्रेसची जोरदार मुसंडी, पण आमदारांची काळजी घेण्यास सुरुवात; अंतिम निकालापूर्वीच रिसाॅर्ट बुक!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 3 PM : 17 नोव्हेंबर  2024 : एबीपी माझा हेडलाईन्स : Maharashtra NewsNavneet Rana Amravati : कापण्याची भाषा कराल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देणारABP Majha Headlines :  2 PM : 17 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM :17 नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
ज्यांचे हात स्वच्छ आहेत, त्याला कोणाच्या बापाला घाबरायची गरज, ED च्या कारवाईवरुन शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल
Sujay Vikhe : लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
लोकसभेत घराणेशाहीच्या मुद्द्यावरून टीका करणाऱ्या निलेश लंकेंना सुजय विखेंनी घेरलं; म्हणाले, पारनेरमध्ये...
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
हर्षवर्धन पाटील निवडून आल्यात जमा, दत्तामामाला किती मतांनी पाडायचं हे तुम्ही ठरवा, सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल 
Yogi Adityanath In Kolhapur : ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
ठाकरे आणि पवारांमध्ये नुरा कुस्ती सुरु, स्वत:ला आणि देशाला धोका देतील; योगींची कोल्हापुरात जोरदार टीका
Dhananjay Mahadik : उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
उद्धव साहेब, मुन्ना महाडिकचा भांग देखील कोण वाकडा करू शकेल, असा कोणी पृथ्वीवर जन्माला आलेला नाही : धनंजय महाडिक
Navneet Rana : ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
ते कापाकापाची भाषा करत असतील तर आम्हीदेखील...; अमरावतीच्या राड्यानंतर नवनीत राणांचा इशारा, उद्धव ठाकरेंवरही आरोप
PM Modi In Nigeria : पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
पीएम मोदींना 17 वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार; नायजेरियाकडून ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर पुरस्कार
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
मोदी म्हणाले, बाळासाहेबांची स्तुती करून दाखवा, पुण्यतिथिनिमित्त राहुल गांधींचं थेट ट्विट, म्हणाले
Embed widget