सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात, जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल, छगन भुजबळांवरही निशाणा
धमकवण्यासाठी ED चा वापर केला जात असल्याचे मत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केले. सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात असेही आव्हाड म्हणाले.
Jitendra Awhad on BJP : राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मुलाखतीवरुन प्रचंड खळबळ उडाली आहे. या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांनी आपण केवळ ईडीच्या (ED) कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपसोबत (BJP) गेल्याचं सांगण्यात आलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या पुस्तकात भुजबळ Ed च्या कारवाईबाबत स्पष्ट बोलले आहेत. सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात असेही आव्हाड म्हणाले. भुजबळ सत्य बोलणारे आक्रमक नेते आहेत. Ed चा धमकवण्यासाठी वापर केला जातोय, असे आव्हाड म्हणाले. भुजबळांनी पुस्तकावर कारवाई करावी, ते राजदीप सरदेसाई आहेत, सर्व पुरावे त्यांच्याकडे असल्याचे भुजबळ म्हणाले.
महराष्ट्रात सर्व लोकांना माहिती आहे की, भाजप कसे घाबरवत आहे. सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे लोक काहीही करू शकतात असेही आव्हाड म्हणाले. राम मंदिरामध्ये पाणी गळत आहे, त्याबाबत मोदी कधी बोलले का? इतर बाबतीत मोदी कधी बोलले का? असा सवालही त्यांनी केला. भुजबळ यांचे त्रिवार सत्य आहे ते कशासाठी गेले तिकडे असेही आव्हाड म्हणाले. आर आर पाटील हे सत्यवादी माणूस होते. गेलेल्या माणसावर बोलणं ही आपली संस्कृती नाही. आर आर पाटील यांनी तुम्हाला किती मदत केली असेही आव्हाड म्हणाले.
कायद्याला काहीही अर्थ राहिला नाही, सगळा चोथा करुन टाकला
सरन्यायाधिश चंद्रचूड यांनी सगळा चोथा करुन टाकला आहे. कायद्याला काहीही अर्थ राहिला नाही. हेच गेले आता कोण देणार तारीख, सुप्रीम कोर्ट बघ्याची भूमिका घेत आहे असेही आव्हाड म्हणाले. हे गांभीर्यानं घेणे गरजेचे आहे असंही आव्हाड म्हणाले.
भुजबळ काय म्हणाले?
आम्ही विकासासाठी भाजपसोबत गेलो. आम्ही आमच्या मतदारसंघाचा विकास करु शकलो. माझ्या मतदारसंघात 2 हजार कोटींची कामे सुरु आहे. त्यामुळे भाजपसोबत गेल्याने आम्हाला विकास करण्यासाठी फायदा झाला. हे आताच का छापलं गेलं, हे मला कळलेलं नाही. मी अजून पुस्तक वाचलेलं नाहीय, यामध्ये काय लिहिलंय-काय नाही, हे बघेन आणि माझ्या वकिलांसोबत बोलेन, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली. पुस्तकात नको-नको त्या गोष्टी लिहिल्या आहेत. यामगे नेमका काय हेतू आहे, याबाबत मला कल्पना नाही. सध्या मी खूप व्यस्त आहे. त्यामुळे मी निवडणुकीनंतर माझ्या वकिलांशी बोलून यावर निर्णय घेईन, असं छगन भुजबळ म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: