एक्स्प्लोर

Jalna MLA List : जालना जिल्ह्यावर कोणाचं वर्चस्व, कोणत्या पक्षाची किती ताकद?

Jalna MLA List : जालना मतदारसंघात मराठा तसेच ओबीसी आंदोलनामुळे राजकीय गणित बदलले आहे. त्यामुळे येथे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

जालना : जिल्ह्यात विधानसभेचे एकूण जालना, भोकरदन, बदनापूर, घनसावंगी, परतूर, असे 5 विधानसभा मतदारसंघ आहेत.2019 साली जिल्ह्यातील 5 पैकी 3 विधानसभेवर भाजपचे वर्चस्व राहिले. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात भाजपचा या मतदारसंघावर वरचस्मा राहिला. जिल्ह्यातील जालना आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघात मात्र भाजपला विधानसभेची जागा बळकावण्याएवढी ताकत निर्माण करता आली नाही. परंपरेने या दोन मतदारसंघात नेतृत्व करताना शिवसेनेने जम बसवला. मात्र शिवसेनेच्या फुटीनंतर जिल्ह्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रात राजकीय समीकरणं बदलली. मराठवाड्यातील शिवसेनेचे बलाढ्य नेते अर्जुन खोतकरांनी एकनाथ शिंदेंची सोबत दिल्याने सर्वच मतदासंघात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला.

मनोज जरांगे यांच्यामुळे राजकीय गणित बदलले

राज्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी फुटीनंतर राज्याच्या राजकारणात प्रभाव असलेले नेते राजेश टोपे यांनी शरद पवारांची साथ सोडली नाही. त्यामुळे जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीचे फारसे परिणाम झाले नाही. राजेश टोपे नेतृत्व करत असलेला घनसावंगी मतदासंघ टोपेंचा बालेकिल्ला समजला जातो. गेली अनेक वर्ष  या मतदारसंघावर राजेश टोपे यांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. मात्र यावेळी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात याच मतदारसंघातून मराठा आंदोलन उभे राहिल्यानंतर येथील राजकीय समीकरणावर परिणाम झालेला पाहायला मिळत आहे. याच मतदारसंघांमध्ये ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाला सुरुवात झाली. त्यामुळे देखील घनसावंगी मतदारसंघ बरोबरच जिल्ह्यातील सर्वच मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

मराठा आणि ओबीसी आरक्षण आंदोलनाचा प्रभाव

29 ऑगस्ट 2023 रोजी मनोज जरांगे यांनी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी मोठं जनआंदोलन उभं केलं. या आंदोलनातील मागण्या आणि नंतर उद्भवलेल्या हिंसक घटनांचा राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर परिणाम झाला. या परिणामांचा प्रभाव जिल्ह्यातील सर्वच मतदासंघांवर झाला. जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा फायदा आपल्या पक्षाला व्हावा यासाठी अनेकजण राजकीय डावपेच आखत आहेत. दुसरीकडे जरांगेंच्या या मागणीला विरोध करत 13 जून 2024 रोजी लक्ष्मण  हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या नेतृत्वात ओबीसी आंदोलन उभे राहिले आहे. यालादेखील राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. परिणामी जालना जिल्ह्यातील सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे. याचाही परिणाम या विधानसभा निवडणुकीवर झालेला पाहायला मिळेल.

जालना जिल्ह्यात कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार? (Jalna MLA List)

परतूर विधानसभा -  बबन लोणीकर (भाजप)
घनसावंगी विधानसभा -  राजेश टोपे (राष्ट्रवादी - शरद पवार)
जालना विधानसभा -  कैलास गोरंटियाल (काँग्रेस)
बदनापूर विधानसभा -  नारायण कुचे (भाजप)
भोकरदन विधानसभा -  संतोष दानवे (भाजप) 

कोणत्या मतदारसंघात कोणाला किती मतं मिळाली? 

जालना विधानसभा मतदारसंघ :

जालना विधानसभा मतदारसंघात 2019 साली काँग्रेसचे उणेदवार कैलास गोरंट्याल यांचा विजय झाला होता. त्यांना एकूण 49.3 टक्के मतं मिलाली होती. तर शिवसेना (अविभाजित) पक्षाचे उमेदवार अर्जुन खोतकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. त्यांना एकूण 35.7 टक्के मतं मिळाली होती. वंचित बहुजन आघाडीचे अशोक खरात हे तिसऱ्या क्रमांकावर होते. कैलास गोरंट्याल यांना 91835 मतं तर खोतकर यांना 66497 मतं मिळाली होती. अशोक खरात यांना 8336 मतं मिळाली होती. 

परतूर विधानसभा मतदारसंघ :

2019 साली या मतदारसंघात बबनराव लोणीकर यांचा विजय झाला होता. ते भाजपाचे उमेदवार होते. त्यांना एकूण 52.2 टक्के मतं मिळाली होती. तर सुरेशकुमार जेथिलिया यांना दसऱ्या क्रमांकाची 39.5 टक्के मतं मिळाली होती. लोणीकर यांना 106321 तर जेथिलिया यांना 80379 मतं मिळाली होती. जेथिलिया हे काँग्रेसचे उमेदवार होते. 

घनसावंगी विधानसभा मतदारसंघ :

घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून 2019 साली राष्ट्रवादीचे (अविभाजित) उमेदवार राजेश टोपे यांनी बाजी मारली होती. तर शिवसेनेचे (अविभाजित) हिकमत उढाण यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं मिळाली होती. टोपे यांना 107849 (47.1 टक्के) तर उढाण यांना 104440 (45.6 टक्के) मतं मिळाली होती.

बदनापूर विधानसभा मतदारसंघ 

2019 साली बदनापूर विधानसभा मतदारसंघात भाजपाने बाजी मारली होती. या मतदारसंघात नारायण कुचे यांना 49.8 टक्के तर राष्ट्रवादीचे (अविभाजित) रुपकुमार चौधरी यांना 41 टक्के मतं मिळाली होती. या दोघांनाह मिळालेल्या मतांची संख्या अनुक्रमे 105312 आणि 86700 होती. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुज आघाडीचे राजेंद्र मगरे हे होते. 

भोकरदन विधानसभा मतदारसंघ 

भोकरदन विधानसभा मतदारसंघात 2019 साली भाजपाचे उमेदवार संतोष दानवे यांनी बाजी मारली होती. त्यांना एकूण 118539 मतं मिळाली होती. या मतांचे प्रमाण 54.6 टक्के होते. तर चंद्रकांत दानवे या राष्ट्रवादीच्या (अविभाजित) उमेदवाराला दुसऱ्या क्रमांकाची 86049 मते मिळाली होती. या मतांचे प्रमाण 39.7 टक्के होते. 

सध्या महाराष्ट्रात कोणत्या पक्षाचे किती आमदार? (Maharashtra Vidhansabha MLA List 2019)

महायुती : 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)

महाआघाडी : 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02) 

हेही वाचा :

Marathwada MLA List : मराठवाड्यात कोणाची किती ताकद, कोणत्या पक्षाचे किती आमदार? जाणून घ्या सविस्तर

प्रज्वल ढगे हे 'एबीपी माझा ऑनलाईन'टीममध्ये 'कॉपी एडिटर' म्हणून कार्यरत आहेत. त्यांना राजकारण, मनोरंजन, क्रीडाविषयक बातम्यांमध्ये विशेष रस आहे. त्यांनी याआधी 'लोकसत्ता', 'टीव्ही ९ मराठी' या माध्यमांत काम केलेले आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Pimpri Chinchwad : वाहतूक कोंडीवर काय म्हणतातयेत पिंपरी-चिंचवडकर?
Mahapalikecha Mahasangram Jalgaon : जळगाव महापालिकेत कोण मारणार बाजी? जळगावकरांना काय वाटतं?
Vidhan Parishad Final week proposal : विघानपरिषदेत अंतिम आठवडा प्रस्ताव मांडण्यास सुरुवात
Pravin Datke Nagpur : तुकाराम मुंडेंशी आमचा वैयक्तिक वाद नाही - प्रवीण दटके
Bharat Gogawale On Ajit pawar : दादा एक पाऊल पुढे आले तर आम्ही दोन पावलं पुढे यायला तयार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Book Festival : 800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं,अंतराळवीर कॅप्टन शुभांशू शुक्लांचं व्याख्यान ,पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
800 स्टॉल, 50 लाख पुस्तकं, पुणे बुक फेस्टीव्हल ठरणार वाचकांसाठी पर्वणी
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 डिसेंबर 2025 | शनिवार
leonel Messi India Tour: कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
कोलकातामधील मेस्सीच्या कार्यक्रमात अभूतपूर्व राडा; थेट आयोजकांना बेड्या ठोकल्या, प्रेक्षकांचे पैसे सुद्धा परत करणार!
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
भेटवस्तूमुळे उठणार वादळ! शिवा-जगदंबाच्या नात्यात मोठा ट्विस्ट; गैरसमज दूर होणार की वाढणार?
Share Market Holidays 2026 : पुढील वर्षी शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? NSE कडून सुट्ट्यांची यादी जाहीर
2026 मध्ये शेअर बाजार किती दिवस बंद राहणार? नॅशनल स्टॉक एक्सचेंजकडून सुट्ट्यांची यादी जाहीर
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
कोल्हापुरात आयटीपार्क निर्मितीचा मार्ग मोकळा, जागा उपलब्धतेस शासनाची मंजुरी; आमदार राजेश क्षीरसागरांची माहिती
Lionel Messi India Tour: हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
हैदराबादमध्ये लिओनेल मेस्सी जलवा दाखवणार; मैत्रीपूर्ण सामन्याला राहुल गांधी सुद्धा हजेरी लावणार
Tamanna Bhatia: जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
जयश्री गडकरांच्या रुपातील तमन्ना भाटियाचा फर्स्ट लूक, 'लख लख चंदेरी तेजाची' गाण्यावर डान्स, व्ही. शांतारामांच्या बायोपिकची उत्सुकता
Embed widget