Jalgaon Rural Vidhan Sabha Constituency: जळगाव ग्रामीणमध्ये कोणाचं 'गुलाब' फुलणार? कोण उधळणार विजयाचा गुलाल?
Jalgaon Rural Vidhan Sabha Constituency: 2019 मध्ये गुलाबराव पाटील सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. यावेळी येथील जनतेला कोणाचा पाठिंबा आहे हे चित्र 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे.
Jalgaon Rural Vidhan Sabha Constituency: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चं (Maharashtra Assembly Election 2024) रणशिंग फुंकलंय. अशात सर्वात चर्चेचा जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात (Jalgaon Rural Vidhan Sabha Constituency) उमेदवारांनी आपली कंबर कसलीय. या मतदार संघात आपल्याला थेट लढत पाहायला मिळणार आहे. यंदा महायुतीचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) विरोधात महाविकास आघाडीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Devkar) रिंगणात आहेत. या मतदारसंघातून गुलाबराव पाटील की गुलाबराव देवकर? कोण उधळणार विजयाचा गुलाल? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदा जनतेला कोणाचा पाठिंबा?
20 नोव्हेंबरला संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल सर्वांना कळणार आहे. राज्यातील दोन बड्या पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर यंदा प्रथमच निवडणुका होत असल्याने यंदाच्या निवडणुकीत वेगळेच वातावरण आहे. महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांपैकी जळगाव ग्रामीण ही जागा 14 व्या क्रमांकावर आहे. जळगाव ग्रामीणची जागा सध्या गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडे आहे. 2019 मध्ये गुलाबराव पाटील सलग दुसऱ्यांदा आमदार झाले. यावेळी येथील जनतेला कोणाचा पाठिंबा आहे हे चित्र 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. यापूर्वी जळगाव ग्रामीणची जागा राष्ट्रवादीकडे होती. 2008 च्या परिसीमनानंतर जळगाव ग्रामीण विधानसभा अस्तित्वात आली.
यंदाही गुलाबराव पाटील गड राखणार का?
महाराष्ट्रात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गुलाब रघुनाथ पाटील यांना शिवसेनेकडून दुसऱ्यांदा तिकीट मिळाले, तर अपक्ष चंद्रशेखर प्रकाश अत्तरदे यांनी त्यांच्यासाठी उमेदवारी दाखल केली होती. अपक्ष उमेदवारी दाखल केल्यानंतरही चंद्रशेखर अत्तरदे यांना निवडणुकीत 59,066 मते मिळाली होती. तर शिवसेनेचे गुलाब रघुनाथ पाटील यांना 105,795 मते मिळाली होती. या निवडणुकीत शिवसेनेचे गुलाब रघुनाथ पाटील यांनी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांचा 46729 मतांनी पराभव केला होता.
हेही वाचा>
Jamner Vidhan Sabha Constituency: जामनेरमधील विजयाचा मुकूट कोणाच्या हाती लागणार? कोण उधळणार विजयाचा गुलाल?