एक्स्प्लोर

'तो' प्रसंग आठवला अन् अश्रूंचा बांध फुटला, भर मंचावर इम्तियाज जलील ढसाढसा रडले!

इम्तियाज जलील यांना भाषणादरम्यान अश्रू अनावर झाले. भर मंचारवर ते रडू लागले. जलील औरंगाबाद पूर्व या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आहे. 18 नोव्हेंबरनंतर प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यानंतर 20 नोव्हेंबर रोजी संपूर्ण राज्यात मतदान होणार आहे. दरम्यान, अवघे काहीच दिवस शिल्लक असल्यामुळे नेतेमंडळी पूर्ण ताकदीने प्रचार करत आहेत. भाषणं, सभा, कॉर्नर बैठका असे सत्र राज्यभरात चालू आहे. दरम्यान, याच प्रचारादरम्यान, भाषणात काही नेतेमंडळी भावूक होताना पाहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजीनगरात एमआयएम पक्षाचे नेते इम्तियाज जलील यांनाही भर सभे अश्रू अनावर झाल आहेत. 

आईच्या निधनाची घटना सांगता त्यांना अश्रू अनावर

इम्तियाज जलील औरंगाबाद पूर्व या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांनी आपल्या प्रचारार्थ एक सभा आयोजित केली होती. या सभेत त्यांनी धडाकेबाज भाषण केले. याच भाषणात त्यांनी आपल्या आईसोबतच्या आठवणी सांगितल्या. आपल्या आईच्या निधनाची घटना सांगता त्यांना अश्रू अनावर झाले. ते भर सभेत भाषण चालू असतानाच रडू लागले.

मला घरी पोहोचायला उशीर झाला 

"22 मार्च 2022 या दिवशी मी माझं संपूर्ण जग हरवून बसलो.  या दिवसाच्या साधारण 20 दिवसांआधी रात्री 10 वाजता मी माझ्या आईसोबत गप्पा-गोष्टी करत होतो. त्यावेळी भविष्यात काय होणार आहे? याची मला कल्पना नव्हती. त्यावेळी मी आईला म्हणालो की आई मला एका भोजनाच्या कार्यक्रमाला जायचं आहे. मी जाऊन परत येतो. असं बोलून मी निघून गेलो. मला घरी पोहोचायला उशीर झाला," अशी आठवण जलील यांनी सांगितली.

माझ्या आईच्या हृदयाची धडधड....

"दुसऱ्या दिवशी माझ्या भावाचा मला फोन आला की माझ्या आईला ब्रेन स्ट्रोक आला आहे. त्यानंतर पुढचे 20 दिवस फार कठीण होते. ते दिवस मी रुग्णालयात काढले. मला माझ्या आईला माझा संपूर्ण वेळ द्यायचा होता. माझ्या आईच्या हृदयाची धडधड कशी कमी होत होती, ते मी मशीनवर बघत होतो. मला वाटतंय की माझी आई शांततेने माझा आवाज ऐकत असावी. मी सगळं सोडायला तयार होतो. मला आमदारकी नको होती, खासदारकी नको होती. कदाचित हे सगळं माझी आई ऐकत होती. मला माझ्या आईसोबत राहायचं होतं," असं सांगताना जलील यांना भरून आलं. 

ती माझी वाट पाहायची

"प्रत्येकजण आपल्या आईवर फार प्रेम करतो. माझी आई माझ्यासाठी जग होती. माझ्या आईला जाऊन बरीच वर्षे झाली. मी गेल्या 10 वर्षांत लोकांमध्ये गेलो. या काळात मी माझ्या आईला वेळ देऊ शकलो नाही. रात्रीचा एक वाजूदेत किंवा दोन वाजूदेत ती माझी वाट पाहायची. ती माझी वाट पाहायची. कधी गाडी येईल. माझा गुड्डू कधी येईल, असं तिला वाटायचं. रुग्णालयात असताना माझ्या आईने डोळे उघडले असते, तर कदाचित मी पुन्हा राजकारणात आलो नसतो. जगात तुम्ही नाव कमवू शकता, श्रिमंती मिळू शकते. पण ज्यांच्याकडे आई असते, ते फार नशीबवान आहेत," असंही जलील यांनी सांगितलं. 

तुम्ही मला मतदान करा किंवा करू नका

"माझ्या वडिलांचे निधन साधारण 30 वर्षांपूर्वी झाले. तुम्ही मला मतदान करा किंवा करू नका. पण भविष्यात मला एखाद्याची आई भेटली आणि तुमच्या बोलण्यामुळेच माझा मुलगा आमचा मुलगा आमच्यावर प्रेम करतो, असं कोणी म्हटलं तर यातच माझा विजय आहे," असं म्हणत त्यांनी प्रत्येक तरुणाने आपल्या आई-वडिलांची काळजी घ्यायला हवी, असं अवाहन केलं.  

Video News :

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Imtiaz Jaleel (@imtiazjaleelofficial)

हेही वाचा :

मोठी बातमी! इम्तियाज जलील निवडणुकीच्या रिंगणात, संभाजीनगरात निवडला 'हा' खास मतदारसंघ; आता तिहेरी लढत होणार

मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 AM TOP Headlines 10 AM 14 January 2025Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahesh Kothe : सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतला अखेरचा श्वास
सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे यांचं ह्रदयविकाराच्या धक्क्यानं निधन, प्रयागराजमध्ये घेतलाअखेरचा श्वास
Nashik Accident : सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
सवंगड्यांचे मृतदेह पाहून अपघातामधून वाचलेला 'विक्रांत' ढसाढसा रडला; म्हणाला...
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
Beed News: बीडमध्ये आंदोलनाची धग वाढण्याचे संकेत, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय; आज मध्यरात्रीपासून 28 तारखेपर्यंत जमावबंदी
मोठी बातमी: बीड जिल्ह्यात आज रात्रीपासून जमावबंदीचे आदेश लागू, जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय
गौतमी गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Embed widget