भाजपचे समीर मेघे विजयाची हॅटट्रिक करणार? की शरद पवारांचे उमेदवार आव्हान मोडीत काढणार, हिंगण्यात कौल कुणाला ?
Hingna Vidhan Sabha Constituency: नागपूरच्या हिंगणा मतदारसंघातील लढतीत यंदा महायुती की मविआ, या पैकी कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Hingna Vidhan Sabha constituency Election 2024 Result : विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) रणधुमाळी चांगलीच रंगली आहे. त्यानंतर आता सत्तेत येण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष ताकदीने प्रयत्न करत आहेत. दरम्यान, राज्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणाऱ्या नागपुरातील 12 मतदारसंघासह नागपूरच्या हिंगणा विधानसभा मतदारसंघात (Hingna Assembly Constituency) यंदा कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कारण या मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा महायुतीकडून भाजपच्या तिकिटावर समीर मेघे (Sameer Meghe) हे मैदानात उतरले आहेत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर माजी मंत्री रमेश बंग (Ramesh Bang) मैदानात आहेत. या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीत बरेच उमेदवार मैदानात असले तरी खरी लढत मेघे विरुद्ध बंग यांच्यातच आहे. त्यामुळे या दोन दिग्गजांच्या लढतीत कोण गुलाल उधळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
भाजपच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांच्या उमेदवाराचे आव्हान
कळमेश्वर विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या हिंगण्याचे विलगीकरण होऊन 2009 मध्ये हिंगणा हे स्वतंत्र विधानसभा क्षेत्र म्हणून उदयात आले. तेव्हापासून या मतदारसंघावर भाजपचा कब्जा आहे. वर्तमानात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले विजय घोडमारे तेव्हा भाजपकडून निवडणूक लढले होते आणि विजयी झाले. 2014 आणि 2019 मध्ये सलग समीर मेघे भाजपच्या तिकिटावरून निवडून आले आहेत आणि पुन्हा एकदा महायुतीकडून भाजपच्या तिकिटावरच मैदानात उतरले आहेत, तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर माजी मंत्री रमेश बंग मैदानात आहेत.
या विधानसभा क्षेत्रात निवडणुकीत बरेच उमेदवार मैदानात असले तरी खरी लढत मेघे विरुद्ध बंग यांच्यातच आहे. बुधवारी पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत मतदात्यांनी भरघोस मतदान केले. 58.10 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. आता शनिवारी 23 नोव्हेंबरलाच हिंगणा मतदारसंघाचा कारभारी कोण, हे निश्चित होणार आहे. इतर मतदारसंघाप्रमाणे या विधानसभा क्षेत्रात कोणत्याही बूथवर ईव्हीएम बंद पडल्याची तक्रार आली नाही.
2019 मधील मतदारसंघातील राजकीय गणित!
पक्ष | उमेदवार | मत |
भाजप (विजयी ) | समीर मेघे |
121,305 |
राष्ट्रवादी (SRP) |
विजय घोडमारे |
75,138 33 |
2014 मधील मतदारसंघातील राजकीय गणित!
पक्ष | उमेदवार | मत |
भाजप (विजयी ) | समीर मेघे |
84,139 |
राष्ट्रवादी (SRP) |
विजय घोडमारे |
60,981 |
कुंदा राऊत (कॉँग्रेस) |
विजय घोडमारे |
20,573 |
हे ही वाचा
- Nagpur Assembly Election : नागपूर जिल्ह्यातील विधानसभेची खडाजंगी, कोण-कोण भिडणार? 12 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!
- Maharashtra Vidhansabha Election 2024: विधानसभेची खडाजंगी: उपराजधानी नागपुरात कोण बाजी मारणार? आजी-माजी गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात कोणाचे बलाबल