एक्स्प्लोर

Haryana Assembly Election: शंभरी पार करुनही ठणठणीत, हरियाणात शंभरी पार केलेले किती मतदार? जाणून घ्या आकडेवारी 

Haryana Assembly Election: हरियाणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगानं केली आहे. निवडणुकीबाबत माहिती देखील आयोगानं जाहीर केली आहे. 

नवी दिल्ली : निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत जम्मू काश्मीर आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक जाहीर केली. जम्मू काश्मीरची निवडणूक तीन टप्प्यात पार पडणार आहे. तर, हरियाणाची निवडणूक एका टप्प्यात पार पडेल. हरियाणात 1 ऑक्टोबरला मतदान होणार असून 4 ऑक्टोबरला दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी होईल. हरियाणाची विधानसभा निवडणूक यापूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीसोबत झाली होती. यावेळी मात्र जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी जाहीर करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगानं तारखांची घोषणा करताना दोन्ही राज्यांमधील मतदारांबाबत माहिती दिली. यामध्ये हरियाणामधील एका आकडेवारीमुळं वेगळेपण दिसून येतं.  

हरियाणा विधानसभेसाठी एकूण मतदारांची संख्या  2.1 कोटी आहे. हरियाणात 2 लाख 55 हजार मतदार 85 वर्षांपेक्षा अधिक वयाचे आहेत. तर, 10 हजार 321 शतायुषी मतदार आहेत. तर, राज्यात 1.5 लाख दिव्यांग मतदार आहेत. हरियाणातील शंभरी पार करणाऱ्या मतदारांची संख्या 10 हजार 321 आहे. ही आकडेवारी चर्चेत आहेत. 

हरियाणा राज्यातील लोक त्यांच्या ताकदीसाठी आणि मजबुतीसाठी ओळखले जातात. हरियाणातील लोकांच्या आहारात दूध, दही आणि तूप मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळं भारताच्या क्रीडा क्षेत्रात आणि ऑलिम्पिकमध्ये पदकं मिळवून देणाऱ्यांमध्ये देखील हरियाणाचे खेळाडू आघाडीवर असतात. हरियाणाच्या लोकांच्या फिटनेसचा अंदाज तिथल्या शंभरी पार केलेल्या मतदारांच्या आकडेवारीमुळं येतो. हरियाणात शंभरी पार केलेल्या मतदारांची संख्या 10 हजार 321 इतकी आहे.

दरम्यान, हरियाणा राज्यात विधानसभेच्या 90 जागा आहेत. 2019 च्या निवडणुकीत भाजप आणि जेजेपीची सत्ता आली होती. भाजप सरकारकडे आता 43 आमदारांचं समर्थन आहे तर काँग्रेसकडे 42 आमदार आहेत. हरियाणातील  विधानसभेच्या 90 जागांसाठी 20 हजार 629 मतदान केंद्रांवर मतदान होईल. यापैकी 7132  मतदान केंद्र शहरी भागात तर 13497 मतदान केंद्र ग्रामीण भागात आहेत.  एका मतदान केंद्रावर 977 मतदार मतदान करतील.  

हरियाणामध्ये मतदानाची टक्केवारी चांगली राहावी यासाठी निवडणूक आयोगानं विविध उपाययोजना केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून 85 पेक्षा अधिक वय असणार्‍या मतदारांना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. 

संबंधित बातम्या :

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कधी? मुख्य निवडणूक आयुक्तांनी सणांची यादी अन् कारणं सागितली...

Assembly Election : महाराष्ट्र अन् हरियाणाची निवडणूक 2019  ला एकाचवेळी, यावेळी नेमकं काय बदललं? मुख्य निवडणूक आयुक्तांनी फरक समजावून सांगितला

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Zilla Parishad Election: राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
राज्यातील रखडलेल्या झेडपीच्या निवडणुका डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता; राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात निवडणुका घेण्याची दर्शवली तयारी
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
रामदास कदमांच्या मुलाने मुंबईतील लोकसभा मतदारसंघ हेरला, 2029 च्या निवडणुकीची तयारी, वडिलांच्या वाढदिवसाला बाईक अन् लॅपटॉप वाटले
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Budh Margi 2026 : जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..
जुलैच्या शेवटी बुधाची मार्गी चाल; या 4 राशींना सावधानतेचा इशारा, वेळोवेळी राहावं लागेल अलर्ट, अन्यथा..

व्हिडीओ

Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार
Food Safety : फळं भाज्यांवरील 99% कीटकनाशके हटवणारे 'Sophab' द्रावण; पुण्यातील शास्त्रज्ञांचं संशोधन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget