एक्स्प्लोर

पूर्व विदर्भातील विजयासाठी महायुतीच्या नेत्यांचा मोठा प्लॅन! काँग्रेसचा फुगा नक्कीच फोडणार, शिवसेना उपनेते नरेंद्र भोंडेकर यांचा दावा

Narendra Bhondekar : विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांचा मोठा प्लॅन असून विदर्भात काँग्रेसचा फुगा फुटणार असल्याचे संकेत शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिले आहे.

Maharashtra Assembly Election 2024 भंडारा: भंडाऱ्याचे शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar)  यांच्यावर उपनेते पदाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांच्याकडं पूर्व विदर्भ समन्वयक पद ही सोपविण्यातं आलं आहे. भोंडेकर यांच्या माध्यमातून पूर्व विदर्भात शिवसेना संघटन वाढीचा शिवसेनेचा प्रयत्न राहणार आहे. या विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांचा मोठा प्लॅन असून विदर्भात काँग्रेसचा फुगा फुटणार असल्याचे संकेत शिवसेनेचे नवनियुक्त उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केला आहे.

निवडणुकीत काँग्रेसचा फुगा नक्कीच फोडणार- नरेंद्र भोंडेकर

भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांची शिवसेना उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी त्यांची नियुक्ती केली. यासोबतच आमदार भोंडेकर यांच्यावर पूर्व विदर्भाच्या समन्वय पदाची जबाबदारी ही सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीचं पत्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत भोंडेकर यांना देण्यात आलं. आमदार नरेंद्र भोंडेकर हे शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीवर नाराज असल्याचं त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं होतं. त्यामुळं आमदार भोंडेकर हे अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. मात्र, आता आमदार भोंडेकर यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानं आता त्यांची नाराजी दूर झाल्यानं ते आता महायुतीकडून शिवसेना पक्षाचे उमेदवार राहतील, यावर शिक्कामोर्तब होतं आहे. दरम्यान पूर्व विदर्भातील विजयासाठी महायुतीच्या नेत्यांचा मोठा प्लॅन असल्याचे नरेंद्र भोंडेकर म्हणाले आहेत.

पूर्व विदर्भात महायुती 32 जागा लढेल, त्या सर्व जागा जिंकूच!  

सर्वसामान्य शिवसैनिकावर उपनेतेपदाची जबाबदारी देणे, हा त्या शिवसैनिकांसाठी सन्मानाची बाब आहे. मंत्रीपदाऐवजी पक्ष संघटनेची जबाबदारी हाचं मोठा सन्मान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना ओळखलं, असं उद्धव ठाकरेंनी ओळखलं असतं तर, आज पक्ष फुटला नसता. सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व आमदार एकत्र असते असे म्हणत नरेंद्र भोंडेकर यांनी द्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तर मी अपक्ष निवडणूक लढविली असती. राजकारणात सर्वचं पत्ते उघडायचे नसतात. भाजप मला प्रिय पक्ष आहे. भाजपमध्ये पूर्वीसारखीच सर्वांशी संबंध आहेत. महायुतीच्या तिन्ही पक्षासोबत समन्वय साधून जिल्ह्यातील तिन्ही जागा निवडून आणू.किंबहुना पूर्व विदर्भात महायुती 32 जागा लढतील आणि सर्वच्या सर्व जागा निवडून आणणार. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मोठा प्लॅन तयार केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा फुगा नक्कीच फोडणार, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला आहे.

हे ही वाचा 

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...

व्हिडीओ

Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report
Praful Patel On Sunetra Pawar: सुनेत्रा पवारांना पक्षातूनच चॅलेंज, थेट नोटीसही पाठवली; आता प्रफुल पटेल यांची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supriya Sule on NCP: राष्ट्रवादी काँग्रेस मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देणार असल्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
राष्ट्रवादी काँग्रेसकडून मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याच्या बातम्या निराधार, आमच्याकडे कोणतीही डील आलेली नाही: सुप्रिया सुळे
Dhule News: रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
रक्ताच्या पिशव्या येण्यापूर्वीच प्रुसतीसाठी ऑपरेशन टेबलवर घेतलं, धुळ्यातील रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू
Railway Ticket Booking IRCTC : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! तिकीट बुकिंगमधील कॅप्चा कोडची कटकट संपणार; IRCTC संकेतस्थळात महत्त्वाचे बदल
Tukaram Mundhe News: तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
तुम्ही जेव्हा बाहेर जातात, तेव्हा कोणतं फूड खाता, तुमचं आवडतं खाणं काय?, तुकाराम मुंढे म्हणाले...
Mumbai Goa Highway Accident: मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
मुंबई गोवा महामार्गावर भरधाव कार डंपरला धडकली, गाडीचा चेंदामेंदा, तिघांनी जागेवरच प्राण सोडला
Horoscope Today 15 July 2026 : आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 8 राशींसाठी चिंतेचा; तर, 4 राशींवर गणराया प्रसन्न, दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, आजचे राशीभविष्य
Supreme Court Pulls Up Patna High Court: सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
सलवार काढण्याचा प्रयत्न आणि छाती दाबणे म्हणजे अत्याचाराचा प्रयत्न नाही; पटना उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सरन्यायाधीश सूर्यकांत संतापले
Aamir Khan Gauri Spratt Wedding: 'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
'लव्ह जिहाद'च्या आरोपांवरुन आमिर खानचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'माझ्या बहि‍णींनी हिंदुंशी लग्न केलंय, गौरी हिंदू नाहीच, ती तर...'
Embed widget