एक्स्प्लोर

भाजप-शिवसेना युतीसाठी चर्चेत असणारे हेच ते 5 जागावाटप फॉर्म्युले!

उद्या (२४ सप्टें.) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यात युतीची घोषणा आणि जागावाटपही जाहीर होऊ शकतं. मात्र, त्यापूर्वी सध्या विविध माध्यमातून या दोन्ही पक्षांनी चर्चेत आणलेले जागा वाटप फॉर्म्युले बघणंही इंटरेस्टिंग आहे.

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर आलीये, काँग्रेस-राष्ट्रवादीचं जागावटपही जाहीर झालं. मात्र, भाजप-शिवसेनेचं जागावाटप तर सोडाच पण युती तरी होणार का? इथपर्यंत संदिग्धता आहे. हे कमी म्हणून की काय परवा नाशकात आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा मुंबईत आलेले भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी शिवसेनेला मारलेले टोले-टोमणे यामुळे भाजपचा मूड वेगळाच असल्याचंही बोललं जातंय. 'सगळं कसं समसमान हवं' असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना कितीही वाटत असलं तरी, केंद्रात मोदी व भाजपची वाढलेली ताकद, विरोधी पक्षातल्या बड्या नेत्यांचं झालेलं इनकमिंग आणि २०१४मधला भाजपचा महाराष्ट्रातला स्ट्राईक रेट पाहता भाजप ५०-५० वर कधीच तयार होणार नाही असं दिसतंय. त्यातूनच सध्या भाजप-सेनेदरम्यान जागापाटपाचे अनेक फॉर्म्युले पुढे येतायत. फॉर्म्युला 1 भाजप-  135 शिवसेना- 135 मित्रपक्ष- 18 ---------------------------- फॉर्म्युला 2 भाजप- 171 शिवसेना- 117 मित्रपक्ष- भाजपच्या कोट्यातून  -------------------------------- फॉर्म्युला 3 भाजप- 162 शिवसेना- 126 मित्रपक्ष- भाजपच्या कोट्यातून ------------------------------------ फॉर्म्युला 4 भाजप- 150 शिवसेना-120 मित्रपक्ष- 18 ------------------------------------- फॉर्म्युला 5 भाजप- 145 शिवसेना-125 मित्रपक्ष- 18 --------------------------------------- वरील सर्व फॉर्म्युल्यांमध्ये शिवसेनेला १२० जागांपुढे किती जागा मिळू शकतील, हा प्रश्नच आहे. भाजपचा प्रभाव एकवेळ बाजूला ठेवून बघितलं, तरी २०१४ला शिवसेनेला स्वतंत्र लढूनही 63 जागाच मिळवता आल्या होत्या. तर, भाजपनं मात्र शंभरीपार १२२ आमदार जिंकवून आणले. त्यामुळे शिवसेनेला जास्तीच्या जागा मागताना या 'स्ट्राईक रेट'चा विचार करावा लागणार आहे. जागावाटप कसंही झालं तरी काहीप्रमाणात नुकसान भाजपलाच सोसावं लागणार आहे. उदाहरणार्थ, पुण्यात सर्वच्या सर्व आमदारकीच्या ८ जागा भाजपकडे आहेत. तिथं जागा सोडणं म्हणजे स्टॅंडिग आमदार गमावणं होय. असंच नुकसान भाजपला राज्यभर सोसावं लागणार आहे. जागावाटपात भाजपच्या वाट्याला जास्त डोकेदुखी आहे. कारण, मुळात २०१४ जिंकलेल्या जागांवरील प्रस्थापिताविरूद्ध भाजपमधील अन्य इच्छुक, त्यांच्या जोडीला त्याच भागात आतापर्यंत विरोधी पक्षात असलेले भाजपमध्ये आल्यानं त्यांची महत्वाकांक्षा आणि यानंतर युती होऊन जागावाटप झालंच तर बंडखोरीची शक्यता. शिवसेनेलाही काही जागा अशाचप्रकारे गमवाव्या लागणार असल्या तरी भाजपचा तोटा मोठा असू शकतो. एकीकडे, जिथे २०१४ला दुसऱ्या क्रमांकाची मतं घेतलेल्या जागा भाजप मागत असताना, स्वत:च्या जिंकलेल्या जागा देणं कठीण गोष्ट ठरणार आहे. दुसरीकडे, महायुतीतले मित्रपक्ष हे खरं सांगायचं तर भाजपचे मित्रपक्ष आहेत. चर्चा तर अशीही आहे की महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्ष, रामदास आठवलेंच्या आरपीआय, सदाभाऊ खोतांना 'कमळ' चिन्हावरच लढण्यासं सांगितलं जाऊ शकतं. तेव्हा, त्यांना जागा सोडणं हे मूलत: भाजपच्याच हिताचं असेल हे सेनेलाही कळतंय. त्याचवेळी, केंद्रात ३००पार जागांसह पुन्हा आलेलं मोदी सरकार, महाराष्ट्रात भाजपमध्ये झालेलं दिग्गज विरोधी पक्षांचं इनकमिंग आणि त्यामुळे आपोआपच त्यांच्या स्थानिक सत्तांचं भाजपकरण होणं (उदा. नवी मुंबई महापालिका) यामुळे भाजप आता 'धाकट्या भाऊ' होण्याच्या मुळीच मूडमध्ये नाही. किंबहुना, गेली पाच वर्ष शिवसेनेनं सत्तेत राहून विरोधच फार केल्यानं, सध्या मुख्यमंत्रीपदाची स्वप्न पाहणाऱ्या सेनेच्या महत्वाकांक्षेला फार खतपाणी भाजप घालेल अशी स्थिती नाही. शिवसेना तीच्या राजकीय प्रवासातल्या अत्यंत वेगळ्या कालखंडातून जात आहे. एक काळ होता जेव्हा सत्ता नसूनही भाजपच्या तुलनेत शिवसेनेचा प्रभाव मोठा होता. मात्र, २०१४पासून सत्तेत असूनही शिवसेना धाकटी होऊ लागली आहे. सेना नेते खा. संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना-भाजप हे जुळे भाऊ असल्याचं केलेलं वक्तव्यं यामुळेच महत्वाचं आहे. राऊतांपासून रावतेंपर्यंत समान जागावाटप, शिवसेनेचा मुख्यमंत्री यासंदर्भात विधानं केली गेली. यानंतर आता व्यावहारिक भूमिका घ्यावी लागल्यास ती शिवसैनिकांना पटवून द्यावी लागणार आहे. एकूणच, अंतिम जागावाटपात शिवसेनेच्या वाट्याला १२० ते १३०पेक्षा जास्त जागा येणार नाहीत, हे स्पष्ट आहे. मात्र, असं झाल्यास 'समसमान'ची ठाम भूमिका, आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद यावर आग्रही असणाऱ्या शिवसेनेची महायुतीअंतर्गत आणि सरकार आल्यास तिथंही अडचण होईल, हे उघड आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget