Exit Poll Delhi : दिल्लीतील 2020 आणि 2025 च्या एक्झिट पोलमध्ये काय केले होतं भाकीत, निकालात कितीने पडला फरक? आकडेवारी एका क्लिकवर
Delhi Exit Poll Results 2025 : दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचे मतदान आज (5 फेब्रुवारी) पार पडले आहे. बहुतांश एक्झिट पोलमध्ये दिल्लीची सत्ता भाजपकडे जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीचे मतदान आज (5 फेब्रुवारी) पार पडले आहे. मतदारराजाचा कौल आता मतपेटीत कैद झाला असून दिल्लीच्या सिंहासनी नेमकं कोण विराजमान होणार हे निकालाच्या दिवशीच कळणार आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी निवडणूक झाली असून आता 8 फेब्रुवारी रोजी त्याचा निकाल जाहीर होणार आहे. मात्र या निवडणूकीचे आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, विविध सर्वेक्षण संस्थांनी संध्याकाळी 6.30 नंतर एक्झिट पोलचे (Exit Poll Delhi) निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाला (आप) मोठा फटका बसताना दिसत आहे. 25 वर्षांनंतर दिल्लीत भाजप पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे.
दरम्यान, 2020 आणि 2025 च्या विधानसभा निवडणुकांचे एक्झिट पोलच्या निकालाचे आकडे नेमके काय? आणि ते अंतिम निकालाच्या किती जवळ होते हे समजून घेऊयात.
2020 चा एक्झिट पोलची आकडेवारी काय?
2020च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत, सरासरी आठ एक्झिट पोलने AAP ला 54 जागांसह प्रचंड विजयाचा अंदाज वर्तवला होता, तर भाजपला 15 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. तर काँग्रेसला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला होता.
यावेळी सर्वेक्षणाची अचूकता पाच वर्षांपूर्वीच्या तुलनेत खूपच चांगली होती. कारण अंतिम निकालांमध्ये आपने 62 जागा जिंकल्या आणि भाजपने 8 जागा जिंकल्या होत्या. 'इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडिया' ने वर्तवलेला अंदाज मतदानाच्या अंतिम निकालाच्या सर्वात जवळ होता. त्यात आपला 59 ते 68 जागा आणि भाजपला 2 ते 11 जागा मिळाल्या. तर इंडिया टुडे-ॲक्सिस माय इंडिया, एबीपी न्यूज-सीव्होटर आणि रिपब्लिक टीव्ही-जन की बात या तीन संस्थांनीच आम आदमी पार्टी पुन्हा 60 जागांचा टप्पा ओलांडू शकेल, असा अंदाज वर्तवला होता.
2020 च्या निवडणुकीत कामगिरी कशी होती?
'आप'ने 2020 साली अरविंद केजरीवाल यांचे नाव पुढे करत निवडणूक लढवली होती. तर भाजप आणि काँग्रेसने कोणताही चेहरा जाहीर न करता मैदानात उतरली होती. त्यावेळी सत्ताधारी असलेल्या 'आप' ने पुन्हा प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकली होती. त्यात पाच जागांचे नुकसान झाले असले तरी. तिला 67 जागा जिंकता आल्या. तर मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे तर, 0.71 ची घसरण झाली होती, परंतु तरीही 53.57 टक्के मते मिळवण्यात यश आले. त्याचवेळी दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने आपली कामगिरी सुधारत पाच जागांच्या वाढीसह 8 जागा जिंकल्या. त्यांच्या मतांच्या टक्केवारीत वाढ झाली आणि त्यांना 38.51 मते मिळाली. तर काँग्रेसला खातेही उघडता आले नाही.
एक्झिट पोलनुसार 2025 ला कुणाचे पारडं जड?
चाणक्य स्ट्रॅटेजीजचा एक्झिट पोल
भाजपचा- 39-44 जागा
आप- 25-28 जागा
काँग्रेसला - 2-3 जागा
पोल डायरीचा एक्झिट पोल
भाजपचा अंदाज 42-50 जागा - पोल डायरी
AAP साठी 18-25 जागा शक्य - पोल डायरी
काँग्रेसला 0-2 जागा मिळण्याची शक्यता - पोल डायरी
45% मते भाजपला, 42% मते AAP - पोल डायरी
पीपल्स इनसाइटचा एक्झिट पोल
भाजपला 40-44 जागांचा अंदाज - पीपल्स इनसाइट
AAP 25-29 जागांचा अंदाज - पीपल्स इनसाइट
काँग्रेसचा अंदाज ०-१ जागा - पीपल्स इनसाइट
| मतदारसंघ | विधानसभेची संख्या | टक्केवारी | |
| 1 | मध्य | 07 | 55.24% |
| 2 | पूर्व | 06 | 58.98% |
| 3 | नवी दिल्ली | 06 | 54.37% |
| 4 | उत्तर | 08 | 57.24% |
| 5 | उत्तर-पूर्व | 05 | 63.83% |
| 6 | उत्तर-पश्चिम | 07 | 58.05% |
| 7 | शाहदरा | 05 | 61.35% |
| 8 | दक्षिण | 05 | 55.72% |
| 9 | दक्षिण-पूर्व | 07 | 53.77% |
| 10 | दक्षिण-पश्चिम | 07 | 58.86% |
| 11 | पश्चिम | 07 | 57.42% |
इतर महत्वाच्या बातम्या
Exit Poll Delhi : केजरीवालांचा गड ढासळणार? दिल्लीत भाजपची सरशी? पहिल्या आकडेवारीत आपला झटका, एक्झिट पोलची धक्कादायक आकडेवारी




















