एक्स्प्लोर

महापालिका निवडणूक : धुळ्यात आमदार गोटे यांच्या गाडीवर दगडफेक, मतदानाला सुरुवात

गाडीवर दगड फेकले त्यावेळी ते धावले असता त्यांना दम्याच्या त्रास सुरू झाला आणि त्यांचा बीपी वाढल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे : भाजपमधील अंतर्गत वादामुळे चर्चेत असलेली आणि राज्यभराचे लक्ष लागून असलेल्या धुळे महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदानाच्या पूर्वसंध्येला भाजपच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या आमदार अनिल गोटे यांच्या वाहनावर हल्ला झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले आहे. शनिवारी रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास कल्याण भवन जवळ दोन जणांनी दुचाकीवरून येऊन दगडफेक केली. या घटनेत वाहनाचे पुढील काच फुटले. मात्र यावेळी गोटे गाडीमध्ये नसल्याने बचावले. मात्र त्यांच्या गाडीवर दगड फेकले त्यावेळी ते धावले असता त्यांना दम्याच्या त्रास सुरू झाला आणि त्यांचा बीपी वाढल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान भाजपच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केला असल्याचा आरोप आमदार गोटे यांनी केला असून मी गुन्हा दाखल करणार नाही. कारण पोलिसांना भाजपनं मॅनेज केलंय, असा आरोपही त्यांनी केला आहे. महापालिका निवडणूक : धुळ्यात आमदार गोटे यांच्या गाडीवर दगडफेक, मतदानाला सुरुवात गोटे हे कल्याण भवन येथे असताना त्यांचे चालक साजिद खान हे वाहन क्रमांक एमएच 18 एजे 3366 कल्याण भवन परिसरातून बाहेर काढत होते. यावेळी दोन जण दुचाकीवर आले. त्यांनी समोरून चालकाशेजारील बाजूला काचावर दगडफेक केली आणि काही क्षणात ते फरार झाले. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी आमदार गोटे यांच्या समर्थकांकडून भाजपच्या नेत्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यामुळे काही प्रमाणात तणाव वाढला असून तणावपूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे.

 धुळे महानगरपालिकेसाठी मतदान, प्रशासन सज्ज

भाजपच्या अंतर्गत वादामुळे राज्यभर चर्चेत असलेल्या या निवडणुकीसाठी 450 बूथवर मतदान होत आहे. त्यातील 120 मतदान केंद्र संवेदनशील तर 19 मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील घोषित करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त आहे. व्हिडीओ कॅमेऱ्यासोबतच ड्रोन कॅमेराने देखील मतदान केंद्रावर नजर ठेवण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी एक पोलीस अधीक्षक, एक एडिशनल एसपी, 4 डीवायएसपी, शंभर अधिकारी आणि दीड हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. धुळे आणि जळगाव या दोन जिल्ह्यातून अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली आहे. धुळे महानगरपालिकेत 74 जागा आहेत. यापैकी 73 जागांसाठी मतदान होत आहे. यातील एक जागा बिनविरोध आली आहे. प्रभाग 12 मधीप अ मध्ये समाजवादी पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. 3 लाख 29 हजार 569 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. यामध्ये पुरुष मतदार 1 लाख 74 हजार 696 तर महिला मतदार 1 लाख 54 हजार 807 असतील तर (तृतीयपंथी) इतर मतदार 13 आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर 6 कर्मचारी आहेत. तर 450 ईव्हीएम मशीनवर मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील. 10 टक्के ईव्हीएम मशीन एखाद्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास राखीव आहेत. गत महापालिका निवडणुकीत 62 टक्के मतदान झाले होते. यावर्षी भाजपचे आमदार अनिल गोटे यांनीच भाजपच्या विरोधात शड्डू ठोकल्याने लढत अधिक चुरशीची झाली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai University Senate Election 2024: ठाकरेंच्या युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत10 पैकी 10 जागा जिंकल्या; आदित्य ठाकरे म्हणाले...
युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या;आदित्य ठाकरे म्हणाले..
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Supriya Sule Speech : मलिकांच्या मुलीचे अश्रू मी पाहिलेत, भाजपने त्यांची माफी मागावी...Riya Barde वर पोलिसांची कोणती कारवाई? भारतात बांगलादेशींची घुसखोरी का वाढतेय? Special ReportDevendra Fadnavis : तोडफोड, मोडतोड, फडणवीसांच्या ऑफिसमध्ये महिलेची घुसखोरी कशी? Special ReportMumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai University Senate Election 2024: ठाकरेंच्या युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत10 पैकी 10 जागा जिंकल्या; आदित्य ठाकरे म्हणाले...
युवासेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत 10 पैकी 10 जागा जिंकल्या;आदित्य ठाकरे म्हणाले..
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
Embed widget