पुढील वर्षी जगात निवडणुकांचा हंगाम! मोदी-पुतीनसह दिग्गज आजमावणार नशीब
जवळपास 50 देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका (Election) होताना दिसतील. मोदींपासून (Narendra Modi) ते ट्रम्पपर्यंत, पुतीनपासून ते शेख हसीनापर्यंत नेते निवडणुकीच्या मैदानात आपलं नशीब आजमावणार आहेत.
मुंबई : भारतात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहे. सोबतच, जगातील जवळपास 50 देशांमध्ये सार्वत्रिक निवडणुका (Election) होताना दिसतील. मोदींपासून (Narendra Modi) ते ट्रम्पपर्यंत, पुतीनपासून ते शेख हसीनापर्यंत नेते निवडणुकीच्या मैदानात आपलं नशीब आजमावणार आहेत. अशात, कोरोनामुळे मंदावलेली जागतिक अर्थव्यवस्था, वाढलेली महागाई, बोरोजगारी आणि सुरु असलेली युद्ध यावर सर्वांचे लक्ष असेल.
2023 च्या शेवट होत असताना 2024 ची सुरुवात ऐतिहासिक असणार आहे… 2024 हे वर्ष जगात 50 देशांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीच्या सार्वत्रिक कार्यक्रमांनी भरलेलं असणार आहे… त्यात सुरु असलेली दोन युद्ध, कोव्हिडनंतर मंदावलेली अर्थव्यवस्था आणि महागाई याकडे सर्वांचं लक्ष असेल…
पुढील वर्षी जगात निवडणुकांचा हंगाम!
भारत - एप्रिल ते मे
पाकिस्तान - फेब्रुवारी
बांग्लादेश - जानेवारी
तायवान राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक - जानेवारी
रशियन राष्ट्रध्यक्ष निवडणूक - मार्च
इंडोनेशिया सार्वत्रिक निवडणुका - फेब्रुवारी
युरोपीयन संसदीय निवडणुका - जून
अमेरीका सार्वत्रिक निवडणूक - नोव्हेबंर
मॅक्सिको राष्ट्रध्यक्षपदाची निवडणूक - जून
दक्षिण आफ्रिकेतील सर्वत्र निवडणुका - जून
जगातील प्रमुख 40 देशांमध्ये निवडणुका होतील. ज्याची लोकसंख्या 400 कोटींच्या जवळपास आहे आणि ह्या देशांचा आर्थिक विकास दर साधारण 60 टक्क्यांपर्यंत आहे. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांकडे सर्वांचे लक्ष असेल.
भारतामधील स्थिती काय?
भारतात सर्वत्र निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. भारतातील सर्वच पक्षांनी सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. आशियाई देशांसोबतच सर्वच जगाचे लक्ष भारतातील निवडणुकांकडे लागले आहे. भारत झपाट्याने मोठी आर्थिक आघाडी घेताना दिसत आहे, अशात साऱ्या नजरा भारताकडे असतील… नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाचे दावेदार असणार आहे… एकीकडे 28 पक्ष एकत्रित येत इंडिया आघाडीनं मोदींना आव्हान दिलंय… मात्र, पूर्ण झालेले राम मंदिर आणि जगासमोर हिंदुत्वाचा चेहरा म्हणून पुढे आलेल्या नरेंद्र मोदींना याचा किती फायदा होतो याकडे साऱ्या जगाचे लक्ष असेल.
अमेरिकेत काय स्थिती ?
अमेरीका जगातील सर्वात बलाढ्य अर्थव्यवस्था… वाढती महागाई, पुन्हा वाढते कोरोनाचे आकडे, बेरोजगारी आणि आर्थिक मंदीमुळे अमेरीका अडचणीत आहे… अशात, ट्रम्प आणि बायडेन पुन्हा एकदा सामनेसामने बघायला मिळू शकतात. बायडेन आणि ट्रम्प यांना अजून तरी डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन्सने उमेदवार जाहीर केले नसले तरी त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाऊ शकते.
युक्रेन-रशिया युद्धाचा परिणाम?
युक्रेन-रशिया युद्ध आणि मध्य पूर्वेतील इस्त्रायल-हमास युद्धाने जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होताना दिसले… ज्याचा फायदा भारत, चीन आणि तुर्कीने रशियाचे तेल, वायु आणि कोळसा खरेदी करत घेतल्याचं दिसलं… दुसरीकडे, चीन आणि अमेरीका यांच्यात तणाव जरी असला तरी इलेक्ट्रिक वाहने, सेमिकंडक्टर्स आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी आवश्यक समजल्या जाणाऱ्या वस्तूंसाठी अमेरीकेला चीनकडे मदत मागावी लागली… अशात, युद्धात सर्वांनीच हात धुवून घेतल्यानंतर रशिया आणि युक्रेनसारख्या देशात देखील निवडणुका होतील… दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु असले तरी पुतीन यांनी युद्धातून अद्याप माघार घेतलेली नाही… अशात राष्ट्रध्यक्ष असलेल्या पुतीन यांचा विजय निश्चित मानला जातोय… मात्र, युक्रेनमध्ये व्होलोदिमिर झेलेन्स्की यांना मात्र युद्धामुळे सार्वत्रिक निवडणुका घेणं अवघड होणार आहे… अशात, आर्थिक स्तरावर देखील युक्रेनला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो…
मागील तीन वर्षात जगातील अनेक देशात बदल पाहायला मिळाले आहेत…. मग तो कोरोना असो किंवा सध्याच्या घडीला सुरु असलेली दोन युद्ध… ज्याचे परिणाम दीर्घकाळ दिसतील असेच संकेत आहेत… एकीकडे अनेक देशात हुकुमशाही फोफावत असताना लोकशाही मार्गाने निवडणुका होणं जगासाठी दिलासादायक बाबच म्हणावी लागेल…