एक्स्प्लोर

Election 2022: पाच राज्यांचा फैसला 10 मार्चला! जाणून घ्या कोणत्या राज्यात किती टक्के झाले मतदान

Election 2022 : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे.

Election 2022 : देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली आहे. 10 मार्चला या निवडणुकांचा निकाल जाहीर होणार आहे. यातच उत्तर प्रदेशात सात टप्प्यात, मणिपूरमध्ये दोन टप्प्यात, गोवा, पंजाब आणि उत्तराखंडमध्ये एका टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली आहे.  अशातच कोणत्या राज्यात किती टक्के मतदान झालं आहे, हे आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे सांगणार आहोत. 

उत्तर प्रदेश 

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक 2022 ही प्रामुख्याने तीन मुद्द्यांवर खूप महत्वाची होती. एकतर राम मंदिराचे बांधकाम सुरू झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यानंतर कोरोनाच्या महाभयानक संकटाचा सामना करताना उत्तर प्रदेशात झालेली परिस्थिती आणि शेतकरी आंदोलनाचा परिणाम या निवडणुकीवर पाहायला मिळू शकतो. असं म्हणतात की, दिल्लीच्या सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशमधून निघतो. म्हणूनच या निवडणुकीत भाजपने आपली पूर्ण ताकद लावली होती. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात अनेक सभा घेतल्या. तर अखिलेश यादव यांनी देखील आपला पूर्ण जोर या निवडणुकीत लावल्याचं दिसलं. मात्र मायावती या निवडणुकीत हव्या तितक्या सक्रिय दिसल्या नाहीत. आता उत्तर प्रदेशात 403 जागांसाठी सातही टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. मतदार राजा कोणाच्या बाजूने निकाल देणार हे 10 मार्चला कळणार आहे.       

कोणत्या टप्यात किती झालं मतदान?

  • पहिल्या टप्प्यात 10 फेब्रुवारी रोजी 62.43 टक्के मतदान 
  • दुसऱ्या टप्प्यात 14 फेब्रुवारी रोजी 64.66 टक्के मतदान
  • तिसऱ्या टप्प्यात 20 फेब्रुवारी रोजी 62.28 टक्के मतदान  
  • चौथ्या टप्प्यात 23 फेब्रुवारी रोजी 62.76 टक्के मतदान
  • पाचव्या टप्प्यात 27 फेब्रुवारी रोजी 58.35 टक्के मतदान  
  • सहाव्या टप्प्यात 3 मार्च रोजी 56.43 टक्के मतदान 
  • सातव्या टप्प्यात 7 मार्च रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 46.40 टक्के मतदान

मणिपूर 

मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठी 28 फेब्रुवारी आणि 5 मार्च अशा दोन टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात मुख्य लढत आहे. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यात 78.03 टक्के मतदान झाले. तर दुसऱ्या टप्प्यात 78.49 टक्के मतदान झाले.  

गोवा 

गोव्यात विधानसभेच्या 40 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत भाजपाला आवाहन देण्यासाठी काँग्रेस सोबतच शिवसेना आणि तृणमूल काँग्रेस आपल्या पूर्ण ताकदीने निवडणूक रिंगणात उतरली आहे. गोव्यात एकाच टप्प्यात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत 75.29 टक्के लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.   

पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान 

117 विधानसभा जागांसाठी पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान पार पडले. मतदारांनी समिश्र प्रतिसाद दर्शवला. पंजाबमध्ये 65.32 टक्के मतदान झाले होते. पंजाबमध्ये अनेक दिग्गज नेत्यांनी प्रचार सभा घेतल्या होत्या. अरविंद केजरीवाल, राहुल गांधी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी प्रचार केला होता.

उत्तराखंड 

उत्तराखंडमध्ये एकाच टप्प्यात 70 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. भाजपची सत्ता असलेल्या उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी, काँग्रेसचे हरीश रावत आणि आम आदमी पक्षाचे कर्नल (सेनि) अजय कोथियाल यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली आहे. या विधानसभा निवडणुकीत 59.37 टक्के मतदान झाले आहे.   

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget