एक्स्प्लोर

Eknath Shinde: ...म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीतून घ्यावी लागली माघार?; तो आकडा अन् सर्व 'गणित' बिघडले!

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून नेमकी माघार का घेतली, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

Maharashtra CM Eknath Shinde मुंबई: तुम्हाला आमच्यामुळे कुठेही अडचण येईल, असं आम्ही काहीही करणार नाही. कोणताही निर्णय घ्या...निर्णय घेताना माझी अडचण आहे, असं काही वाटून घेऊ नका, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना सांगितल्याची माहिती स्वत: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली. काल (27 नोव्हेंबर)ला पत्रकार परिषद घेत एकनाथ शिंदे यांनी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. मात्र याचदरम्यान एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रि‍पदाच्या शर्यतीतून नेमकी माघार का घेतली, याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. 

अन् शिंदे गटाचे सर्व गणित बिघडले?

लोकसत्ता या दैनिक वृत्तापत्राच्या वृत्तानूसार, भाजप वरिष्ठांनी तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळणार नाही, अशी स्पष्ट भूमिका मांडल्याने एकनाथ शिंदे यांना माघार घ्यायला लागल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला 130 पेक्षा जागा मिळतील, असा कोणालाच अंदाज नव्हता. भाजपच्या नेत्यांना देखील इतक्या जागा मिळतील असं वाटलं नव्हतं. भाजपचा आकडा 132 पर्यंत पोहचला आणि शिंदे गटाचे सर्व गणित बिघडल्याचे बोलले जात आहे.

अमित शाह, नरेंद्र मोदींच्या निर्णयाला आमच्या पक्षाचा पाठिंबा- एकनाथ शिंदे

अमित शाह, नरेंद्र मोदी जो निर्णय घेतील त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे. महायुतीचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा द्यायला मी इथे उभा आहे, एकनाथ शिंदेंनी स्पष्टपणे सांगितले. कुठही घोडं अडलेलं नाही. मी कुठेही काही अडून धरलेलं नाही, असंही एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही नाराज वगैरे नाही, आम्ही नाराज होणारे नाही लढणारे लोक आहोत. एवढा मोठा विजय मिळाला, आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय असा ऐताहासिक विजय असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले. 

अमित शाह यांनी महाराष्ट्रातील समीकरणं समजून घेतली-

मराठा समाज आणि मुख्यमंत्रिपदाचा चेहरा याबाबत केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आढावा घेतला. भाजपची महाराष्ट्रात सत्ता आल्यापासून म्हणजेच 2014 ते 2024 पर्यंत मराठा समाजाची आंदोलन, कोर्टाचे निकाल, मराठा नेत्यांची भूमिकेचा आढावा घेतला. भवितव्याच्या दृष्टीनं मराठा चेहरा किती महत्वाचा आहे. याबाबत सर्व गणितांची मांडणी करण्यात आली.  आगामी निवडणुका, देवेंद्र फडणवीसांचा चेहरा आणि मराठा, ओबीसीचा मतांबाबत चर्चा झाली. अमित शाह आणि विनोद तावडे यांच्यात महाराष्ट्र, मुख्यमंत्री आणि मराठा या समीकरणावर चर्चा झाली. अमित शाह यांनी विनोद तावडेंकडून महाराष्ट्रातील मराठी समाजाची समीकरणं समजून घेतली. देवेंद्र फडणवीस यांची राज्यात पुन्हा मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्यास मराठा मते कशी टिकवता येतील, यावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्रात बिगर मराठा मुख्यमंत्री केल्यास मराठा समाजाची मतांवर किती परिणाम होऊ शकतो याची बेरीजवजाबाकी करण्यात आली. मराठा चेहऱ्याऐवजी दुसरा चेहरा दिला तर मराठा मतं दुखावण्याची चिंता केंद्रीय नेतृत्वाला आहे.

संबंधित बातमी:

विनोद तावडेंची एन्ट्री अन् महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबत पुन्हा सस्पेन्स वाढला; बैठकीत सगळी गणितं मांडली, दिल्लीत हालचाली वाढल्या!

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने

व्हिडीओ

Alaknanda Galaxy Vastav 250 : अलकनंदा : नव्या दिर्घिकेचा शोध; विश्वाचे रहस्य उलगडण्यास होणार मदत
Supriya Sule : भारत सरकारने Indigo वर कारवाई केली पाहिजे, सुप्रिया सुळेंची मागणी
Hapus Mango हापूस आंब्यावरही गुजरातचा दावा; गांंधीनगर,नवसारी विद्यापीठांचा भौगोलिक मानांकनासाठी अर्ज
Special Report Girish Mahajan : वृक्षतोडीला वाढता विरोध, सरकार काय करणार? साधुग्राम कुठे उभारणार?
Special Report Akola School : जयजयकार पाकिस्तानचा, पोलिसांकडून तपास; वास्तव काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? व्हिडिओ तुफान व्हायरल
विराट-कुलदीपचा कधी न पाहिलेला कपल डान्स! विशाखापट्टणम वनडेत नेमकं काय घडलं? Video तुफान व्हायरल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 06 डिसेंबर 2025 | शनिवार
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
गुजरातमधल्या वलसाडच्या आंब्याला हापूस मानांकन, कोकणवासी संतप्त, न्यायालयीन लढाई लढणार; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Elon Musk : युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
युरोपियन युनियनकडून इलॉन मस्क यांच्या X ला 12 हजार कोटींचा दणका, ब्लू टिकच्या वादावरुन अमेरिका-युरोप आमनेसामने
The Family Man Season : ‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
‘द फॅमिली मॅन 4’ मध्ये मोठा ट्विस्ट! राज–डीकेचा खुलासा; चौथा भाग अधिक इंट्रेस्टिंग
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
उच्च न्यायालय गंभीर होताच मंत्रालयाचे तीन वरिष्ठ अधिकारी मेळघाटात; 15 दिवसांत समितीला अहवाल देणार
IndiGo Flight Cancellations: विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
विमाने जमिनीवर, प्रवासी वाऱ्यावर अन् इंडिगो देशव्यापी धारेवर! आता केंद्राकडून प्रवाशांना रिफंड करण्यासाठी डेडलाईन
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
6 डिसेंबर : टीम इंडियातील एकाच दिवशी पाच जणांचा बर्थडे! यापैकी तीन संघाचे अविभाज्य भाग, विक्रमांचा अक्षरश: रतीब घातला
Embed widget