एक्स्प्लोर

Mahayuti Cabinet Allocation: गिरीश महाजनांच्या शिष्टाईनंतर कोंडी फुटली? एकनाथ शिंदे महायुतीच्या नेत्यांसोबत खातेवाटपाबाबत चर्चा करण्याची शक्यता

Maharashtra Mahayuti Government: भाजपच्या संकटमोचकाने पुन्हा कोंडी फोडली, एकनाथ शिंदे महायुतीच्या नेत्यांसोबत खातेवाटपाबाबत चर्चा करायला तयार असल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई: देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू गिरीश महाजन यांनी सोमवारी रात्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यानंतर महायुतीचा खातेवाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी काल रात्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झाली. या चर्चेनंतर मंगळवारी महायुतीच्या प्रमुख नेत्यांमध्ये खातेवाटपाबाबत (Mahayuti Cabinet) चर्चेला सुरुवात होईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या 5 डिसेंबरच्या शपविधीपूर्वी खातेवाटपाचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे. ही भाजप आणि अजित पवार गटासाठी दिलासादायक बाब ठरु शकते. मात्र, भाजपकडून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना हवे असलेले गृहखाते दिले जाणार की नाही, याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. शिवसेनेला गृहखाते न दिल्यास भाजप एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री म्हणून महायुती सरकारमध्ये कशाप्रकारे सामील करुन घेणार, हेदेखील पाहणे महत्त्वाचे ठरेल. 

राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असतानाही अद्याप एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झालेली नाही. त्यामुळे महायुती सरकारच्या खातेवाटपासंदर्भातील चर्चा अद्याप प्रलंबित आहे. त्यामुळे महायुतीच्या गोटातील अस्वस्थता वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या मोबदल्यात भाजपकडे गृहमंत्रीपदाची मागणी केली होती. मात्र, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे केंद्रातील नेते गृहखाते शिवसेनेला देण्यास तयार नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा आहे. ते सुरुवातीला त्यांच्या मूळगावी जाऊन राहिले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे  हे आजारपणामुळे ठाण्यातील निवासस्थानीच थांबून होते. मात्र, गिरीश महाजन यांच्या भेटीमुळे आता एकनाथ शिंदे मुंबईत येऊन देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी खातेवाटपाबाबत चर्चा करु शकतात. 

भाजपची नेता निवड उद्या

भाजप विधिमंडळ पक्षाचा नवा नेता निवडण्यासाठी बुधवारी मुंबईत बैठक पार पडेल. त्यासाठी भाजपने निरीक्षक म्हणून नेमलेले विजय रुपाणी आणि निर्मला सीतारामन या मंगळवारी संध्याकाळी मुंबईत दाखल होतील. बुधवारी सकाळी 10 वाजता विधानभवनात भाजपच्या आमदारांची बैठक पार पडेल. यावेळी देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ नेतेपदी निवड होईल, असे सांगितले जात आहे. यानंतर महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करतील. 

सूत्रांच्या माहितीनुसार, महायुती सरकारचा शपथविधी गुरुवारी संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर संपन्न होईल. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, जे.पी. नड्डा, नितीन गडकरी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अनेक मान्यवर, धर्मगुरु, संत-महंत उपस्थित राहणार आहेत. 

आणखी वाचा

आमच्या नेत्याने शिवसेना कोणाची हे सिद्ध करुन दाखवलंय, कशा रितीने मान राखायचा हे दिल्लीने ठरवायचं, दीपक केसरकरांचं सूचक वक्तव्य

महत्त्वाच्या बातम्या

Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget