एक्स्प्लोर

Eknath Shinde's Mission 22 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मिशन 22

Eknath Shinde's Mission 22 : आपण 22 जागा लढवणार असल्याचं शिंदेंच्या खासदारांनी जाहीर केलं आहे. आता राज्यात जागा 48 त्यात भाजपचं मिशन 45 असताना शिंदेच्या खासदारांचा 22 जागांचा दावा हे मोठं आव्हान मानलं जात आहे. 

Eknath Shinde's Mission 22 : आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2023) कोण किती जागा लढवणार आहे यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही, मग ती महाविकास आघाडी असो किंवा शिवसेना भाजपची युती असो. सध्या प्रत्येक पक्ष आपल्या परीने स्वतःच्या पक्षाचे आकडे जाहीर करत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) देखील आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये 22 जागा लढवण्याच्या तयारीत आहेत.

लोकसभेच्या एकूण जागा 48 

त्यात भाजपचं मिशन 45 

शिंदेंचा 22 जागांवर डोळा 

ठाकरेंचा 19 जागांवर दावा

तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस समसमान वाटपावर ठाम 

प्रत्येक पक्षाला लोकसभेत जास्तीत जास्त जागा हव्या आहेत. त्यासाठीची मोर्चेबांधणी सर्वांनी सुरु केली आहे. ठाकरे आणि भाजपची युती होती तेव्हा चित्र वेगळं होतं. आता ठाकरेंपासून फारकत घेत एकनाथ शिंदे 40 आमदार आणि 13 खासदारांसह भाजपसोबत आले आहेत. त्यामुळे लोकसभेच्या जागांचा तिढा ठाकरे आणि शिंदेसमोरही आहे पण आपण 22 जागा लढवणार असल्याचं शिंदेंच्या खासदारांनी जाहीर केलं आहे. आता राज्यात जागा 48 त्यात भाजपचं मिशन 45 असताना शिंदेच्या खासदारांचा 22 जागांचा दावा हे मोठं आव्हान मानलं जात आहे. 

  • 2019 साली भाजप आणि शिवसेनेनं युतीमध्ये निवडणूक लढवली होती 
  • त्यामध्ये युतीला 48 पैकी 41 जागांवर विजय मिळवला होता
  • भाजपने 25 जागा लढवून 23 जागांवर तर शिवसेनेने 22 जागा लढवून 19 जागांवर विजय मिळवला होता 
  • काँग्रेस आणि राष्ट्रवादीने लोकसभेच्या अनुक्रमे 25 आणि 19 जागा लढवल्या होत्या, तर चार जागांवर घटकपक्षाचे उमेदवार उभे होते.
  • या आघाडीला फक्त 5 जागांवर यश आलं होतं त्यात राष्ट्रवादीच्या 4 आणि काँग्रेसच्या फक्त 1 जागेचा समावेश होता 
  • आता 2019 पासून परिस्थिती वेगळी झाली आहे, त्यामुळे जागावाटपचं चित्रही वेगळंच असेल 

शिंदेसोबत असलेल्या खासदार आणि त्यांच्या मतदारसंघांवर 

1. श्रीकांत शिंदे - कल्याण
2. राहुल शेवाळे - दक्षिण मध्य मुंबई
3. हेमंत पाटील - हिंगोली
4. प्रतापराव जाधव - बुलडाणा
5. कृपाल तुमाणे - रामटेक
6. भावना गवळी - यवतमाळ-वाशिम
7. श्रीरंग बारणे - मावळ
8. संजय मंडलिक - कोल्हापूर
9. धैर्यशील माने - हातकणंगले
10. सदाशिव लोखंडे - शिर्डी
11. हेमंत गोडसे - नाशिक
12. राजेंद्र गावित - पालघर

2019 मध्ये पराभूत झालेले मदारसंघ आणि उमेदवार 

1) रायगड - अनंत गीते 
2) शिरुर - आढळराव पाटील 
3) अमरावती - आनंदराव अडसूळ 
4) छत्रपती संभाजीनगर - चंद्रकांत खैरे 

ठाकरेंसोबत असलेले खासदार 

1  संजय जाधव - परभणी
2. ओमराजे निंबाळकर - उस्मानाबाद
3. अरविंद सावंत - मुंबई दक्षिण 
4. विनायक राऊत - रत्नागिरी सिंधुदुर्ग

सध्या एकनाथ शिंदेकडे 13 खासदार आहेत आणखी 9 नव्या चेहऱ्यांचा शोध त्यांना घ्यायचा आहे. 2019 मध्ये 4 उमेदवार पराभूत झाले होते त्यापैकी अडसूळ आणि आढळराव पाटील सध्या शिंदेंसोबत आहेत तर उरलेल्या दोन जागांवरही उमेदवारांचा शोध सुरु आहे तर इतर जे नावाजलेले चेहरे आहेत त्यांच्याही नावाची चाचपणी सुरु आहे. 

एकीकडे जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरु झाली असून दुसरीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मान सन्मानावरुनही नाराजीचा सूर आळवू लागले आहेत. एनडीएमध्ये आम्हाला सपत्न वागणूक मिळत असल्याचं खासदार गजानन कीर्तिकर यांचं म्हणणं आहे.

त्यामुळे माविआ असो किंवा महायुती... जागा वाटपाचा विषय येताच प्रत्येक पक्ष स्वतःच्या पारड्यात जास्तीत जास्त जागा कशा येतील, यासाठी कुटिल नीती आखू लागतो हे यातून स्पष्ट होतं आहे.

VIDEO : Deepak Kesarkar : लोकसभेसाठी आम्ही भाजपकडे 22 जागा मागणार - दीपक केसरकर 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget