एक्स्प्लोर

शांतीत क्रांती ही एकनाथ शिंदेंची खासियत; तेच मुख्यमंत्रि‍पदाच्या रेसमध्ये, शिंदे गटाच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

Sanjay Shirsat On Eknath Shinde: देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद मिळत असल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.

Sanjay Shirsat On Eknath Shinde: विधानसभेचा निकाल लागल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेला घवघवीत यश मिळाले, त्यानंतर गेल्या अडीच वर्षांच्या प्रचंड कामाच्या बळावर पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होणार असे दिसत असताना आता मात्र भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडणार हे जवळपास निश्चित झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद मिळत असल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. याचदरम्यान शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी एबीपी माझाशी बोलताना मोठं विधान केलं आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची आज पत्रकार परिषद आहे. त्यांच्या मनात काही असेल ते मांडतील. एकनाथ शिंदेंच्या मनात काय आहे, हे आम्हालाही कळत नाही. न बोलता करेक्ट कार्यक्रम करणाऱ्यांमध्ये एकनाथ शिंदे एक नंबरवर आहेत, असं संजय शिरसाट म्हणाले. शांतीत क्रांती ही एकनाथ शिंदेंची खासियत आहे. तसेच मुख्यमंत्रि‍पदाच्या रेसमध्ये एकनाथ शिंदे होते, आहेत आणि राहणार...असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं आहे. '

राजकारणात काही फिक्स नसतं- संजय शिरसाट

जो पर्यंत नाव जाहीर होत नाही, तोपर्यंत काहीच सांगू शकत नाही. 15 वर्षापासून मंत्री मंत्री म्हणून आमचं नाव आहे. मात्र मंत्री झालो नाही. राजकारणात काही फिक्स नसतं, असंही संजय शिरसाट यावेळी म्हणाले. भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाबाबत शब्द दिला होता, अशीही चर्चा सुरु आहे, असे संजय शिरसाट यांना विचारले असता, याबाबत मला काहीच कल्पना नाहीय, असं त्यांनी सांगितले.

एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रिपदाची ऑफर स्वीकारणार?

मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची नियुक्ती करण्यात येणार असल्याचा निरोप केंद्रातून एकनाथ शिंदे यांना देण्यात आला आहे, असंही सांगण्यात येत आहे.  सोबत केंद्रीय मंत्रिपदाची नाहीतर, राज्यात उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली आहे. राष्ट्रवादीने देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थनाचे पत्र दिल्यानंतर केंद्रातून घडामोडींना वेग आला आहे.  एकनाथ शिंदे यामुळे काहीसे नाराज झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तसेच उपमुख्यमंत्री पदाची ऑफर एकनाथ शिंदे स्वीकारणार का?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

संबंधित बातमी:

Eknath Shinde: मोठी बातमी: मी बाहेरुन पाठिंबा देण्यास तयार, एकनाथ शिंदेंनी भाजपला निरोप धाडल्याची चर्चा, किती तथ्य?

महत्त्वाच्या बातम्या

काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
Gokul Election: जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
जागावाटपात एकमेकांचा घामटा काढल्यानंतर आता महायुतीला क्रॉस व्होटिंगचा धसका; इतिहासात पहिल्यांदाच ठरावधारकांना सहलीवर पाठवणार, शपथा सुद्धा घेतल्या जाणार!
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 
अचानक मुख्यमंत्री घरी आले, माझ्यासमोर कुठलाच पर्याय उरला नाही, अखेर अनिल सोलेंचं बंड शमलं, भाजपचा उमेदवार विजयी करण्याचा निर्धार 

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget