एक्स्प्लोर

Eknath Shinde: तुम्ही उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंना आपले प्रतिस्पर्धी मानता का?; एकनाथ शिंदे म्हणाले...

Eknath Shinde Maharashtra Vidhan Sabha Election 2024: प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची निवडणूक लढवण्याची अपेक्षा असते, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.

Eknath Shinde On Uddhav Thackeray And Raj Thackeray: लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना आणि भाजपासह महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाकडून एकही उमेदवार उतरवला नव्हता. उलट राज यांनी राज्यभर महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला. 

राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबई, ठाणे, पुणे व कोकणात जाहीर प्रचारसभा देखील घेतल्या होत्या. त्यानंतर मनसे महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) महायुतीत सहभागी होईल अशी चर्चा रंगू लागली होती. तसेच राज ठाकरे यांच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री व भाजपाचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी गाठीभेटी होऊ लागल्या होत्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मनसे  महायुतीत सहभागी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. परंतु मनसेची भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत युती होऊ शकली नाही. मनसेने विधानसभा निवडणुकीत ‘एकला चलो रे’चा नारा दिला आहे. त्यानंतर राज्यात 150 हून अधिक विधानसभेच्या जागांवर उमेदवार उभे केले. याचदरम्यान 'दैनिक लोकमत'ने घेतलेल्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तुम्ही दोन्ही ठाकरेंना आपले प्रतिस्पर्धी मानता का?, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले, पाहा...

तुम्ही दोन्ही ठाकरेंना आपले प्रतिस्पर्धी मानता का?

राज ठाकरेंचा महायुतीमध्ये समावेश झाला नाही. तसेच राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंच्या विरोधात प्रखर भूमिका घेत नाहीत, असे तुम्हाला वाटते का?, दोन्ही ठाकरेंना तुम्ही आपले प्रतिस्पर्धी मानता का?, असा प्रश्न एकनाथ शिंदेंना विचारण्यात आला. यावर आमची कुणाशीही स्पर्धा नाही. लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची निवडणूक लढवण्याची अपेक्षा असते. कुणाला मत द्यायचे ते जनता ठरवेल, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. आम्ही काय केले ते जनतेसमोर आहे. अडीच वर्षे सत्तेवर राहिलेल्या मविआचे अँटी डेव्हलपमेंट सरकार लोकांनी पाहिले. त्यानंतर सर्व प्रकल्प सुरू करणारे व त्यांना वेगाने पुढे नेणारे, उद्योगस्नेही व कल्याणकारी सरकार लोकांनी पाहिले. लाडक्या बहिणींचे प्रेम आमच्यासोबत आहे. तरुणांना प्रशिक्षण भत्ता आम्ही दिला. त्यामुळे मतदार आमचीच निवड करतील, असंही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले. 

संबंधित बातमी:

Raj Thackeray: रमेश वांजळेचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaChhatrapati Sambhajinagar Gold Seized : संभाजीनगर जिल्ह्यात 19 कोटींचे सोन्याचांदीचे दागिने पकडलेABP Majha Headlines :  7 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
Ajit Pawar: विधानसभा निवडणुकीत राज्यात जातीय ध्रुवीकरण होणार नाही, महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळणे अवघड: अजित पवार
विधानसभा निवडणुकीत महायुतीला बिगरमराठ्यांची एकगठ्ठा मतं मिळतील का? अजित पवारांचं महत्त्वाचं वक्तव्य
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Embed widget