एक्स्प्लोर
Advertisement
दिंडोशी विधानसभा मतदारसंघ | शिवसेनेचे वर्चस्व मोडीत काढण्याचे आव्हान
गेली अनेक वर्ष विकास आणि उद्योगधंद्यांच्या प्रतीक्षेत असलेला हा मतदारसंघ यापूर्वीच्या आणि विद्यमान लोकप्रतिनिधींना चांगलाच वैतागलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विकास घडविण्याची हमी देणाऱ्या लाच संधी देणार असल्याचं मतदार सांगत आहेत त्यामुळे 2019 ची निवडणूक ही चूरशीची आणि लक्षवेधी ठरणार हे निश्चित.
दिंडोशी मतदारसंघ हा मुंबई उपनगरीय जिल्ह्यात असलेल्या विधानसभा मतदारसंघापैकी एक आहे. दिंडोशी हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदार संघाचा एक भाग असून, या मतदार संघावर शिवसेनेचे वर्चस्व आहे. आदिवासी, उत्तर भारतीय आणि मराठी नागरिक असा संमिश्र असणारा दिंडीशी मतदारसंघ विविध समस्यांच्या गर्तेत उभा आहे. पूर्वी काँग्रेसचे राजहंस सिंह आणि 2014 नंतर शिवसेनेचे सुनील प्रभू या मतदारसंघाचे नेतृत्व करत आहेत. मात्र जनतेला अपेक्षित असणारा बदल या मतदारसंघात घडलेला नाही.
दिंडोशी विधानसभा मतदारसंघात 2009 साली शिवसेनेचे सुनील प्रभू आणि काँग्रेसचे राजहंस सिंह यांच्यात मुख्य लढत झाली होती. यावेळी काँग्रेसच्या राजहंस सिंह यांनी शिवसेनेच्या सुनील प्रभू यांचा पराभव केला होता. या निवडणुकीत काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुरुदास कामत यांची खूप मोठी मदत राजहंस सिंह यांना झाली होती. हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला होता. त्यानंतर 2014 पर्यंत सुनील प्रभू यांनी केलेली कामं, जनतेशी असलेला संपर्क आणि मोदी लाटेचा प्रभाव म्हणून की काय 2014 सली सुनील प्रभू यांनी काँग्रेसच्या राजहंस सिंह यांचा पराभव केला.
हे ही वाचा - वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघ | मातोश्रीच्या अंगणातला गड वाचवण्यासाठी शिवसेनेला जोर लावावा लागणार
दिंडोशी मतदारसंघ हा आदिवासी, उत्तर भारतीय आणि मराठी मतदारांनी व्यापलेला आहे. मुंबईलगत असणारा दिंडोशी आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहे. या परिसरात मोठमोठ्या इमारती कमी दिसत असून स्थानिक नागरिकांना उद्योगधंद्यांसाठी मुंबईची वाट धरावी लागते. अंतर्गत रस्ते पिण्याच्या पाण्याची समस्या, उद्योगधंद्यांचा अभाव या साऱ्यांमुळे इथली जनता वैतागलेली आहे. मागील पाच वर्षात विद्यमान आमदार सुनील प्रभू यांनी मतदारसंघाकडे कमी लक्ष दिल्याचा आरोप होत आहे. तर सुनील प्रभू यांच्याकडून अपेक्षित असलेली बहुतांश कामे झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या विभागाचे खासदार गजानन कीर्तीकर हे शिवसेनेचे आहेत. आमदार सुनील प्रभू हे देखील शिवसेनेचे आहेत मात्र तरीही सध्या मतदारसंघात नाराजी दिसून येत आहे. 2019 च्या निवडणुकीसाठी पुन्हा सुनील प्रभू विरुद्ध काँग्रेसचे राजहंस सिंह यांच्यात लढत होईल असं वाटत होतं. मात्र काँग्रेसच्या राजहंस सिंह यांनीच भाजपची वाट धरल्यामुळे काँग्रेसला आता दुसरा पर्याय शोधावा लागलेला आहे.
2014 साली दिंडोशी मतदारसंघात उभे राहिलेले उमेदवार आणि त्यांना पडलेली मते
1) सुनील प्रभू (शिवसेना) 56577
2) राजहंस सिंह (काँग्रेस) 36749
3) मोहित कंबोज (भारतीय जनता पार्टी ) 36169
4) शालिनीताई ठाकरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) 14662
दिंडोशी मतदार संघ संभाव्य उमेदवार
1) सुनील प्रभू (शिवसेना)
2) मोहित कंबोज (भारतीय जनता पार्टी)
3) जयकांत शुक्ला (काँग्रेस) किंवा संदीप सिंग
4) विद्याताई चव्हाण किंवा अजित राणे
5) शालिनीताई ठाकरे
मतदार संघातील महत्त्वाची ठिकाणे
दिंडोशी मतदार संघात जरी मोठ्या इमारतींनी जागा घेतली असली तरीही या मतदारसंघाने आपलं एक वेगळं आस्तित्व राखलेला आहे. जोगेश्वरी लेण्या, कान्हेरी लेण्या, महाकाली लेण्या, मंडपेश्वर लेण्या अशी ऐतिहासिक ठिकाणे मतदारसंघ आहेत. दिंडोशी हे मुंबई मधील मालाड ईस्ट उपनगरांमध्ये मधील एक स्थान आहे. मुंबईतील उपनगरांमध्ये सर्वात मोठे आयटी पार्क, इन्फिनिटी या परिसरात आहेत. ओबेराय मॉल, गोकुळधाममधील लोकप्रिय मंदिर हे ठिकाण लोकांचे आकर्षणाचे आहे. दिंडोशीमध्ये मुंबईतील बीएसटीच्या सर्वात मोठ्या बस डेपोपैकी एक डेपो आहे. जो दिंडोशी बस डेपो म्हणून ओळखला जातो.
या मतदारसंघात पुन्हा शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातच मुख्य लढत होण्याची चिन्ह आहेत. आदिवासी आणि उत्तर भारतीय यांची मोठी वोट बँक असलेला हा मतदारसंघ आहे. गेली अनेक वर्ष विकास आणि उद्योगधंद्यांच्या प्रतीक्षेत असलेला हा मतदारसंघ यापूर्वीच्या आणि विद्यमान लोकप्रतिनिधींना चांगलाच वैतागलेला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत विकास घडविण्याची हमी देणाऱ्या लाच संधी देणार असल्याचं मतदार सांगत आहेत त्यामुळे 2019 ची निवडणूक ही चूरशीची आणि लक्षवेधी ठरणार हे निश्चित.
जाणून घ्या या मतदारसंघाविषयी
- मालेगाव बाह्य मतदारसंघ : विरोधक प्रबळ उमेदवार देणार की दादा भुसे चौथ्यांदा जिंकणार?
- कन्नड विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन जाधव पुन्हा आमदार होणार ?
- साक्री विधानसभा मतदारसंघ | काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजप बाजी मारणार?
- बागलाण विधानसभा मतदारसंघ | बोरसे आणि चव्हाण या कुटुंबांभोवती फिरतंय तालुक्याचं राजकारण
- जालना विधानसभा मतदारसंघ | जालन्यात वंचितची काँग्रेसला धास्ती
- परळी विधानसभा | भावा-बहिणीमधील लढतीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
- येवला-लासलगाव मतदारसंघ | छगन भुजबळ विजयी चौकार लगावणार?
- अक्कलकोट विधानसभा | स्वामींच्या नगरीत अभय कुणाला? भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर
- परभणी विधानसभा मतदारसंघ : भाजपच्या खेळीने शिवसेना अडचणीत
- मुर्तिजापूर विधानसभा : तिकीटासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा तर 'राखीव' मतदारसंघ राखण्याचं 'वंचित'समोर आव्हान
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement