एक्स्प्लोर

Dilip Sopal : शिवसेना एकत्रित मी घडवून आणलं नाही हे घडून आलं, मी कोण घडवणार, 'जो जे वांछील, तो ते लाहो' : दिलीप सोपल

Dilip Sopal : बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी बार्शीत दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत महाआघाडी कशी स्थापन झाली हे सांगितलं.

सोलापूर : सोलापुरातील बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. बार्शी तालुक्यात जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादीची महाआघाडी झाली आहे. विशेष म्हणजे भाजपविरोधात दोन्ही शिवसेना, दोन्ही राष्ट्रवादी मिळून महाआघाडी स्थापन करण्यात आल्यानं राज्यभर याची चर्चा झाली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल (Dilip Sopal) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही शिवसेना एकत्रित हे मी घडवून आणलं नाही ते घडून आलेलं आहे, असं सोपल यांनी म्हटलं. 

घडवून आणलं नाही, घडून आलं, मी कोण घडवणार? : दिलीप सोपल

बार्शी येथील दोन्ही शिवसेना एकत्रित प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे आमदार दिलीप सोपल यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दोन्ही शिवसेना एकत्रित मी घडवून आणलं नाही. हे घडवून आलेलं आहे. मी कोण घडवणार, घडवलेले सगळे उपस्थित आहेत. 'जो जे वांछील, तो ते लाहो' असं दिलीप सोपल यांनी म्हटलं. 

'काहीजण म्हणले, मला मशालीवर लढायचं ओके. काहीजण म्हणले, घड्याळ पाहिजे. घड्याळ घेऊन टाका. घड्याळाबद्दल प्रेम असणारे कार्यकर्ते त्यांनी घड्याळ मागितलं.  काहीजण म्हणले, बाणाने आणि काय केलं. बाण आम्हाला पाहिजेल. त्यांना म्हणलं, बाण घेऊन उभा रहा', असं दिलीप सोपल यांनी म्हटलं.  
 
तुतारी आणि घड्याळ एकच आहे. वर झालं तर आपल्या इथे का नको. वेगळी तुतारी नको, घड्याळ आहे, असं हे सगळं जमून आलेलं आहे. ओढून ताणून काही आलेलं नाही असं दिलीप सोपल यांनी स्पष्ट केलं. बरीच चर्चा झाली त्या प्रमाणं  हा मेळा जमून आला आहे.  ही सगळी चांगली चांगली फुलं. चांगल्या दोऱ्यात गुंफायचं काम मी सुई म्हणून केलं, असं दिलीप सोपल यांनी म्हटलं.  हे केल्याशिवाय बार्शी तालुक्याला आता पर्याय नव्हता, असं म्हणत आमदार दिलीप सोपल यांनी दोन्ही शिवसेना सोबत लढण्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.  

बार्शीत भाजपविरोधात सर्व पक्ष एकत्र

सोलापुरातील बार्शीत जिल्हा परिषद निवडणुकीसाठी दोन्ही शिवसेना एकत्र आल्यानं राज्यभर चर्चा झाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार दिलीप सोपल यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत मेळाव्याला येण्याचे आवाहन केलं होतं. या महाआघाडीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं होतं. 

मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे शिक्षण घेतलेलं असून एबीपी माझामध्ये मागील 9 वर्षांपासून कार्यरत आहे. मुंबईत assistant प्रोड्यूसर म्हणून काम केल्यानंतर मागील 7 वर्षांपासून सोलापूर जिल्हा प्रतिनिधी पदावर कार्यरत.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget