मोहिते पाटलांचं ठरलं! एकाच दिवशी पक्ष प्रवेश, शक्तिप्रदर्शन आणि उमेदवारी दाखल करणार; खुद्द शरद पवार राहणार उपस्थित
धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे 13 एप्रिलला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाहीत. तर ते 16 एप्रिलला पक्ष प्रवेश करणार आहेत.
Madha Loksabha Election News : धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे 13 एप्रिलला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार नाहीत. तर ते 16 एप्रिलला पक्ष प्रवेश करणार आहेत. मोहिते पाटील हे एकाच दिवशी म्हणजे 16 एप्रिलला पक्ष प्रवेशासह शक्तिप्रदर्शन आणि सोलापुरात (solapur)अर्ज उमेदवारी दाखल करणार असल्याची माहिती मिळत आहे. धैर्यशील हे माढा लोकसभा मतदारसंघातून (madha loksabha election) भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकर (Ranjeetsingh Nimbalkar) यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत.
शरद पवारांसह जयंत पाटील उपस्थित राहणार
दरम्यान, आधी 13 एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अकलूजमध्ये येऊन प्रवेश देणार होते. मात्र, त्यांचा विदर्भ दौरा असल्याने ते 13 एप्रिलला प्रवेश करणार नाहीत. ते पक्ष प्रवेश, शक्ती प्रदर्शन आणि उमेदवारी अर्ज हे सर्व 16 एप्रिल याच दिवशी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत दाखल करणार आहेत.
धैर्यशील मोहिते विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी तगडी फाईट
धैर्यशील मोहिते पाटील हे 13 एप्रिल रोजी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, ते 13 एप्रिलला नाहीतर 16 एप्रिलला शरद पवारांच्या उपस्थित प्रवेश करणार आहेत. याचा दिवशी ते आपला उमेदारी अर्ज देखील दाखल करतील अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, धैर्यशील मोहिते विरुद्ध रणजितसिंह निंबाळकर अशी तगडी फाईट माढा लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे. रणजितसिंह निंबाकर यांना भाजपने तिकीट दिल्यामुळं धैर्यशील मोहिते पाटील हे नाराज होते. ते भाजपकडून माढा लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र, भाजने पुन्हा रणजितसिंह निंबाळकरांना मैदानात उतरवलं आहे. त्यामुळं मोहिते पाटील आता निवडणूक लढणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढण्यावर ठाम आहेत.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत काय झालं होतं?
2019 च्या लोकसभा निवडणुकीत माळशिरस तालुक्यातून मोहिते पाटील यांनी रणजितसिंह निंबाळकरांना मोठा एक लाख मताहून अधिकचा लीड दिला होता. तसेच अन्य तालुक्यात देखील निंबाळकरांना चांगला पाठिंबा मिळाला होता. या मतांच्या आधारे निंबाळकर निवडून आले होते. मात्र, मधल्या काळात मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्या खटके उडण्यास सुरुवात झाली. 2019 च्या निवडणुकीत निंबाळकर ज्या संजयमामा शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढले त्यांच्याशीच निंबाळकरांनी जवळीक साधली. त्यामुळं नंतरच्या काळात मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यातील अंतर वाढत गेलं.
महत्वाच्या बातम्या: