Pravin Darekar : ...तर पुढील मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीसच! अमित शाहांच्या वक्तव्यानंतर भाजपच्या बड्या नेत्याचा दावा, म्हणाले...
Pravin Darekar : भाजप कार्यकर्ता म्हणून मला विचारलं तर भाजपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, असा दावा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे.
मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती म्हणून तिन्ही पक्ष निवडणुकांना समोरे जात आहेत. मात्र येत्या काळ्यात महायुतीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार, या प्रश्नावर मात्र महायुतीचे नेते उत्तर देण्याचं टाळत असल्याचे बघायला मिळाले आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit Shah) यांनी महाराष्ट्रातील प्रचारसभेंला सुरुवात केली. त्यात, सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात भाषण करताना अमित शहांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेत तेच महायुतीचे मुख्यमंत्री असतील असे संकेत दिलेत. अमित शाह (Amit Shah) यांच्या या वक्तव्यावर आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी आपली प्रतिक्रिया देत सूचक विधान केले आहे.
येत्या काळात मुख्यमंत्री होईल तो महायुतीचाच होईल, केंद्राचे नेतृत्व आणि महायुतीचे नेते पुढचा मुख्यमंत्री ठरवतील. पण भाजप कार्यकर्ता म्हणून मला विचारलं तर भाजपचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच असतील, असा दावा भाजपचे आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केला आहे.
उबाठा सेना गेल्या अडीच वर्षात सडलीय-प्रवीण दरेकर
उबाठा सेना गेल्या अडीच वर्षात सडली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो बॅनरवरून गायब आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं असली रूप समोर येत आहे. उद्धव ठाकरे यांची किंमत शून्य असल्याचे महाविकास आघाडीने दाखवून दिले आहे. उद्धव ठाकरे यांना आवाहन आहे, तुम्ही महाविकास आघाडीला विचारणार आहे का? बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर मत मागितले, पण आता त्यांचा फोटोच गायब आहे. असेही प्रवीण दरेकर म्हणाले.
संजय राऊत आल्यावर लोक चॅनल बदलतात
संजय राऊत यांचा एवढा खोटा आत्मविश्वास असतो की त्यांना एखादा पुरस्कार दिला पाहिजे. ते काहीही बोलतात. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण होणार आहे, हे त्यांनी सांगावे. संजय राऊत आल्यावर लोक चॅनल बदलत असतात. संजय राऊत यांना गुंडगिरी बाबत माहीत आहे. कारण गुंडाच्या टोळक्यात वावऱ्यानाऱ्या लोकांनी गुडवर बोलावे आश्चर्य आहे. बाळासाहेब यांनी गुंडांचा परिवर्तन करून त्यांचे आयुष्य बदलले. संजय राऊत यांनी इतिहास तपासावे, ते राऊत आहेत बर झाले दाऊद म्हणाले नाहीत. अशी टीकाही प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर केली आहे.
जरांगे फक्त भाजपला टार्गेट करत आहे-प्रवीण दरेकर
मराठा आरक्षणवर शरद पवार, उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करत नाही, काँग्रेस हातवर करत आहे. जरांगे फक्त भाजपला टार्गेट करत आहे. जरांगे यांच्या भूमिका बदलत आहे, त्यामुळे उद्या त्यांची काय भूमिका काय आहे पाहू. ज्यावेळी कारण नसताना भाजप आणि फडणवीस यांच्यावर टीका होत असताना त्यावर आम्ही समाजासाठी काय केले हे सांगतोय. असेही प्रवीण दरेकर म्हणाले.