एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: सत्तारोहणापूर्वी देवेंद्र फडणवीसांकडून धार्मिक अनुष्ठान; सिद्धिविनायक-मुंबादेवीचं दर्शन घेतलं, आता सागर बंगल्यावर गाई मागवल्या

Devendra Fadnavis Maharashtra CM: मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेण्याआधी देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक आणि मुंबादेवीच्या दर्शनाला पोहचले.

Devendra Fadnavis Maharashtra CM मुंबई: देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Maharashtra CM) आज मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईच्या आझाद मैदानावर आज संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा होईल. भाजपकडून शपथविधी सोहळ्याचं आमंत्रण देण्यात आलं आहे. तिन्ही पक्षाचा उल्लेख असलेली निमंत्रण पत्रिका भगव्या रंगात, निमंत्रण पत्रिकेवर 'मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाचा शपथविधी' असा उल्लेख करण्यात आलं आहे. शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली असून देशभरातील अनेक दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 

सत्तारोहणापूर्वी देवेंद्र फडणवीसांकडून धार्मिक अनुष्ठान-

मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेण्याआधी देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक आणि मुंबादेवीच्या दर्शनाला पोहचले. शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत देवदर्शन केलं. देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक आणि मुंबादेवीच्या चरणी लीन झाले. तर सागर बंगल्यावर होणार गोमातेचं पूजन करण्यात येणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पूजेसाठी गाय आणण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस हे काही वेळात बंगल्यावर पोहचतील. त्यानंतर गोमातेचं पूजन केलं. देवेंद्र फडणींवीसांनी गौमातेची पूजा केली. बळीराजाचं राज्य यावं म्हणून ही पूजा करण्यात आली आहे. गीर आणि खिल्लार प्रजातीची गाय आण्यायात आली होती.

महंत सुधीरदास महाराज काय म्हणाले?

आम्ही सर्व साधू महंत आणि महाराज यांनी काढून दिलेल्या मुहूर्तावरच आजचा शपथविधी होत आहे. आजच्या शुभ मुहूर्तावर हा शपथविधी होत असल्याने हे सरकार निर्भिग्नपणे पाच वर्षाचा त्यांचा कार्यकाल पूर्ण करेल. आजच्या शपथविधी आम्ही 300 साधू महंत व्यासपीठावर असणारा आहोत. आमच्या नवीन सरकारसाठी शुभेच्छा आहेत. आज तीनच लोकांनी शपथ घेतली तरी त्याचा काहीही फरक या सरकारवर पडणार नाही, असं महंत सुधीरदास महाराज यांनी सांगितले.

12 दिवसांनी आज महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा-

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तब्बल 12 दिवसांनी आज महायुती सरकारचा आज शपथविधी सोहळा होत आहे. संध्याकाळी साडेपाच वाजता महायुती 2.0 सरकारचा शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेतील. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारही आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सोहळ्यासाठी तीन मोठमोठे स्टेज उभारण्यात आले आहेत. महत्वाचं म्हणजे भगव्या रंगाचा वापर इथे मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे. शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर बडे नेते उपस्थित राहणार आहेत. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Abitkar : प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
Afgan Women Nursing Barred : तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग शिक्षण बंद; राशीद खान भडकला, म्हणाला, 'इस्लाममध्ये महिलांना..'
तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग शिक्षण बंद; राशीद खान भडकला, म्हणाला, 'इस्लाममध्ये महिलांना..'
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
Devendra Fadnavis : विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Oath Ceremony  Mahayuti : Maharashtra Politics : 05 Dec 2024 : ABP MajhaDevendra Fadnavis Oath Ceremony  शपथविधी सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, 3 मोठ्या स्टेजची उभारणीBharat Gogawale Oath Ceremony : शिवसेनेला किती खाती मिळणार? भरत गोगावलेंनी स्पष्टच सांगितलंDevendra Fadnavis At Siddhivinayak Temple : शपथविधी आधी देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायक दर्शनाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Abitkar : प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
प्रकाश आबिटकरांची राधानगरीत हॅट्ट्रिक; एकनाथ शिंदे मंत्रिपदाचा दिलेला शब्द पूर्ण करणार? कोल्हापूर जिल्ह्याला मंत्रिपदाची उत्सुकता
Afgan Women Nursing Barred : तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग शिक्षण बंद; राशीद खान भडकला, म्हणाला, 'इस्लाममध्ये महिलांना..'
तालिबानकडून अफगाणिस्तानमध्ये महिलांसाठी नर्सिंग शिक्षण बंद; राशीद खान भडकला, म्हणाला, 'इस्लाममध्ये महिलांना..'
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
उद्धवजी, पवार साहेब सर्वांनी यावे..' देवेंद्रजी स्वत: सर्वांशी बोललेत, शपथविधीचं विरोधकांना जातीनं आमंत्रण
Devendra Fadnavis : विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
विरोधकांना मी पुन्हा माफ केले, हाच माझा बदला, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या; म्हणाले, माझी खलनायकी प्रतिमा...
Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Ajit Pawar: शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
शपथविधी सोहळ्यापूर्वी अजित पवारांची भाजपसमोर अट, आधी एकनाथ शिंदेंचं आटोपून घ्या, मग राष्ट्रवादीच्या मंत्रि‍पदांची चर्चा
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Embed widget