एक्स्प्लोर

Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर वर्दळ अन् लगबग वाढली, शिंदे गटातील मंत्रिपदाचा प्रबळ दावेदारही भेटीला पोहोचला

Maharashtra Goverment: आज सकाळपासून देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आमदारांची रिघ पाहायला मिळत आहे. 

Maharashtra Goverment: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा तिढा आज सुटण्याची शक्यता आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) आज अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेणार आहेत. दिल्लीत मुख्यमंत्रिपदाबाबत निश्चिती झाल्यानंतर काही मंत्र्यांच्या नावांवर देखील शिक्कामोर्तब होणार आहे. यामुळे आज सकाळपासून सागर बंगल्यावर आमदारांची रिघ पाहायला मिळत आहे. 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर आतापर्यंत नवनीत राणा, रवी राणा, धनंजय मुंडे, भरत गोगावले, जयकुमार रावल, सुधीर मुनगंटीवार, आशिष देशमुख हे आमदार दाखल झाले आहेत. दरम्यान काल दिवसभरात देखील महायुतीमधील अनेक आमदार सागर बंगल्यावर दाखल झाले होते. अनेक आमदारांमध्ये मंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना देखील संधी मिळणार-

नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना देखील संधी मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. काही ज्येष्ठ नेत्यांचे पत्ते कट होत तरुण चेहऱ्यांना देखील मंत्रीमंडळात स्थान मिळणार आहे. दिल्लीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर इतर मंत्र्यांचीही नावे निश्चित होणार आहे, असं विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

सागर बंगल्याबाहेर बॅनरबाजी-

देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याबाहेर 'सदैव मुख्यमंत्री' अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. नाशिकच्या कैलास ढाकणे यांच्यकडून करण्यात आली आहे बॅनरबाजी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागूण राहिले असताना देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर लावण्यात आलेला बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रिपदे-

विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रि‍पदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकतो. यात भाजपला सर्वाधिक 20 ते 25 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 10 ते 12 आणि राष्ट्रवादीला 7-9 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे. 

आज दिल्लीत फडणवीस, शिंदे, पवारांची अमित शाह यांच्यासोबत बैठक-

सत्तास्थापनेत शिवसेनेकडून कोणतीही आडकाठी नसेल असा निरोप एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना फोनवरून कळवला आहे. आज दिल्लीत अमित शाहांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल. 

संबंधित बातमी:

विनोद तावडेंची एन्ट्री अन् महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबत पुन्हा सस्पेन्स वाढला; बैठकीत सगळी गणितं मांडली, दिल्लीत हालचाली वाढल्या!

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget