(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीसांचा सहाव्यादा दणदणीत विजय; तर नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचा दारुण पराभव
Nagpur Vidhan Sabha Election 2024 : राज्यासह देशाचे लक्ष लागून राहीलेल्या नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी एकहाती यश खेचत दणदणीत विजय मिळवलाय.
Nagpur District Vidhan Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत आलेले अपयश बाजूला सारुन महायुतीने विधानसभा निवडणुकीत मोठा राजकीय चमत्कार करुन दाखवला आहे. विशेष म्हणजे गेल्या लोकसभेत भाजप आणि महायुतीला विदर्भात दारुण पराभवाला समोर जावे लागले होते. दरम्यान आज (शनिवारी) सकाळी आठ वाजल्यापासून विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या तीन तासांमध्ये महायुतीला (Mahayuti) प्रचंड मोठे यश मिळताना दिसत आहे. दरम्यान, राज्यासह देशाचे लक्ष लागून राहीलेल्या अतिशय महत्वाच्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. देवेंद्र फडणवीसांनी नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून एकहाती यश खेचत दणदणीत विजय मिळवला आहे.
दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून सहाव्यादा दणदणीत विजय
दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे प्रत्यक्ष सहाव्यादा निवडनुकीच्या मैदानात उतरले आहेत. तर पहिल्या कलापासून फडणवीस हे आघाडीवर असल्याचे चित्र आहे. तर त्यानंतर जसजशी आकडेवारी पुढे येत गेली त्यानुसार देवेंद्र फडणवीसांच्या विजयी आश्वाची घोडदौड सुरूच असल्याची चित्र आहे. दरम्यान नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारांचा कौल बघता देवेंद्र फडणवीसांचे बंधु आशिष फडणवीस हे देखील भारावले आहे. यावेळी त्यांनी बोलताना या संपूर्ण विजयाचे श्रेय महायुतीच्या सर्व शेलेदारांना दिले आहे. देवेंद्र फडणवीसांनी सहाव्या फेरीअखेरीस आपल्या दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तब्बल 12,009 मतांनी आघाडी कायम ठेवली आहे. तर आज फडणवीस हे आपल्या नागपूर येथील निवासस्थानी जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तर दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडधे यांना मोठ्या पराभवाला समोर जावे लागले आहे. ऐकुणात भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र आहे.
देवेंद्र फडणवीस यांची सलग तिसर्यांदा महाराष्ट्राच्या चाणक्यावर मात
- देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील राजकारणाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला. भाजपाला सलग 3 वेळा बहुमत मिळवून दिले. 2014/2019/2024 सलग 3 वेळा भाजपाला शंभरीपार नेले. असा पराक्रम आजवर महाराष्ट्रात कोणत्याच नेत्याला जमलेला नाही.
- देवेंद्र फडणवीस एक समर्पित कार्यकर्ता : 2014 ला मुख्यमंत्री होते, पण, 2019 ला उद्धव ठाकरेंनी कपटाने मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतले. त्यांनी पक्षाला पुन्हा उभारी दिली. स्वत:तला एक आक्रमक विरोधी पक्षनेता महाराष्ट्राला दाखविला. पुन्हा समिकरणे जुळवून आणली. सरकार आणले. हे करताना केवळ पक्षाच्या आदेशावर उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले. पण, सरकारचे संपूर्ण दायित्त्व घेतले.
- लोकसभेतील दारुण पराभवानंतर अख्ख्या महाराष्ट्रातील कार्यकर्ता खचला होता. त्यावेळी केंद्रीय नेतृत्त्वाने जागावाटप ते प्रचारयंत्रणा संपूर्ण अधिकार फडणवीसांना बहाल केले आणि या संधीचे त्यांनी आज सोने करुन दाखविले.
- या निवडणुकीत महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आणि त्यांच्या संपूर्ण इकोसिस्टीमने एकट्या देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले होते, पण, महाराष्ट्र कुणासोबत होता, हे आजच्या निकालांनी दाखवून दिले.
- संयमी आणि कणखर नेतृत्त्व: शरद पवार, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, संजय राऊत यांनी अत्यंत नीच पातळीवर जाऊन व्यक्तिगत टीका केली. पण, त्यांना कायमच संयमाने त्यांनी उत्तर दिले आणि कधीही तोल ढळू दिला नाही. ही टीका अगदी कुटुंबापर्यंत गेली होती.
- तरुणाईमध्ये असलेली इन्फ्रामॅन म्हणून असलेली ओळख आणि त्यातून महाराष्ट्राला कशात अधिक रुची आहे, हे या निकालांनी दाखवून दिले.
- विकासाची धोरणे आणि धाडसी निर्णय : महाराष्ट्रात कधी नव्हे झाली ती विकास कामे 2014 ते 2019 या कालखंडात झाली. त्यालाच पूर्णत्त्व प्राप्त होताना महाराष्ट्राने 2022 ते 2024 या कालखंडात पाहिले.
- विरोधक गुजरात, कर्नाटकचे गोडवे गात असताना देवेंद्र फडणवीस यांनी मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक 52 टक्के गुंतवणूक आणत त्याला सडेतोड उत्तर दिले.
- कायम विकासाचा चेहरा असलेला देवेंद्र फडणवीस यांचा आक्रमक हिंदूत्त्ववादी चेहराही या विधानसभा निवडणुकीने अनुभवला.
पण, काश्मिरात तिरंगा फडकावणारा, राममंदिरासाठी तिन्ही कारसेवांमध्ये उपस्थित असणारा मुळातच हा आक्रमक हिंदूत्त्ववादी चेहराच होता. गेल्या दोन निवडणुकांमध्ये वोट जिहाद आक्रमकपणे पुढे आल्यानंतर त्यांच्यातील हिंदूत्त्व त्यांना स्वस्थ बसू देणारे नव्हतेच.
हे ही वाचा