एक्स्प्लोर

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या भेटीला, दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा, बावनकुळेंसह इतर नेते बाहेर

Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. या बैठकीत काय घडतंय हे पाहावं लागेल.

मुंबई :  भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा वर्षा निवासस्थानी काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ घेणार आहेत. देवेंद्र फडणवीस सलग दुसऱ्या दिवशी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरु असल्याची माहिती आहे. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे बाहेर बसले असल्याची माहिती आहे. 

दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा 

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये बंद दाराआड चर्चा सुरु आहे. यावेळी इतर आमदार देखील बाहेर बसले असल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याबाबतचा निर्णय स्पष्टपणे सांगितला नव्हता. दुपारच्या महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत देखील एकनाथ शिंदे यांनी संध्याकाळपर्यंत निर्णय घेतला नव्हता. भाजपनं त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत काय निर्णय होणार हे पाहावं लागेल. 

शपथविधी सोहळ्याबाबत एकनाथ शिंदेंचे आदेश 

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना उद्या साठी तयारी करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिल्याची माहिती आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली  या शहरातून आझाद मैदानात येण्यासाठी गाड्या आणि बसेसची व्यवस्था करण्याचे आदेश एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना आझाद मैदानात बोलवण्यात आले. उद्या नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत राज्यात नवीन सरकारचा मुख्यमंत्री तसेच उप मुख्यमंत्री आणि इतर मंत्री शपथ घेणार आहेत. 

दुपारच्या पत्रकार परिषदेत काय घडलं? 

देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांना काल भेटलो, त्यांनी सरकारमध्ये असावं अशी विनंती केल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे देखील सकारात्मक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. यासंदर्भात एकनाथ शिंदे यांना विचारलं असता त्यांनी संध्याकाळपर्यंत थांबण्यास सांगितलं.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीसंदर्भात भाजप नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या सारखं संवेदनशील नेतृत्त्व राज्याला हवं आहे. एकनाथ शिंदेंनी राज्याच्या सरकारमध्ये सहभागी व्हावं, अशी इच्छा असं प्रविण दरेकर म्हणाले. 

इतर बातम्या :

Uddhav Thackeray and Sharad Pawar : देवेंद्र फडणवीसांचा शपथविधी, राजशिष्टाचार विभागाकडून उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना निमंत्रण

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
ODI World Cup 2027 : कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
कधीकाळी क्रिकेट विश्वावर राज्य, आता वर्ल्ड कप खेळण्यासाठी संघर्ष! 5 ICC ट्रॉफी जिंकणाऱ्या वेस्ट इंडिजची दाणादाण
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Embed widget