एक्स्प्लोर

Loksabha Election 2019 : मूड महाराष्ट्राचा : महाराष्ट्रात पुन्हा एनडीए बाजी मारण्याची शक्यता

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी' आणि 'सी व्होटर' यांनी केलेलं सर्वेक्षण समोर आले आहे. 48 मतदारसंघात 12 हजार मतदारांपर्यंत पोहोचून नेल्सनच्या प्रतिनिधींनी हा सर्व्हे केला आहे.

मुंबई : महाराष्ट्रात 2014 निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज एबीपी माझा आणि नेल्सनच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. 2014 च्या निकालापेक्षा केवळ 3 जागा युपीएला जास्त मिळणार असल्याचा अंदाज यात व्यक्त केला आहे. या सर्व्हेमध्ये एनडीएला 37 तर युपीएला 11 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी' आणि 'ए.सी. नेल्सन' यांनी केलेलं सर्वेक्षण समोर आले आहे. 48 मतदारसंघात 12 हजार मतदारांपर्यंत पोहोचून नेल्सनच्या प्रतिनिधींनी हा सर्व्हे केला आहे. निवडणुका घोषित होण्याचा आणि उमेदवार ठरण्याच्या काळात हा सर्व्हे केला गेला. या सर्व्हेत मतदारांना आपल्या नेत्यांकडून अपेक्षा काय आहेत? विकासाचे मुद्दे, कोण जिंकेल? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
VIDEO | महाराष्ट्रात युतीला 37, आघाडीला11 जागा - सर्व्हे | कौल मराठी मनाचा | मूड महाराष्ट्राचा | एबीपी माझा
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज  
एकूण जागा - 48
एनडीए- 37
युपीए- 11
2014 च्या लोकसभेतील आकडेवारी 
काँग्रेस- 02
राष्ट्रवादी - 05
शिवसेना-  18
भाजप- 22
स्वाभिमानी- 01
मुंबईसह कोकणात भाजप आणि शिवसेना बाजी मारणार? मुंबईसह कोकणात भाजप आणि शिवसेनेने बाजी मारली असल्याचा अंदाज आहे. मुंबईसह कोकणात शिवसेनेने आपले वर्चस्व राखले असल्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये  व्यक्त केला आहे.
मुंबईसह कोकणात काय अंदाज
मुंबई उत्तर पश्चिम - शिवसेना
मुंबई उत्तर पूर्व - भाजप
मुंबई उत्तर मध्य - भाजप
मुंबई दक्षिण मध्य - शिवसेना
मुंबई दक्षिण- शिवसेना
रायगड- राष्ट्रवादी
पालघर - शिवसेना
भिवंडी - काँग्रेस
कल्याण- शिवसेना
ठाणे - शिवसेना
मुंबई उत्तर - भाजप
रत्नागिरी-सिंधुदुर्ग- शिवसेना
मुंबईसह कोकण- एकूण जागा - 12
भाजप - 03
शिवसेना- 07
काँग्रेस- 01
राष्ट्रवादी - 01
पश्चिम महाराष्ट्रात मोठे धक्के मिळण्याचा अंदाज या सर्व्हेत पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 12 लोकसभेच्या जागांपैकी 4 जागांवर भाजपला, 4 जागांवर शिवसेनेला, 3 जागांवर राष्ट्रवादीला तर एका जागेवर स्वाभिमानाला विजय मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. या सर्व्हेमध्ये बहुचर्चित माढ्यात राष्ट्रवादीला विजय मिळणार असल्याचा तर मावळमधून पार्थ पवारांना पराभव स्वीकारावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर डॉ. अमोल कोल्हेंनाही शिरूरमधून पराभव  स्वीकारावा लागेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
मावळ – शिवसेना पुणे – भाजप बारामती - राष्ट्रवादी शिरुर – शिवसेना माढा – राष्ट्रवादी सांगली – भाजप सातारा - राष्ट्रवादी कोल्हापूर – शिवसेना हातकलंगले – स्वाभिमानी शिर्डी – शिवसेना सोलापूर – भाजप अहमदनगर - भाजप
उत्तर महाराष्ट्रात भाजपचा वरचश्मा
या सर्व्हेमध्ये उत्तर महाराष्ट्रात देखील भाजपचा वरचश्मा पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपची नंदुरबारची जागा हातून निसटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र बाकी 6 पैकी 4 जागांवर भाजपची सरशी असल्याचे पाहायला मिळत आहे. धुळे, जळगाव, रावेर या जागांवर भाजप पुन्हा निवडून येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
उत्तर महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
नंदुरबार :- काँग्रेस
धुळे :- भाजप
रावेर :- भाजप
दिंडोरी :- भाजप
नाशिक :- शिवसेना
जळगाव :- भाजप
उत्तर महाराष्ट्रात कुणाला किती जागा
भाजप :-  4
शिवसेना :-  1
काँग्रेस :- 1
मराठवाड्यात कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
या सर्व्हेमध्ये मराठवाड्यातील 8 जागांपैकी भाजप 3,  शिवसेना 2,  काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी एका जागेवर बाजी मारेल असा अंदाज व्यक्त केला आहे.  यामध्ये शिवसेनेचा गड असलेला परभणी शिवसेनेच्या हातून सुटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
हिंगोली- काँग्रेस
जालना -भाजपा
औरंगाबाद - शिवसेना
नांदेड- काँग्रेस
परभणी- राष्ट्रवादी
बीड - भाजप
उस्मानाबाद - शिवसेना
लातूर - भाजप
विदर्भातील मतदारसंघात कोण बाजी मारणार
या सर्व्हेमध्ये विदर्भात असलेल्या 10 लोकसभा मतदारसंघात भाजपचा वरचष्मा झालेला पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपला 6, शिवसेनेला 3 आणि काँग्रेसला एका जागेवर विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्वेनुसार अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनाही धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर नागपुरातून नितीन गडकरी यांचा विजय होणार असून भंडारा गोंदियाची जागा राष्ट्रवादीच्या हातून सुटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. विदर्भात कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
बुलढाणा - शिवसेना
अकोला - भाजप
अमरावती - शिवसेना
वर्धा- भाजप
रामटेक- काँग्रेस
नागपूर - भाजप
यवतमाळ/वाशीम - शिवसेना
चंद्रपूर - भाजप
भंडारा / गोंदिया  - भाजप
गडचिरोली / चिमूर - भाजप
2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची टक्केवारी
एनडीए - 49.6  टक्के
युपीए - 36.9  टक्के
अन्य - 13. 5 टक्के
2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात होणाऱ्या मतदानाची टक्केवारी (अंदाज)
एनडीए :-  48 टक्के
युपीए :- 37 टक्के
वंचित आणि अन्य :- 2 टक्के
इतर :- 13टक्के

महत्त्वाच्या बातम्या

Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
Embed widget