एक्स्प्लोर
Advertisement
Loksabha Election 2019 : मूड महाराष्ट्राचा : सरकारने दहशतवादविरोधी निर्धार दाखवला, सर्व्हेचा अंदाज
या सर्वेक्षणात पुलवामा दहशतवादी हल्ला केंद्र सरकारच्या चुकीमुळे झाल्याचं मतदारांना वाटत नाही. तर बालाकोट हवाई हल्ल्यामुळे मोदी सरकारनं दहशतवादाविरोधातील निर्धार दाखवलाय असं मतदारांना वाटतं आहे.
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी' आणि 'ए.सी. नेल्सन' यांनी केलेलं सर्वेक्षण समोर आले आहे. या सर्वेक्षणात पुलवामा दहशतवादी हल्ला केंद्र सरकारच्या चुकीमुळे झाला नसल्याचे अधिकांश मतदारांना वाटत नाही. तर बालाकोट हवाई हल्ल्यामुळे मोदी सरकारनं दहशतवादाविरोधातील निर्धार दाखवलाय, असं मतदारांना वाटतं असल्याचा अंदाज या सर्व्हेत व्यक्त केला आहे.
तर भाजप सत्तेवर आली तर अयोध्येत राममंदिर बांधेल असे 58 टक्के मतदारांना वाटतंय. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी' आणि 'ए.सी. नेल्सन' यांनी केलेलं सर्वेक्षण समोर आले आहे. 48 मतदारसंघात 12 हजार मतदारांपर्यंत पोहोचून नेल्सनच्या प्रतिनिधींनी हा सर्व्हे केला आहे.
बालाकोट हवाई हल्ल्यामुळे मोदी सरकारने दहशतवादविरोधी निर्धार दाखवला?
होय - 71 टक्के
नाही - 21 टक्के
सांगता येत नाही - 08 टक्के
निवडणुका घोषित होण्याचा आणि उमेदवार ठरण्याच्या काळात हा सर्व्हे केला गेला. या सर्व्हेत मतदारांना आपल्या नेत्यांकडून अपेक्षा काय आहेत? विकासाचे मुद्दे, कोण जिंकेल? असे प्रश्न विचारण्यात आले होते. या सर्व्हेत मनसे निवडणूक लढवत नसल्यामुळे शिवसेना भाजपचा फायदा होईल असे बहुतांश मतदारांना वाटतेय.
मनसेच्या निवडणूक न लढविण्याचा फायदा कुणाला?
भाजप-शिवसेना - 56 टक्के
काँग्रेस- राष्ट्रवादी - 22 टक्के
इतर - 05 टक्के
सांगता येत नाही - 17 टक्के
कोणत्या मित्रपक्षाचे मतदार त्यांच्या मित्रपक्षाला किती मतं देणार?
या सर्व्हेत कोणत्या मित्रपक्षाचे मतदार त्यांच्या मित्रपक्षाला किती मतं देणार याची आकडेवारी समोर आली आहे. शिवसेनेशी भाजपनं जुळवून घेतल्याचा भाजपला फायदा होईल असं 86 टक्के मतदारांना वाटतंय. भाजपच्या मतदारांपैकी 93 टक्के मतदार शिवसेनेला मत देण्यासाठी तयार आहेत, तर शिवसेनेचे 85 टक्के मतदार भाजपला मत देण्यास तयार आहेत. काँग्रेसचे 86 टक्के मतदार तर राष्ट्रवादीचे 85 टक्के मतदार मित्रपक्षाला मत देण्यास तयार आहेत.
भाजपचे मतदार शिवसेनेला मत देणार का?
होय - 93 टक्के
नाही- 06 टक्के
सांगता येत नाही - 01
शिवसेनेचे मतदार भाजपला मत देणार का?
होय - 85
नाही- 13
सांगता येत नाही - 02
काँग्रेसचे मतदार राष्ट्रवादीला मत देणार का?
होय - 86
नाही- 13
सांगता येत नाही - 01
राष्ट्रवादीचे मतदार काँग्रेसला मत देणार का?
होय - 85
नाही- 10
सांगता येत नाही - 05
महाराष्ट्रात 2014 निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज
महाराष्ट्रात 2014 निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज एबीपी माझा आणि नेल्सनच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. 2014 च्या निकालापेक्षा केवळ 3 जागा युपीएला जास्त मिळणार असल्याचा अंदाज यात व्यक्त केला आहे. या सर्व्हेमध्ये एनडीएला 37 तर युपीएला 11 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'एबीपी' आणि 'ए.सी. नेल्सन' यांनी केलेलं सर्वेक्षण समोर आले आहे. 48 मतदारसंघात 12 हजार मतदारांपर्यंत पोहोचून नेल्सनच्या प्रतिनिधींनी हा सर्व्हे केला आहे. निवडणुका घोषित होण्याचा आणि उमेदवार ठरण्याच्या काळात हा सर्व्हे केला गेला. या सर्व्हेत मतदारांना आपल्या नेत्यांकडून अपेक्षा काय आहेत? विकासाचे मुद्दे, कोण जिंकेल? असे प्रश्न विचारण्यात आले होते.
VIDEO | महाराष्ट्रात युतीला 37, आघाडीला11 जागा - सर्व्हे | कौल मराठी मनाचा | मूड महाराष्ट्राचा | एबीपी माझा
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज
एकूण जागा - 48
एनडीए- 37
युपीए- 11
2014 च्या लोकसभेतील आकडेवारी
काँग्रेस- 02
राष्ट्रवादी - 05
शिवसेना- 18
भाजप- 22
स्वाभिमानी- 01
मुंबईसह कोकणात भाजप आणि शिवसेना बाजी मारणार?
मुंबईसह कोकणात भाजप आणि शिवसेनेने बाजी मारली असल्याचा अंदाज आहे. मुंबईसह कोकणात शिवसेनेने आपले वर्चस्व राखले असल्याचा अंदाज या सर्व्हेमध्ये व्यक्त केला आहे.
मुंबईसह कोकणात काय अंदाज
मुंबई उत्तर पश्चिम - शिवसेना
मुंबई उत्तर पूर्व - भाजप
मुंबई उत्तर मध्य - भाजप
मुंबई दक्षिण मध्य - शिवसेना
मुंबई दक्षिण- शिवसेना
रायगड- राष्ट्रवादी
पालघर - शिवसेना
भिवंडी - काँग्रेस
कल्याण- शिवसेना
ठाणे - शिवसेना
मुंबई उत्तर - भाजप
रत्नागिरी-सिंधुदुर्ग- शिवसेना
मुंबईसह कोकण- एकूण जागा - 12
भाजप - 03
शिवसेना- 07
काँग्रेस- 01
राष्ट्रवादी - 01
पश्चिम महाराष्ट्रात मोठे धक्के मिळण्याचा अंदाज
या सर्व्हेत पश्चिम महाराष्ट्रातील एकूण 12 लोकसभेच्या जागांपैकी 4 जागांवर भाजपला, 4 जागांवर शिवसेनेला, 3 जागांवर राष्ट्रवादीला तर एका जागेवर स्वाभिमानाला विजय मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. या सर्व्हेमध्ये बहुचर्चित माढ्यात राष्ट्रवादीला विजय मिळणार असल्याचा तर मावळमधून पार्थ पवारांना पराभव स्वीकारावा लागणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर सोलापूरमध्ये सुशीलकुमार शिंदे यांना पुन्हा पराभवाचा सामना करावा लागेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. तर डॉ. अमोल कोल्हेंनाही शिरूरमधून पराभव स्वीकारावा लागेल असा अंदाज व्यक्त केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
मावळ – शिवसेना
पुणे – भाजप
बारामती - राष्ट्रवादी
शिरुर – शिवसेना
माढा – राष्ट्रवादी
सांगली – भाजप
सातारा - राष्ट्रवादी
कोल्हापूर – शिवसेना
हातकलंगले – स्वाभिमानी
शिर्डी – शिवसेना
सोलापूर – भाजप
अहमदनगर - भाजप
उत्तर महाराष्ट्रात भाजपचा वरचश्मा
या सर्व्हेमध्ये उत्तर महाराष्ट्रात देखील भाजपचा वरचश्मा पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपची नंदुरबारची जागा हातून निसटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र बाकी 6 पैकी 4 जागांवर भाजपची सरशी असल्याचे पाहायला मिळत आहे. धुळे, जळगाव, रावेर या जागांवर भाजप पुन्हा निवडून येण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
उत्तर महाराष्ट्रात कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
नंदुरबार :- काँग्रेस
धुळे :- भाजप
रावेर :- भाजप
दिंडोरी :- भाजप
नाशिक :- शिवसेना
जळगाव :- भाजप
उत्तर महाराष्ट्रात कुणाला किती जागा
भाजप :- 4
शिवसेना :- 1
काँग्रेस :- 1
मराठवाड्यात कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
या सर्व्हेमध्ये मराठवाड्यातील 8 जागांपैकी भाजप 3, शिवसेना 2, काँग्रेस 2 आणि राष्ट्रवादी एका जागेवर बाजी मारेल असा अंदाज व्यक्त केला आहे. यामध्ये शिवसेनेचा गड असलेला परभणी शिवसेनेच्या हातून सुटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
हिंगोली- काँग्रेस
जालना -भाजपा
औरंगाबाद - शिवसेना
नांदेड- काँग्रेस
परभणी- राष्ट्रवादी
बीड - भाजप
उस्मानाबाद - शिवसेना
लातूर - भाजप
विदर्भातील मतदारसंघात कोण बाजी मारणार
या सर्व्हेमध्ये विदर्भात असलेल्या 10 लोकसभा मतदारसंघात भाजपचा वरचष्मा झालेला पाहायला मिळत आहे. यामध्ये भाजपला 6, शिवसेनेला 3 आणि काँग्रेसला एका जागेवर विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला आहे. या सर्वेनुसार अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनाही धक्का बसण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर नागपुरातून नितीन गडकरी यांचा विजय होणार असून भंडारा गोंदियाची जागा राष्ट्रवादीच्या हातून सुटण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
विदर्भात कोणत्या मतदारसंघात कोण जिंकणार
बुलढाणा - शिवसेना
अकोला - भाजप
अमरावती - शिवसेना
वर्धा- भाजप
रामटेक- काँग्रेस
नागपूर - भाजप
यवतमाळ/वाशीम - शिवसेना
चंद्रपूर - भाजप
भंडारा / गोंदिया - भाजप
गडचिरोली / चिमूर - भाजप
2014 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात झालेल्या मतदानाची टक्केवारी
एनडीए - 49.6 टक्के
युपीए - 36.9 टक्के
अन्य - 13. 5 टक्के
2019 च्या निवडणुकीत महाराष्ट्रात होणाऱ्या मतदानाची टक्केवारी (अंदाज)
एनडीए :- 48 टक्के
युपीए :- 37 टक्के
वंचित आणि अन्य :- 2 टक्के
इतर :- 13टक्के
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement