एक्स्प्लोर

पालघरची लोकसभा निवडणूक तिरंगी, बविआच्या उमेदवाराला माकपचा पाठिंबा

माकपकडून पालघरसाठी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर करण्यात आला, तर दिंडोरीत बहुजन विकास आघाडीकडून माकपला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन बविआचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिलं.

पालघर : पालघरमधील लोकसभेच्या जागेसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे पालघरमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पहिल्यांदाच माकपकडून पालघर लोकसभेची जागा लढवली जाणार नसल्याचं स्पष्टीकरण अ. भा. किसान सभेचे अध्यक्ष अशोक ढवळे यांनी दिलं. पालघर मधील मनोरमध्ये आज बविआचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि अशोक ढवळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली. दिंडोरी लोकसभेच्या जागेसाठी माकप आग्रही असताना काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून ही जागा दिली गेली नाही. त्यामुळे माकपकडून पालघरसाठी बहुजन विकास आघाडीला पाठिंबा जाहीर करण्यात आला. तर दिंडोरीत बहुजन विकास आघाडीकडून माकपला सर्वतोपरी मदत केली जाईल, असं आश्वासन आमदार हितेंद्र ठाकूर यांनी दिलं. सत्तेतील शिवसेना-भाजपला हरवणं हे एकमेव उद्दिष्ट असून वेगळे लढल्याने माकप आणि बहुजन विकास आघाडी या दोन्ही पक्षांचं नुकसान होणार, अशी या दोन्ही पक्षांची भूमिका होती. भाजप सरकारकडून जनतेची फसवणूक झाल्यामुळे भाजप सरकार विरोधात एकत्र आल्याचं मत दोन्ही पक्षांकडून व्यक्त करण्यात आलं. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, जव्हार, विक्रमगड तालुके माकपचे बालेकिल्ले म्हणून ओळखले जातात. आठ महिन्यांपूर्वी झालेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीच्या वेळी दोन्ही पक्ष वेगळे लढल्याने बहुजन विकास आघाडी तिसऱ्या, तर माकप चौथ्या क्रमांकावर राहिली होती. मात्र या लोकसभेत माकप आणि बहुजन विकास आघाडी एकत्र आल्याने त्यांची ताकद वाढली आहे. बहुजन विकास आघाडीचे उमेदवार हमखास विजय होतील असा विश्वास पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget