एक्स्प्लोर
लोकसभा निवडणूक : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून लढणार
15 उमेदवारांच्या जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत.

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केली आहे. यात 15 उमेदवारांच्या जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी उत्तर प्रदेशमधील अमेठीतून तर सोनिया गांधी या रायबरेली मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. VIDEO : काँग्रेसची पहिली यादी जाहीर, राहुल गांधी अमेठीतून तर सोनिया गांधी रायबरेलीतून लढणार
लोकसभा निवडणुका मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील अशी शक्यता होती. मात्र अद्यापपर्यंत झालेल्या नाहीत. प्रामुख्याने लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम भाजपा आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्येच रंगणार आहे. राहुल गांधी अमेठीतून, सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा झाली असली तरी प्रियांका गांधी यांचं नाव तूर्तास यादीत आलेलं नाही. प्रियांका गांधी यांच्या प्रवेशानंतर सोनिया लोकसभा लढणार की नाही याबद्दल साशंकता होती, मात्र त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.
काँग्रेसने उमेदवार जाहीर केलेल्या 15 जागांपैकी 11 जागा उत्तर प्रदेशातील तर चार जागा गुजरातमधील आहेत. सलमान खुर्शीद हे फरुखाबादमधून नशीब आजमावणार आहेत. दरम्यान यूपीत लोकसभेच्या 80 जागा आहेत. बसपा आणि समाजवादी पक्षानं भाजपविरोधात महागठबंधन तयार केलंय. आणि आता काँग्रेस महागठबंधनात सामील झाली आहे.Congress releases first list of 15 candidates for Lok Sabha elections. 11 from Uttar Pradesh and 4 from Gujarat. Sonia Gandhi to contest from Rae Bareli and Rahul Gandhi to contest from Amethi. pic.twitter.com/PZI4TlJfC6
— ANI (@ANI) March 7, 2019
लोकसभा निवडणुका मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जाहीर होतील अशी शक्यता होती. मात्र अद्यापपर्यंत झालेल्या नाहीत. प्रामुख्याने लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम भाजपा आणि काँग्रेस या दोन पक्षांमध्येच रंगणार आहे. राहुल गांधी अमेठीतून, सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून लढणार असल्याची घोषणा झाली असली तरी प्रियांका गांधी यांचं नाव तूर्तास यादीत आलेलं नाही. प्रियांका गांधी यांच्या प्रवेशानंतर सोनिया लोकसभा लढणार की नाही याबद्दल साशंकता होती, मात्र त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम


















