एक्स्प्लोर

मोदींनी देशाला दिलेलं एकही वचन पाळलं नाही, संगमनेरमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल

मोदींनी जनतेची फसवणूक केली. मात्र आम्ही पूर्ण अभ्यास करुन तयार केलेली 'न्याय योजना' घेऊन येत आहोत. त्यातून गरिबांना न्याय, अर्थव्यवस्थेला चालना आणि नोकऱ्या उपलब्ध होतील, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं.

संगमनेर, अहमदनगर : सत्तेत येण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकरी, तरुणांना मोठमोठी स्वप्न दाखवली. मात्र प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख देण्याच्या थापा मारुन ते सत्तेत आले आणि सत्तेत आल्यावरही थापेबाजी सुरुच आहे, अशा शब्दात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल चढवला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारासाठी राहुल यांनी संगमनेरमध्ये सभा घेतली. मोदींनी जनतेची फसवणूक केली. मात्र आम्ही पूर्ण अभ्यास करुन तयार केलेली 'न्याय योजना' घेऊन येत आहोत. त्यातून गरिबांना न्याय, अर्थव्यवस्थेला चालना आणि नोकऱ्या उपलब्ध होतील, असं आश्वासन राहुल गांधी यांनी दिलं. राहुल यांनी 56 इंच छातीचा उल्लेख करत मोदींवर घणाघात केला. मी वृत्तपत्रात वाचतो अनिल अंबानीला कर्ज दिलं. मेहुल चोक्सी, विजय मल्ल्या बँकांकडून कर्ज घेऊन पळून गेले. पंधरा लाख रुपये प्रत्येकाला द्यायचं वचन नरेंद्र मोदींनी दिलं होतं. भारतातील गरीबांच्या खात्यावर 15 लाख रुपये जमा करणार हा नरेंद्र मोदींचा जुमला होता, अशी टीकाही राहुल गांधींनी केली. मला एका योजनेची कल्पना सुचली. पाच महिन्यांपूर्वी आमच्या टीमची बैठक झाली. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञांना भेटून एक वस्तुनिष्ठ योजना तयार करण्यात आली. प्रत्येक महिन्याला पाच कोटी गरीब कुटुंबांना 72 हजार रुपये दिले जाणार. पैसे देऊन 25 कोटी जनतेचं जीवन आम्ही बदलू, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला. नरेंद्र मोदींनी रात्री आठ वाजता नोटाबंदी केली, रात्री बारा वाजता गब्बर सिंग टॅक्स (जीएसटी) लागू केला. शेतकरी, महिलांचे पैसे घेऊन बँकेत टाकले. नोटाबंदीमुळे बाजारातील खरेदी बंद केली, असंही राहुल गांधी म्हणाले. 2019 निवडणुकीनंतर कर्जासाठी शेतकऱ्यांना जेलमध्ये टाकले जाणार नाही. सरकार कायदा बनवेल. शेतकऱ्यांसाठी वेगळा अर्थसंकल्प आम्ही मांडू. दोन कोटी लोकांना रोजगार मिळेल, असं सांगतानाच रोजगार देण्याएवजी मोदींनी रोजगार हिरावून घेतल्याचा आरोपही यावेळी राहुल गांधींनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा; विजयाचा निर्धार अधिक मजबूत
भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा; विजयाचा निर्धार अधिक मजबूत
पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, शरद पवारांच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा, चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरेंसोबत व्यासपीठावर उपस्थित
पुणे शिक्षक आणि पदवीधर निवडणूक, शरद पवारांच्या आमदाराचा भाजपला पाठिंबा, चंद्रकांत पाटील आणि जयकुमार गोरेंसोबत व्यासपीठावर उपस्थित
Gokul Election: गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
गोकुळच्या निवडणुकीत चुरशीने 99.96 टक्के मतदान; 12 पैकी 10 तालुक्यात शंभर टक्के, गुलाल उद्या दुपारीच लागणार!
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका
अजितदादांचा आजचा पक्ष सक्षम नाही, पुणे पदवीधर जागा मिळायला हवी होती, रोहित पवारांचा टोला, तर अर्थमंत्रीपदावरुनही मुख्यमंत्र्यांवर टीका

व्हिडीओ

Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha
Ramanandacharya Narendracharya Maharaj Majha Katta : लोकांनी आपला गुरु कसा निवडावा? रामानंदाचार्य नरेंद्राचार्य माझा कट्ट्यावर : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tiger Shroff: दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
दैव बलवत्तर म्हणून अवघ्या काही सेकंदात टायगर श्राॅफ बचावला, घटनास्थळावरील थरकाप उडवणारे 12 फोटो
Tiger Shroff Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगरचा जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
Video: पिक्चरपेक्षा भयानक एकाकडून धडाधड गोळीबार, दुसऱ्याची कारला चिकटून असताना बंदूक लोड झालीच नाही आणि टायगर श्रॉफचा अवघ्या काही सेकंदात जीव वाचला! थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ समोर
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
टायगर श्रॉफवरील हल्ल्याची लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली जबाबदारी; ऑडिओ क्लीप, फेसबुक पोस्ट जारी
Tiger Shroff: बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
बाबा सिद्दीकींना संपवलं, सलमान खान, रोहित शेट्टीनंतर आता टायगर श्राॅफवर जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावर गोळीबार; मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेच्या चिंधड्या
Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
टायगर श्रॉफच्या कारवर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी 7 गोळ्या झाडल्या! जुहू पोलिस स्टेशनच्या अवघ्या 100 मीटर अंतरावरुन धडाधड गोळीबार
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
सानप कोण, मी त्याला ओळखत नाही, जंतरमंतर बसून मतं मिळत नसतात; जयकुमार गोरेंचा विरोधकांना टोला
Sensex : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका, सर्वाधिक फायदा 'या' कंपनीला
सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांची तुफान कमाई, 3.65 लाख कोटींनी संपत्ती वाढली, एका कंपनीला फटका
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑक्टोबर 2026 | रविवार
Embed widget