भाजपच्या सांगण्यावरून पोलिसांची दंडूकेशाही; पोलिसांसह निवडणूक आयोगावर काँग्रेसच्या नितीन राऊतांचा गंभीर आरोप
Nitin Raut : पोलीस भाजप उमेदवारच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप करत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी पोलिसांसह निवडणूक आयोगावर नाराजी व्यक्त केली आहे.
Maharashtra Assembly Election 2024 : निवडणूक आयोगाने (Election Commission) पुरेशी तयारी न करताच निवडणूक घेतली, वेळेवर पोलिंग अधिकारी बदलले आहे. तर अनेक मतदारांचे नाव मतदार यादीतून डिलीटेड आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाची स्थिती असल्याचा आरोप काँग्रेस नेते नितीन राऊत (Nitin Raut) यांनी केला आहे.
नागपुरात काही मतदान केंद्रात अडीच तासांपर्यंत मतदान थांबले होते. त्यामुळे ईव्हीएम खराब झाल्याने मतदान काही वेळ थांबले होते, त्या मतदान केंद्रावर वाया गेलेला वेळ संध्याकाळी सहानंतर वाढवून देण्यात यावा अशी मागणी ही नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी नागपूर पोलिसांवर दंडूकेशाहीचा आरोप करत घणाघात केला आहे. नागपूर पोलीस भाजप उमेदवारच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप करत राऊत यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बूथ लावण्याबद्दल पोलिसांनी केलेल्या विचारणेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
मतदान केंद्रावर महिला आणि तरुण मतदारांचा गर्दी
दुसरीकडे उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघात जरीपटका परिसरातील मतदान केंद्रावर महिलांची मोठी गर्दी दिसून आली आहे. यावेळी बहुतांशी महिला आणि तरुणी मतदान करायला खांद्यावर भगव्या रंगाच्या चुनरी घालून मतदान केंद्रावर पोहोचल्या होत्या. भगव्या चुनरी घेऊन आलेल्या महिला आणि तरुणी मतदारांचा हा समूह सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. निवडणुकीमध्ये जरी लाडकी बहीण योजना यासह अनेक मुद्दे गाजले असले, तरी प्रत्येक मतदान केंद्रावर महिला मतदारांची संख्या लक्ष वेधून घेत आहे. नागपूरच्या शंकरनगर परिसरात सरस्वती विद्यालयाच्या मतदान केंद्रावर महिलांची मोठी रांग सकाळपासूनच दिसून येत आहे. त्यामुळे महिलांच्या योजनांवर झालेल्या निवडणुकीमध्ये महिला हिरीरीने सहभाग नोंदवत असल्याचा चित्र आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024
नागपूर जिल्हा मतदान टक्केवारी
सकाळी 11:00 वाजेपर्यंतची जिल्ह्याची सरासरी मतदान टक्केवारी १८.९० %
हिंगणा १६.९२ %
कामठी १९.६२ %
काटोल १५.६९ %
नागपूर मध्य १५.४८ %
नागपूर पूर्व २०.५३ %
नागपूर उत्तर १६.३८%
नागपूर दक्षिण २०.२१ %
नागपुर दक्षिण पश्चिम १९.९१ %
नागपूर पश्चिम १८.३३ %
रामटेक २०.५२ %
सावनेर २०.२५%
उमरेड २३.४७ %
यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील- देवेंद्र फडणवीस
मतदान हा लोकशाहीचा उत्सव असून ते आपलं कर्तव्य आणि आपला अधिकार देखील आहे. आज कुटुंबासोबत मतदान केल आहे. महाराष्ट्रातील सर्व बंधू-भगिनी महाराष्ट्रातील जनतेला आव्हान आहे की सर्वांनी मतदान करावे. लोकशाहीत सरकारकडून आपण अपेक्षा ठेवतो, त्या अपेक्षा ठेवत असताना जो मतदान करतो त्याला जास्त अपेक्षा ठेवण्याचा अधिकार आहे. आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे. तसेच लोकसभेत ज्या याद्यांमध्ये घोळ होता, तो काही प्रमाणात दूर झालेला आहे. वोटिंग सिस्टीम लोकसभेत स्लो होती त्याच्यात आता इम्प्रूमेंट झालं आहे. लोकसभेसारखं ऊन आज नाहीये, त्यामुळे निश्चित टक्का वाढेल. असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोलतांना व्यक्त केला आहे.
हेही वाचा :