एक्स्प्लोर

MVA : आतापर्यंत आमची 125 जागांवर सहमती, महाविकास आघाडीची सत्ता येणार, 180 जागा जिंकणार, बाळासाहेब थोरात यांचा दावा

Balasaheb Thorat : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होईल, असं म्हटलं.

मुंबई : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) महाविकास आघाडीचं (MVA) जागा वाटप योग्य मार्गावर असल्याचं म्हटलं आहे. आमची आतापर्यंत 125 जागांवर सहमती झाल्याची माहिती देखील त्यांनी दिली. महाविकास आघाडी  विधानसभा निवडणूक जिंकणार असल्याचा दावा देखील त्यांनी केला. मविआ 288 पैकी 180 जागा जिंकेल , असं बाळासाहेब थोरात यांनी 'द हिंदू' या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. 

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता येईल असा दावा करण्यासोबतच बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चेबद्दल देखील माहिती त्या मुलाखतीत दिली आहे. मविआच्या जागा वाटपाच्या चर्चा अनंत चतुर्दशी नंतर पुन्हा सुरु होतील, असं ते म्हणाले. मविआची प्रचार मोहीम कशी असेल याबाबतचा निर्णय देखील त्यानंतर घेण्यात येईल, असंही बाळासाहेब थोरात  यांनी म्हटलं. 

जागावाटपाची चर्चा लवकरच सुरु होणार

महाविकास आघाडीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि काँग्रेस हे तीन पक्ष प्रमुख आहेत. मविआच्या जागा वाटपाच्या आतापर्यंत तीन फेऱ्या झालेल्या आहेत. गणेशोत्सव असल्यामुळं जागा वाटपच्या चर्चा सध्या थांबलेल्या आहेत. अनंत चतुर्दशीनंतर त्या सुरु होतील, असंही थोरात यांनी म्हटलं. 

महाराष्ट्रात तिसरी आघाडी देखील निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता असल्याबाबतच्या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांनी भाजपचं राजकारण अशाच प्रकारचं आहे, ते थेट लढत नाहीत. मतांचं विभाजन करुन विजय मिळवण्यासाठी ते अशा गोष्टी करतात, असं म्हटलं. भाजपकडून असे प्रकार अनेक वर्ष केले जात आहेत. मात्र, यावेळी महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये थेट लढत होईल, असंही त्यांनी म्हटलं. 

बाळासाहेब थोरात यांनी महायुतीच्या कारभारावर देखील टीका केली. महायुतीच्या पक्षांमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच आहे, प्रशासकीय प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी भ्रष्टाचाराचं प्रमाण वाढलंय, भाजपचा मित्रपक्षांच्या जागा मिळवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला. लोक या सर्व गोष्टी पाहत आहेत, असं देखील बाळासाहेब थोरात म्हणाले. 

दरम्यान, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना महाविकास आघाडीची राज्यात सत्ता येणार असल्याचं म्हटलं होतं. महाविकास आघाडीला विधानसभा निवडणुकीत 183 जागा मिळतील, असा दावा केला आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं 48 पैकी 30 जागा जिंकल्या होत्या. तर, महायुतीला 17  जागांवर समाधान मानावं लागलं.

इतर बातम्या:  

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?

व्हिडीओ

Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना
Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
बिहारमध्ये महिलांना भर निवडणुकीत 10-10 हजार वाटल्यानंतर आता उत्तर प्रदेशात 50-50 हजार वाटण्याची तयारी; निवडणुकीच्या तोंडावर 20-20 हजार खात्यात सोडणार?
Shiv Sena Name & Symbol Dispute: 'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
'पण निवडणूक आयोग शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह देऊ शकत नाही..' अत्यंत कळीचा मुद्दा उपस्थित करत कपिल सिब्बलांकडून पुन्हा आयोगाच्या कारभाराची खरडपट्टी
Joe Root: नवा गडी, नवं राज्य!
नवा गडी, नवं राज्य! "तुम्हाला बिअर प्यायची असेल तर प्या, पण..." कॅप्टन होताच जो रूट इंग्लंड संघाचा नाइट कर्फ्यू उठवत काय काय म्हणाला?
Hardik Pandya: हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
हार्दिक पांड्याचा तो एक फोटो पाहून मुंबईचे चाहते सपशेल गोंधळात; आयपीएल लिलावापूर्वी दिल्लीने टाकला मोठा डाव?
Monsoon Session: पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी लोकसभेचं कामकाज फक्त एका मिनिटात संपलं, वंदे मातरम होताच कामकाज अनिश्चित काळासाठी स्थगित
Embed widget