एक्स्प्लोर
काँग्रेस म्हणजे ब्रिटिशांची औलाद तर राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेसचं पिल्लू : पंकजा मुंडे
काँग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद आहेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेस हे कॉंग्रेसचे पिल्लू आहे, अशी घणाघाती टीका महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.
नांदेड : काँग्रेसवाले ब्रिटिशांची औलाद आहेत तर राष्ट्रवादी कॉंग्रेस हे कॉंग्रेसचे पिल्लू आहे, अशी घणाघाती टीका महिला आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे. नांदेडमधील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील-चिखलीकर यांच्या प्रचारासाठी पंकजा मुंडे आज नांदेडमधल्या मुखेड येथे आल्या होत्या. मुखेड येथील जाहीर सभेत त्या बोलत होत्या.
चिखलीकरांच्या प्रचारासाठी मुखेड येथे भारतीय जनता पक्षाने सभेचे आयोजन केले होते. या सभेत बोलत असताना पंकजा मुंडे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर टीका केली. पंकजा मुंडे म्हणाल्या की, काँग्रेसवाले म्हणजे ब्रिटिशांची औलाद आहे. यांनी ब्रिटिशांप्रमाणे देशात डिव्हाईड अॅन्ड रुल ही पॉलीसी राबवली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे त्याच काँग्रेसचे पिल्लू आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, ब्रिटीश भारतात व्यवसाय करण्यासाठी आले होते. व्यवसाय करता-करता त्यांनी 150 वर्ष भारतावर सत्ता गाजवली. त्यानंतर काँग्रेसवाल्यांनी सत्तेमध्ये व्यवसाय केला, त्यामुळे लोकांचा काँग्रेसवरचा विश्वास उडाला आहे.
पंकजा म्हणाल्या की, सुरुवातीला काँग्रेसशिवाय पर्याय नव्हता. परंतु भारतीय जनता पार्टी ही एक सक्षम पर्याय म्हणून उभी राहिली, तेव्हा या काँग्रेवाल्यांनी ब्रिटिशांप्रमाणे डिव्हाईड अॅन्ड रुल ही पॉलीसी राबवली. भारतीय जनता पक्ष हा अल्पसंख्यांकांच्या विरोधात असल्याचा अपप्रचार करुन काँग्रेसवाल्यांनी देशात उभी फूट पाडली. तर राष्ट्रवादी हे त्यांचेच पिल्लू आहे. राष्ट्रवादीवाल्यांनी जाती-जातींमध्ये समाजाचे तुकडे केले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement