एक्स्प्लोर
काँग्रेसच्या पहिल्या उमेदवार यादीत कोणाचा समावेश? संभाव्य उमेदवारांची यादी
अशोक चव्हाण भोकरमधून निवडणूक लढवणार आहेत. तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून सतेज पाटील यांच्या पुतण्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आज आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्याची शक्यता आहे. या यादीत जे विद्यमान आमदार आहेत त्यांची वर्णी लागणार आहे. त्याचप्रमाणे जे माजी नेता, मंत्री आहेत त्यांना देखील उमेदवारी मिळणार आहे. अशोक चव्हाण भोकरमधून निवडणूक लढवणार आहेत. तर कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून सतेज पाटील यांच्या पुतण्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यादीत या उमेदवारांच्या नावाची शक्यता बाळासाहेब थोरात - संगमनेर अशोक चव्हाण - भोकर पृथ्वीराज चव्हाण - कराड दक्षिण विजय वडेट्टीवार - ब्रह्मपुरी केसी पडवी - अक्कलकुवा नसीम खान - चांदवली वर्षा गायकवाड - धारावी अमीन पटेल - मुंबादेवी यशोमती ठाकूर - तिवसा विश्वजीत कदम - पलूस-कडेगाव ऋतुराज पाटील - कोल्हापूर दक्षिण पी. एन. पाटील - करवीर अमित देशमुख - लातूर धीरज देशमुख - लातूर ग्रामीण बसवराज पाटील - औसा मधुकर चव्हाण - तुळजापूर वसंत चव्हाण - नायगाव, (नांदेड) डी पी सावंत - नांदेड उत्तर कैलास गोरंट्याल - जालना कल्याण काळे - फुलंब्री सुरेश वरपूडकर - परभणी डॉ. संतोष तारफे - कळमनुरी (राजीव सातव यांच्या जागी) वसंत पुरके - राळेगाव रणजित कांबळे - वर्धा अमर काळे - आर्वी सुनील केदार - सावनेर हर्षवर्धन सपकाळ - बुलढाणा माणिक जगताप - महाड रमेश बागवे - पुणे कॅन्टॉन्मेंट
आणखी वाचा




















