एक्स्प्लोर

आचारसंहिता भंगाच्या तक्रारींऐवजी नागरिकांकडून सेल्फीसह हाय-हॅलोचे मेसेज, ॲप अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतेय

या ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींऐवजी नागरिकांनी सेल्फींसोबतच हाय, हॅलो आणि गुडमॉर्निंगचे मेसेजेस केले आहेत. आता अशा लोकांवर प्रशासन आता त्यांच्यावर कारवाई करण्याचा तयारीत आहे

नाशिक : आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून  'सी व्हिजिल' ॲप तयार करण्यात आले आहे. या ॲपवर एकीकडे निवडणुकीच्या काळात सध्या तक्रारींचा पाऊस पडत आहे. मात्र दुसरीकडे नाशिकमध्ये मात्र हे ॲप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी चांगलेच डोकेदुखी ठरते आहे. कारण या ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींऐवजी नागरिक सेल्फींसोबतच हाय, हॅलो आणि गुडमॉर्निंगचे मेसेजेस टाकत आहे. नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ऑनलाईन दाखल करता याव्यात यासाठी निवडणूक आयोगाने उपलब्ध करुन दिलेले सी व्हिजिल (cVigil) मोबाईल ॲप प्रभावी ठरले आहे. या ॲपवर राज्यभरात 717 तक्रारी दाखल झाल्या असून त्यापैकी तथ्य आढळलेल्या 294 तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे. मात्र  नाशिकमध्ये हे ॲप निवडणूक अधिकाऱ्यांसाठी चांगलेच डोकेदुखी ठरते आहे. कारण या ॲपवर आचारसंहिता भंगाच्या तक्रारींऐवजी नागरिकांनी सेल्फींसोबतच हाय, हॅलो आणि गुडमॉर्निंगचे मेसेजेस केले आहेत. आता अशा लोकांवर प्रशासन आता त्यांच्यावर कारवाई करण्याचा तयारीत आहे ‘सी व्हिजिल’च्या माध्यमातून नागरिकांची नजर  राज्यभरातून या ॲपवर प्राप्त तक्रारींपैकी आचारसंहिता भंग झाल्याच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्यात आली. 36 तक्रारींवर कार्यवाही सुरु आहे, तर 387 तक्रारी ह्या आचारसंहितेशी संबंधित नसल्याने त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही. प्राप्त तक्रारींपैकी सर्वाधिक 230 तक्रारी ह्या विनापरवाना लावण्यात आलेले पोस्टर, बॅनर संदर्भातील आहेत. संपत्ती विद्रुपीकरण 44, शस्त्रप्रदर्शन किंवा दहशतीचे वातावरण 7, भेटवस्तू किंवा कुपनचे वाटप 22, मद्याचे वाटप 18, पैशाचे वाटप 38, पेड न्यूज 41, धार्मिक किंवा सामाजिक भाषण 3, प्रचारफेरीसाठी नागरिकांची वाहतूक 5, निर्धारीत वेळेनंतर ध्वनीक्षेपकाचा वापर 5 तर विनापरवाना वाहनांचा वापर याबाबत 19 तक्रारी ॲपवर नोंदवण्यात आल्या. ॲपच्या सहाय्याने सर्वाधिक 133 तक्रारी पुणे जिल्ह्यातून नोंदवण्यात आल्या. त्या खालोखाल ठाणे 68, सोलापूर 61, मुंबई उपनगर 45 तर मुंबई शहर येथे 41 तक्रारी दाखल झाल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात 36, अहमदनगर 35, अकोला 11, अमरावती 11, औरंगाबाद 12, बीड 8, भंडारा 2, बुलढाणा 13, चंद्रपूर 3, धुळे 2, गडचिरोली 2, गोंदीया 3, हिंगोली 7, जळगाव 20, जालना 1, कोल्हापूर 18, लातूर 11, नागपूर 30, नंदूरबार 2, नाशिक 22, उस्मानाबाद 8, पालघर 24, परभणी 7, रायगड 8, रत्नागिरी 4, सांगली 17, सातारा 11, सिंधुदूर्ग 19,  वर्धा 14, वाशिम 6 तर यवतमाळ जिल्ह्यातून 2 तक्रारी नोंदवण्यात आल्या. आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास सी व्हिजिल ॲपच्या माध्यमातून थेट ऑनलाइन तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कॅमेरा, इंटरनेट कनेक्शन आणि जीपीएस सुविधा असलेल्या स्मार्टफोनद्वारे या ॲपच्या माध्यमातून तक्रार करता येते. आदर्श आचारसंहिता भंग होत असल्याचे वाटल्यास नागरिक त्या घटनेचे छायाचित्र किंवा 2 ते 3 मिनिटांचा व्हिडिओ रेकॉर्ड करुन ॲपवर टाकू शकतात. अॅप वापरकर्त्यास आपली ओळख लपवून तक्रार नोंदविण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. या प्रणालीस नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. सी व्हिजिल मोबाईल ॲप हे डाऊनलोडसाठी गुगल प्ले स्टोअर तसेच ॲपल स्टोअरवर उपलब्ध आहे. ॲपवर तक्रार अपलोड केल्यापासून साधारण दीड तासात तक्रारीची स्थिती तक्रारकर्त्याला प्राप्त होते. त्यानंतर तक्रार योग्य असल्यास त्या तक्रारकर्त्याच्या मोबाइलवर तसा संदेश प्राप्त होतो. मतदारांना पैसा, मद्य, अंमली पदार्थांचे वाटप करणे, शस्त्रसाठा अथवा शस्त्रवापर, मतदारांना मारहाण, दमबाजी, चिथावणीखोर भाषण, पेड न्यूज, फेकन्यूज, मतदारांना आमिष म्हणून वस्तूंचा वापर, मतदान केंद्रापर्यंत मतदारांची मोफत वाहतूक, उमेदवाराची मालमत्ता आदी विविध प्रकारच्या आचारसंहिता भंगाच्या प्रकरणात सी व्हिजिल मोबाईल ॲपवर तक्रार करता येते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti CM Special Report : शर्यतीतून फडणवीसांची माघार;महायुतीचा मुख्यमंत्री कोण ?ABP Majha Headlines :  7 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Kartik Purnima 2024 : आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
आज कार्तिक पौर्णिमेचा दिवस 3 राशींसाठी खास; 15 नोव्हेंबरपासून सुवर्णकाळ सुरू, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Embed widget