Chiplun Vidhan Sabha Results 2024 : चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या शेखर निकमांची बाजी, मविआचा उमेदवार पराभूत
Chiplun Assembly Elections Result 2024 : चिपळूण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या शेखर निकम यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे, तर शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे.
Chiplun Vidhan Sabha Constituency Election 2024 : चिपळूण विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल (Chiplun Assembly Elections 2024 Result) आता लागला आहे. या चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शेखर निकम (Shekhar Nikam) यांचा विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रशांत यादव (Prashant Yadav) यांचा पराभव झाला आहे. सध्या चिपळूण मतदारसंघाचे आमदार हे शेखर निकमच आहेत, तेच पुन्हा एकदा निवडून आले आहेत.
2019 मध्येही आले होते निवडून
राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर निकम यांना 2019 मध्ये 1 लाख 1 हजार 578 मतं मिळाली होती. त्यांनी शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांचा पराभव केला होता. चव्हाण यांना 71 हजार 654 मतं मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीतही चिपळूणमधून शेखर निकम यांनी बाजी मारली आहे.
हेही वाचा:
Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्राचे नवे 288 आमदार, सर्व विजयी उमेदवारांची यादी, पाहा