Chhagan Bhujbal: जुनी शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म पवार साहेबांनी केलेय; शरद पवारांचा टीकेनंतर मंत्री छगन भुजबळांचा गौप्यस्फोट
Chhagan Bhujbal on Sharad Pawar : शरद पवारांनी माझ्या बाबत आता का बोलले, हे मला कळले नाही. मात्र शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म पवार साहेबांनी केलेय. असा गौप्यस्फोट मंत्री छगन भुजबळांनी केला आहे.
नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी अजित पवारांसोबत गेलेल्या आणि सध्याचे अन्न पुरवठा मंत्री असलेल्या छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर आज जोरदार हल्लाबोल केलाय. महाराष्ट्राच्या विधानसभा, विधानपरिषदेत संधी दिली, विरोधी पक्षनेते पद दिले. पण, त्यांनी काही उद्योग केले, त्यांना पद सोडवं लागलं, तुरुंगात गेले, त्यांना भेटायला कोणी जात नव्हते. माझी मुलगी, आम्ही त्यांना भेटायला गेलो, त्यांना पुन्हा संधी दिली, तुम्ही त्यांना निवडून दिले असे म्हणत शरद पवारांनी छगन भुजबळांवर थेट हल्लाबोल केलाय.
मुबंईतील शिवाजी पार्कवर संमेलन घेतले होते, त्याचे अध्यक्षपद भुजबळ यांना दिले. उपमुख्यमंत्री पद दिले, त्यानंतर ते आणखी उद्योग करत होते, त्याचा परिणाम सरकारवर झाल्याचेही शरद पवारांनी म्हटले. एखाद्या माणसानं चुकीचे काम करताना काही मर्यादा असतात, त्या भुजबळ यांनी शिल्लक ठेवल्या नाहीत, अशा लोकांना पुन्हा निवडुन द्यायचं नाही हा विचार तुम्ही करायचा आहे. असे म्हणत शरद पवारांनी येवला येथील सभेतून येवलेकरांना साद घातली आहे.
शरद पवारांनी माझ्या बाबत आता का बोलले, हे मला कळले नाही. मात्र शिवसेना फोडण्याचे पुण्यकर्म पवार साहेबांनी केलेय. पवार साहेबांनीच हे चांगले काम केलंय. ते जर केलं नसतं तर आज फुटा फूट झाली नसती. असा गंभीर आरोप करत शरद पवार यांनी केलेल्या टीकेला छगन भुजबळ यांनी पलटवारकरत उत्तर दिले आहे.
.... अब बात निकली है तो दुर तक जयेगी-छगन भुजबळ
काँगेसमधून तुम्हाला दूर केले तेव्हा एकमेव माणुस छगन भुजबळ तुमच्या बरोबर होता.मुकुल वासनिकसह सर्व सांगत होते तुम्ही जाऊ नका, मी तुम्हाला मुख्यमंत्री करतो पण मी गेलो नाही, पवार साहेब तुमच्या प्रेम पोटी मी आलो होतो. माझावर हल्ला झाला तेव्हा पवार साहेब मला भेटण्यासाठी आले होते. पवार साहेब असे कसे काय विसरतात? आता हे सर्व मुद्दे काढण्याचे काय गरज आहे, जुने मुडदे उकरू नव्या गोष्टी बाहेर आल्या तर बात दुर तक जयेगी. मात्र पवार साहेबांबद्दल मला आदर आहे. तो कायम राहणार. पण तुम्ही काही बोललात म्हणून मला खुलासा करावा लागतोय, असेही मंत्री छगन भुजबळ म्हणाले.
माझ्यात काही नसतं तर मला पवारसाहेबांनी मंत्री पद दिले नसतं- छगन भुजबळ
बाळासाहेब ठाकरे यांनी मला आमदार, मंत्री केलं. याबाबत मी आभार मानले आहे. शरद पवारांनी माझ्या बाबत आता का बोलले हे मला कळले नाही. माझ्यात जर काही तरी असेल तर बाळासाहेब नी मला मंत्री पद दिले. माझ्यात काही नसेल तर मला पवार साहेब यांनी महसूलमंत्री पद दिले नसते. मागेच माझ्याकडं नवनवीन लोक असल्याने मंत्री पद दिले नाही, असे बोलले. मी नव्हतो तर अजित पवार, आर आर पाटील यांना का पद नाही दिले. सुधाकर राव नाईक आणि पवार साहेबांचे टोकाचे मतभेद झाले. एवढे की दंगे सुधाकर राव नाईक याना सांभाळता येत नाही म्हूणन पुन्हा त्यांना दिल्लीतून पाठवले.
मुख्यमंत्री झाले तर वरचढ ठरतील म्हणून इतरांना होऊ दिले नाही. तेलगी प्रकरण माझा काही संबंध नसताना राजीनामा द्यायला लावला. Tv चॅनल वर हल्ला झाला यांबद्दल मला काही महिती नाही, म्हणून राजीनामा द्यायला लावला. मी देण्याच्या आधी त्यांनी राजिनामा दिला. यात पुढे बोलण्यासारखे खूप होते, पण आता बोलणार नाही, असे म्हणत छगन भुजबळ यांनी अनेक खुलासे यावेळी केले आहे.
हेही वाचा