एक्स्प्लोर

चंद्रपूर लोकसभा मतदार संघ : युती न झाल्यास हंसराज अहिरांना शिवसेनेकडून तगडी टक्कर

भाजप आणि शिवसेना यांच्यात जर युती झाली नाही तर शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर हे देखील लोकसभेच्या मैदानात उतरू शकतात. बाळू धानोरकर आणि हंसराज अहिर यांच्यात जुना राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या संघर्षाला आणखी धार चढेल.

चंद्रपूर : देशाच्या राजकारणात जात आणि धर्म यांचा निवडणुकीसाठी होणारा वापर नेहमीच चर्चेचा आणि चिंतेचा विषय असतो. मात्र याला अपवाद ठरतील अशा देशातील काही अपवादात्मक मतदारसंघांपैकी एक म्हणजे चंद्रपूर लोकसभा मतदार संघ आहे. या मतदार संघात कायमच पक्ष, विचारधारा आणि उमेदवाराची वैयक्तिक छबी यावर मतदान झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात गेल्या 65 वर्षात जातीचा विचार न करता मुस्लिम, ब्राम्हण, जैन, गवळी, आदिवासी, तेली या समाजाचे खासदार सातत्याने निवडून दिले आहे. या मतदारसंघात कुठल्याही एका जातीकडे निर्णायक ठरु शकेल इतकी संख्या नाही. मतदारसंघात सर्वाधिक संख्या कुणबी मतदारांची असली तरी दलित, आदिवासी, तेली, माळी (मरार) आणि अमराठी मतदारांची संख्या देखील त्यांच्या खालोखाल आहे. त्यामुळे देखील जातीचं कार्ड खेळण्याचा प्रयत्न एखाद्या उमेदवाराने केला की इतर जाती त्याविरूध्द आपोआप गोलबंद होतात असा आतापर्यंतचा इतिहास आहे. सोबतच या मतदारसंघातले खासदार हे कधीच राज्याच्या राजकारणात सक्रिय राहिले नाही तर कायम दिल्लीत रमले आणि त्याचा फायदा मतदारसंघासाठी पदरात पाडून घेतला. मतदारसंघाचा इतिहास कधी काळी काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व असलेला चंद्रपूर लोकसभा मतदार संघ भाजपने गेली तीन टर्म उध्वस्त करुन यावर स्वतःची मजबूत पकड निर्माण केली आहे. केंद्रात गृहराज्य मंत्री पदासारखं महत्वाचं पद मिळाल्याने वर्तमान खासदार हंसराज अहिर यांना ही पकड आणखी मजबूत करण्यास मदतच झाली आहे. ओबीसी, आदिवासी आणि मुस्लिमांची मते आपसूक पदरात पडत असल्याने वर्षानुवर्षे हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने राखला होता. मात्र गेल्या काही वर्षात ओबीसी आणि आदिवासी समाजात भाजपने मोठा जनाधार तयार केला आहे आणि त्यामुळे आता भाजपचे मतदारसंघावर वर्चस्व निर्माण झाले आहे. विशेषतः 2014 च्या मोदीलाटेनंतर तर भाजपने अगदी ग्रामपंचायत स्तरापर्यंत जिल्ह्यात नंबर वन म्हणून जागा पटकावली आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भाजपने मोदी लाटेचा चंद्रपूर जिल्ह्यात पुरेपूर फायदा करुन घेत लोकसभा क्षेत्रात येणाऱ्या 6 पैकी 5 विधानसभा जागा, चंद्रपूर जिल्हा परिषद आणि चंद्रपूर महानगरपालिका भाजपने एकहाती जिंकली. या सोबतच मूल, बल्लारपूर, वरोरा, वणी नगर परिषद आणि अनेक नगर पंचायतींवर भाजप ने आपला झेंडा फडकावला. मतदारसंघाची रचना चंद्रपूर लोकसभा मतदार संघात चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, वरोरा, चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील वणी, आर्णी विधानसभाक्षेत्रांचा समावेश आहे. हे सहाही मतदारसंघ सध्या भाजप-सेनेच्या ताब्यात आहे. मतदारसंघातील चंद्रपूर, बल्लारपूर, गडचांदूर, वणी, घुग्गुस या भागात कोळसाखाणी आणि इतर उद्योग-धंद्यांची संख्या मोठी असली तरी बहुतांशी मतदारसंघ हा कृषी अर्थव्यवस्थेशी निगडित आहे. एकाच मतदारसंघात एकीकडे व्यापार-उद्योग-रेल्वे यांचे जाळे तर दुसरीकडे जिवती आणि आर्णीच्या भागात धड रस्तेही नाही अशी परिस्थिती आहे. कोळसा घोटाळा उघड करणारे खासदार असा लौकिक असलेले हंसराज अहिर यांचा हा मतदारसंघ 2014च्या मोदी लाटेत पुन्हा एकदा भाजपच्या बाजूने झुकला. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे हंसराज अहिर या मतदारसंघातून 2 लाख 36 हजार 269 एवढे प्रचंड मोठे मताधिक्य घेऊन विजयी झाले. 2014 लोकसभा निवडणूक उमेदवार             पक्ष                एकूण मते  हंसराज अहिर     भाजप               508049 संजय देवतळे      काँग्रेस              271780 वामनराव चटप    आप                 204413 हंसराज कुंभारे    बसपा                 49229 हंसराज अहिर  2 लाख 36 हजार 269 मतांनी विजयी या निवडणुकीतील संभाव्य उमेदवार भाजपमध्ये वर्तमान खासदार हंसराज अहिर हेच लोकसभेचे एकमेव दावेदार आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसमध्ये माजी खासदार नरेश पुगलिया समर्थक आणि विरोधक अशी उभी विभागणी आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस ने कॅबिनेट मंत्री संजय देवतळे यांना लोकसभा उमेदवारी देऊन विधानसभेत उमेदवारी नाकारली होती. हा अनुभव पाहता काँग्रेसकडून विजय वडेट्टीवार आणि सुभाष धोटे यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे. त्यामुळे पुगलिया विरोधक आता जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष असलेल्या मनोहर पाउणकर यांना उमेदवारी द्यावी या साठी लॉबिंग करत आहे. मात्र पाउणकर यांना चंद्रपूर शहर आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पलीकडे राजकारणाचा अनुभव नाही त्यामुळे त्यांची दावेदारी अतिशय किरकोळ मानली जात आहे. हंसराज अहिर यांना तुल्यबळ टक्कर देऊ शकेल असा उमेदवार काँग्रेसच्या अशोक चव्हाण गटाकडे नसल्यामुळे अखेर माजी खासदार नरेश पुगलिया हेच काँग्रेसचे उमेदवार ठरण्याची दाट शक्यता आहे. या सोबतच सामाजिक कार्यकर्त्या पारोमिता गोस्वामी या विदर्भवादी पक्षांच्या "विदर्भ निर्माण महामंच" तर्फे लोकसभेत उतरण्याची शक्यता आहे. वंचित-बहुजन विकास आघाडी ने सध्या आपला उमेदवार घोषित केला नसला तरी या पक्षाची उमेदवारी दलित-मुस्लिम मतदारांसाठी एक नवीन पर्याय ठरु शकतो आणि यामुळे काँग्रेसच्या पदरात आपसूक पडू शकणाऱ्या दलित-मुस्लिम मतांमध्ये मोठं खिंडार पडू शकते. सेना-भाजप युती न झाल्यास हंसराज अहिरांना तगडी टक्कर भाजप आणि शिवसेना यांच्यात जर युती झाली नाही तर शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर हे देखील लोकसभेच्या मैदानात उतरू शकतात. बाळू धानोरकर आणि हंसराज अहिर यांच्यात जुना राजकीय संघर्ष आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या संघर्षाला आणखी धार चढेल. नरेश पुगलिया यांच्या प्रमाणेच धानोरकर देखील साम-दाम-दंड-भेद याबाबतीत हंसराज अहिर यांना तगडी टक्कर देणारे उमेदवार आहेत. जिल्हात सर्वाधिक संख्येने असलेल्या कुणबी मतदारांवर बाळू धानोरकर यांची भिस्त असेल. भाजपसाठी धानोरकर यांची उमेदवारी त्यामुळे डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसने नरेश पुगलिया यांना उमेदवारी दिल्यास हंसराज अहिर यांना एकगठ्ठा मिळणारी उत्तर भारतीय, बंगाली आणि तेलगू भाषिकांच्या मतांत देखील मोठी विभागणी होण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षात नरेश पुगलिया समर्थक आणि विरोधक अशे दोनच गट आहे आणि हेच गट भाजप ला आव्हान देण्यापेक्षा एकमेकांना संपवण्यातच गेल्या अनेक वर्षांपासून धन्यता मानतात. आगामी लोकसभा निवडणुकीत देखील हीच गटबाजी काँग्रेस पुढील सर्वात मोठी डोकेदुखी ठरणार आहे. काँग्रेस प्रमाणे भाजपमध्ये उघड संघर्ष नसला तरी हंसराज अहिर आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात वर्चस्वाचे शीतयुध्द सर्वश्रुत आहे. त्यामुळे सुधीर मुनगंटीवार हे हंसराज अहिर यांना लोकसभेत किती मदत करणार यावर भाजपच्या विजयाचं गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. हंसराज अहिरांच्या खासदारकीची चौथी टर्म  विद्यमान खासदार हंसराज अहिर यांची ही खासदारकीची चौथी टर्म आहे. केंद्रापासून तर जिल्हापरिषदेपर्यंत भाजपची एकहाती सत्ता आहे. तरीही वनजमिनीचे आणि जबरानजोत धारकांचे प्रश्न, सिंचनाचा अभाव, स्थानिकांच्या हाताला रोजगार देण्याचे मुद्दे, प्रदूषण, जमीन अधिग्रहण झाल्यावर शेतक-यांची आर्थिक मोबदला आणि नोकरी देतांना होणारी फसवणूक यावर उत्तरे शोधणे खासदारांना कठीण झाले आहे. आतापर्यंतच्या कार्यकाळात लोकांच्या नजरेत भरेल असा एकही मेगा प्रोजेक्ट मतदारसंघात आणण्यात हंसराज अहिर यांना अपयश आलय. मात्र लोकांसोबत सततचा असलेला जनसंपर्क ही खासदार हंसराज अहिर यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. केंद्रात मंत्री असून देखील मतदारक्षेत्रात रिचेबल असणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख आहे. लोकांच्या प्रश्नावर कायम संघर्ष करणारा लोकप्रतिनिधी अशी प्रतिमा निर्माण करण्यात अहिर यशस्वी ठरले आहे. मात्र अहिर यांची ही प्रतिमा शेतकऱ्यांमध्ये असलेल्या सार्वत्रिक रोषाला किती प्रमाणात सौम्य करू शकेल यावर मतदारसंघातील विजयाचं चित्र स्पष्ट होईल. गल्ली पासून दिल्ली पर्यंतची सत्ता भाजपच्या हातात दिल्यावर वर्षानुवर्षे आ वासून उभे असलेले मतदारसंघातील प्रश्न खरच सुटले आहे का याचं उत्तर मतदार निकालातून देणार आहेत. संबंधित मतदारसंघांचा आढावा जालना लोकसभा मतदारसंघात दानवे विरुद्ध खोतकर यांच्यात रणसंग्राम! अकोला लोकसभा : प्रकाश आंबेडकरांचं राजकीय भवितव्य ठरणार मावळ लोकसभा : शिवसेनेच्या हॅटट्रिकला पार्थ पवारांचं आव्हान? दिंडोरी लोकसभा यंदा भाजपसाठी जड जाणार? राष्ट्रवादीचेही तगडे आव्हान पालघर लोकसभेसाठी रस्सीखेच; शिवसेना, भाजपची प्रतिष्ठा पणाला सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभेसाठी राऊत आणि राणे यांच्यात प्रमुख लढत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget