एक्स्प्लोर
चंद्रकांत पाटलांच्या नव्या फॉर्म्युल्यामुळे शिवसेना गॅसवर?
चंद्रकांत पाटील यांनी मात्र 135-135 असं शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचं नवं सूत्र सांगितलं, तर 18 जागांवर मित्रपक्ष निवडणूक लढण्याचं ठरलं.

मुंबई : भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेसाठी युतीच्या जागावाटपाचा नवा फॉर्म्युला सांगितल्यामुळे शिवसेना नाराज असल्याचं चित्र आहे. मित्रपक्षांना दिलेल्या 18 जागा या भाजपच्याच चिन्हावर लढवल्या जाव्या, असा भाजपचा प्लॅन असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपच्या पदरात अधिक जागा मिळत असल्यावर शिवसेनेला आक्षेप आहे.
शिवसेना आणि भाजप यांनी लोकसभा निवडणुकांपूर्वीच आगामी दोन्ही निवडणुकांसाठी अभेद्य युती केली होती. महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी शिवसेना 144 आणि भाजप 144 जागा लढवेल, या फॉर्म्युल्याप्रमाणे जागावाटप करण्याच्या अटीवरच युती झाली होती.
Chandrakant Patil | चंद्रकांत पाटील मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीला | मुंबई
चंद्रकांत पाटील यांनी मात्र 135-135 असं शिवसेना-भाजपच्या जागावाटपाचं नवं सूत्र सांगितलं, तर 18 जागांवर मित्रपक्ष निवडणूक लढण्याचं ठरलं. मित्रपक्षांना दिलेल्या 18 जागा या भाजपच्याच चिन्हावर लढवल्या जाव्या, असा भाजपचा प्लॅन असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे 135 आणि 153 असा नवा फॉर्म्युला तयार होईल. चंद्रकांत पाटील यांच्या नव्या दाव्याने युतीत वाद निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे.
शिवसेना यासंदर्भात लवकरच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चा करुन लोकसभा निवडणुकीपूर्वी युतीत झालेल्या कराराची आठवण करुन देणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत एकत्र लढलेले शिवसेना-भाजप विधानसभेला विभक्त झाले होते. त्यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत महाआघाडीला क्लीन स्वीप देणारी महायुती विधानसभा निवडणुकांपूर्वी पुन्हा तुटणार तर नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
