एक्स्प्लोर

'मैंने बनाया ये गुजरात' पंतप्रधान मोदींचा गुजरातसाठी नवा नारा; भाजपला फायदा की नुकसान? काय सांगतोय सर्वे

Gujarat Election ABP C-Voter Survey : मागील 25 वर्षांपासून भाजप गुजरातमध्ये सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेय.

Gujarat Election ABP C-Voter Survey : गुजरात विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. भाजप, आप आणि काँग्रेससह सर्वच पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. एक आणि पाच डिसेंबर रोजी गुजरातमध्ये मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील लोकांचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. एबीपी न्यूजसाठी सी-वोटरने साप्ताहिक सर्व्हे केला आहे. गुजरातमधील 2,666 जणांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. सर्व्हेमध्ये मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के इतका आहे. 

सी वोटरने गुजरातमधील जनतेच्या मनात काय आहे? हे जाणून घेण्यासाठी लोकांना प्रश्न विचारला. 'मैंने बनाया ये गुजरात' पंतप्रधान मोदींचा या नाऱ्याचा भाजपला फायदा होईल की नुकसान? असा प्रश्न सर्व्हेत विचारण्यात आला होता. यामध्ये गुजरातमधील मतदारांनी आपलं मत मांडलेय. तब्बल 48 टक्के लोकांना या नाऱ्याचा भाजपला फायदा होईल, असं वाटतेय. तर 42 टक्के लोकांच्या मते, या नाऱ्यामुळे भाजपला नुकसान होईल. तर 10 टक्केंच्या मते या नाऱ्याचा कोणताही परिणाम होणार नाही. 

'मैंने बनाया ये गुजरात' पंतप्रधान मोदींचा गुजरातसाठी नवा नारा; भाजपला फायदा की नुकसान? 
स्रोत- सी वोटर 

फायदा- 48%
नुकसान- 42%
कोणताही परिणाम नाही- 10% 

मागील 25 वर्षांपासून भाजप गुजरातमध्ये सत्तेत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिलेय.  2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने गुजरात मॉडलचा प्रचार करत मते मागितली होती. 2014 पासून नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून देशाचं काम पाहत आहेत. गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मैंने यह गुजरात बनाया है’ हा नारा दिलाय. 

दोन टप्प्यात मतदान - 
गुजरातमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यांत 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत 93 जागांसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच, 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, भाजपसाठी दोन्ही विधानसभा निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत.  

38 नव्या चेहऱ्यांना संधी -
गुजरात उमेदवारांची यादी जाहीर करताना भाजपनं 38 विद्यमान आमदारांची तिकिटे कापली आहे. तर 69 जणांना पुन्हा संधी दिली आहे. म्हणजेच पहिल्या यादीमध्ये भाजपनं 38 नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. 

टीप- सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे साप्ताहिक सर्वेक्षण केले आहे. यासाठी गुजरातमध्ये 2,666 लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange on Santosh deshmukh : संतोष देशमुखांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण, जरांगे काय म्हणाले?
MVA News : काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेमुळे मविआत नाराजीनाट्य, उद्धव ठाकरे, शरद पवारांची नाराजी
Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबवलाय, गृह खात्याने थांबवला की अन्य कोणी थांबवला हे बघितलं पाहिजे; खासदार बजरंग सोनवणेंची मागणी
KL Rahul: शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
शिकाऱ्यांचीच शिकार होऊ लागली? टीम इंडियाचा कॅप्टन केएल राहुल वनडे सिरीजपूर्वी काय काय म्हणाला?
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
राजू शेट्टींसह 80 जणांची कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून 302 प्रकरणात निर्दोष मुक्तता
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
SIP : 20 हजार रुपये पगार मिळतो, 4000 रुपयांच्या गुंतवणुकीनं 1.38 कोटींचा फंड कसा जमा करायचा?     
IND vs SA : आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत रोहित- यशस्वी सलामीला येणार? कॅप्टन केएल राहुल 'या' स्थानावर फलंदाजीला येणार, संभाव्य प्लेईंग XI
केएल राहुलचं ठरलं, पहिल्या वनडेत या स्थानावर फलंदाजी करणार, रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार? 
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
तेलंगणाहून निघालेले दाम्पत्य बेपत्ता, विहिरीत आढळली कार; ग्रामस्थांची गर्दी, पोलिस घटनास्थळी
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Gold Rate : सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Embed widget