Borivali Vidhan Sabha constituency: बोरिवली विधानसभेत भाजपच्या आयात उमेदवाराने बाजी मारली, संजय उपाध्याय यांचा विजय
Borivali Vidhan Sabha constituency: बोरिवली विधानसभा मतदारसंघातील लढतीचे अपडेटस् आणि निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Borivali Vidhan Sabha constituency: मुंबईतील भाजपच्या बालेकिल्ल्यांपैकी एक असणाऱ्या बोरिवली विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षांनी प्रथमच रंजक राजकीय परिस्थिती निर्माण झाली होती.. भाजपचे गोपाळ शेट्टी यांनी अनेक वर्षे प्रतिनिधित्व केलेला बोरिवली विधानसभा मतदारसंघ भाजपचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गोपाळ शेट्टी खासदार झाल्यानंतर भाजपचे सुनील राणे 2019 मध्ये बोरिवलीचे आमदार होते. बोरिवली मतदारसंघावर 1990 पासून भाजपचे वर्चस्व राहिले होते.
मात्र, यंदा भाजपने बोरिवली मतदारसंघातून बाहेरुन आलेल्या संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. गोपाळ शेट्टी या मतदारसंघातून लढण्यासाठी अडून बसले होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्जही भरला होता. मात्र, भाजप नेतृत्त्वाने कशीबशी त्यांची समजूत काढली होती आणि गोपाळ शेट्टी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता. मात्र, तरीही बोरिवलीत अजूनही भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याची चर्चा आहे. याचा फटका महायुतीचे उमेदवार संजय उपाध्याय यांना बसू शकतो, अशी चर्चा होती. त्यांच्याविरोधात ठाकरे गटाचे संजय भोसले आणि मनसेचे कुणाल माईणकर रिंगणात होते. भाजपमधील अंतर्गत नाराजी मतपेटीत परावर्तित झाली तर बोरिवलीत मोठा उलटफेर पाहायला मिळण्याची शक्यता होती. मात्र, अटीतटीच्या वाटणाऱ्या लढाईत अखेर भाजपच्या संजय उपाध्याय यांनी बाजी मारली आहे.