एक्स्प्लोर
कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपाचा सपशेल पराभव
मतदारांनी आम्हाला दिवाळीची भेट दिली आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के शिवकुमार यांनी व्यक्त केली. शिवाय 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-जेडीएस आघाडीला 20 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
कर्नाटक : कर्नाटकमधील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात कॉंग्रेस-जेडीएस आघाडीला घवघवीत यश मिळाले आहे. एकूण तीन लोकसभा आणि दोन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या होत्या. त्यात कॉंग्रेस-जेडीएस आघाडीला दोन लोकसभा आणि दोन विधानसभा जागांवर यश मिळाले आहे तर भाजपाला फक्त एकच लोकसभेची जागा जिंकता आली आहे.
मतदारांनी आम्हाला दिवाळीची भेट दिली आहे, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डी.के शिवकुमार यांनी व्यक्त केली. शिवाय 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-जेडीएस आघाडीला 20 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा दावाही त्यांनी केला आहे.
लोकसभा पोटनिवडणूक निकाल
शिवमोंगा: शिवमोंगा लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे व्हीव्हीई राघवेंद्र हे विजयी झाले आहेत. त्यांनी जेडीएसच्या मधु बंगरप्पा यांना हरवलं आहे. राघवेंद्र माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बीएस येडियुरप्पा यांचे पुत्र आहेत. 2014च्या निवडणुकीत बीएस येडियुरप्पा यांनी विजय मिळवला होता. मात्र यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांनी राजीनामा दिला.
बेल्लारी: बेल्लारी या मतदारसंघातून कॉंग्रेसचे व्हीएस उगरप्पा यांनी मोठ्या फरकाने भाजपाच्या उमेदवाराला पराभूत केलं आहे. पूर्वी हा मतदारसंघ भाजपाचे बी श्रीरामुलू यांच्याकडे होता. मात्र त्यांनीही विधानसभा निवडणुकीच्या वेळी राजीनामा दिला होता.
मांड्या: मांड्या लोकसभेच्या जागेवर जेडीएसचे एलआर शिमरामेगौड़ा यांनी विजय मिळवला आहे. त्यांनी भाजपाच्या डॉ. सिद्धारामय्या यांना पराभूत केलं आहे. ही जागा पूर्वीही जेडीएसकडेच होती.
विधानसभा निवडणुकीचा निकाल
जामखंडी: जामखंडी मतदारसंघातून कॉंगेसचे आनंद सिद्दू न्यामागौडा यांनी भाजपाचे के श्रीकांत कुलकर्णी सुबराव यांना हरवलं आहे. ही जागा सिद्धू न्यामगौडा यांच्या निधनानंतर रिक्त झाली होती. त्यानंतर त्यांचे चिरंजीव आनंद यांना कॉंगेसकडून तिकीट देण्यात आलं होतं.
रामनगर: रामनगरच्या जागेवर जेडीएसच्या अनिता कुमारस्वामी यांनी 109137 मतांनी भाजपच्या एल चंद्रशेखर यांना पराभूत केलं आहे. 2018 च्या निवडणुकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी इथून विजय मिळवला होता. दोन जागांवर विजय मिळाल्यामुळे त्यांनी रामनगर जागेचा राजीनामा दिला होता. अनिता कुमारस्वामी या मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या पत्नी आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement