एक्स्प्लोर

राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

आपल्यावर अन्याय झाला हे खरं आहे, त्यासाठी माझा गुन्हा काय हे मी पक्षाला विचारणा करणार असल्याचंही खडसे म्हणाले.

जळगाव : भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. शिवाय, राष्ट्रवादीचे नेते एबी फॉर्म घेऊन उमेदवारीसाठी घरी आल्याचा खुलासाही खडसेंनी केला. भुसावळ येथे भाजप उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. आपल्यावर अन्याय झाला हे खरं आहे, त्यासाठी माझा गुन्हा काय हे मी पक्षाला विचारणा करणार असल्याचंही खडसे म्हणाले. पण ज्या पक्षाने मला मंत्री बनवलं, विरोधी पक्षनेता बनवलं, संपूर्ण महाराष्ट्राला माझी ओळख दिली, त्या पक्षाला मी सोडून जाणं हे माझ्या मनाला न पटणार होत असं सांगताना एकनाथ खडसे म्हणाले. मुक्ताईनगर येथे भाजपने एकनाथराव खडसे यांचे तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे याना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने आपल्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावत, सेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील याना आपला पाठिंबा दर्शविला आहे. एखाद्या राष्ट्रीय पक्षाला आपला उमेदवार माघारी घ्यावा लागून एका अपक्षाला पाठिंबा द्यावा लागतो यावरुन मुक्ताई नगरमध्ये  राष्ट्रवादी पक्षाची किती दयनीय अवस्था झाली आहे, हे यावरुन लक्षात येत असल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. तसेच माझ्या मुलीच्या उमेदवारी विरोधात उभ्या असलेल्या अपक्ष बंडखोर उमेदवारास शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने पाठिंबा द्यावा अशा नेत्याला राष्ट्रीय नेता म्हणावे का?, असा सवाल करीत खडसे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. VIDEO | नव्या पिढीसाठी मला तिकीट नाकारलं : एकनाथ खडसे | एबीपी माझा
खडसे यांना उमेदवारी न देण्यामागची प्रमुख कारणं  ही असू शकतात 
  •  एकनाथ खडसेंचे उपद्रवी मूल्य पक्षसंघटना आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरले होते.
  • 'विरोधी पक्ष नेता असतांना शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी शरद पवारांचं नाव मला तरी आढळलं नव्हतं' हे खडसेंनी केलेलं ताजं वक्तव्य पक्षश्रेष्ठींच्या चांगलंच जिव्हारी लागलं होतं.
  • खडसेंना या विधानसभेत पुन्हा संधी दिली तर पुढच्या सरकारमध्ये त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबतच्या चर्चा आणि बातम्या सतत येत राहणार, जी मुख्यमंत्र्यांसाठी डोकेदुखी ठरू शकेल.
  • सभागृहात ऑन रेकॉर्ड खडसे सरकारचे वाभाडे काढत आणि पक्षाला सतत तोंडघशी पाडत होते.
  • खडसेंनी सभागृहाबाहेर केलेली टीका किंवा पक्षविरोधी वक्तव्य एक वेळेस दुर्लक्षित करता आली असती पण सभागृहाच्या पटलावर काह विषय ऑन रेकॉर्ड आणणं सरकारसाठी जास्त अडचणीचे आणि नामुष्कीचे ठरत होते
  • सर्वात महत्वाचं म्हणजे खडसेंना उमेदवारी डावलून पक्षातील इतर उपद्रवी नेत्यांना एक कडक मेसेज देण्याचा पक्षश्रेष्ठींचा प्रयत्न आहे.
Eknath Khadse | भाजपमध्ये येणारे साधुसंत नाहीत : एकनाथ खडसे | जळगाव | ABP Majha संबंधीत बातम्या : एकनाथ खडसेंऐवजी रोहिणी यांना उमेदवारी, कोण आहेत रोहिणी खडसे? एकनाथ खडसेंना उमेदवारी का डावलली?

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Embed widget