एक्स्प्लोर

भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भात कुणा-कुणाची वर्णी?

भाजपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना संधी दिलीय.

BJP First candidate list for Maharashtra Assembly election 2024 :विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. अशातच साऱ्यांना उत्सुकता लागून राहिलेल्या उमेदवारांच्या नावाची अखेर आज भारतीय जनता पक्षाने घोषणा केली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी भाजपने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या मुलीला उमेदवारी  जाहीर झाली आहे. 

पहिल्या यादीत एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर

विधानसभा निवडणुकांसाठी (VidhanSabha Election) भाजपकडून (BJP) पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 99 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली असून 13 महिलांना भाजपकडून संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना नागपूर जिल्ह्याच्या कामठी  कामठी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीमध्ये 288 जागांच्या वाटपावर चर्चा चालू आहे. जवळपास सर्वच जागांवरील चर्चा निकाली लागली आहे. असे असताना आता भाजपाने एकूण 99 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तुलनेने सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजप महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे.

पहिल्या यादीत विदर्भात विदर्भात कुणा-कुणाची वर्णी?

  • कामठी -चंद्रशेखर बावनकुळे
  • नागपूर पश्चिम - देवेंद्र फडणवीस
  • नागपूर दक्षिण - मोहन मते
  • नागपूर पूर्व - कृष्ण खोपडे
  • चिखली -श्वेता महाले
  • खामगाव - आकाश फुंडकर
  • अकोला पूर्व - रणधीर सावरकर
  • धामगाव रेल्वे - प्रताप अडसद
  • अचलपूर - प्रवीण तायडे
  • हिंगणघाट - समीर कुणावार 
  • वर्धा - पंकज भोयर 
  • हिंगना - समीर मेघे 
  • तिरोरा - विजय रहांगडाले 
  • गोंदिया - विनोद अग्रवाल 
  • बल्लारपूर - सुधीर मुनगंटीवार 
  • चिमूर - बंटी भांगडिया 
  • वाणी - संजीवरेड्डी बोडकुरवार 
  • रालेगाव - अशोक उडके 
  • यवतमाळ - मदन येरवर 

महाराष्ट्रातील उर्वरित उमेदवार

  • शहादा - राजेश पाडवी
  • नंदूरबार- विजयकुमार गावीत
  • धुळे शहर -अनुप अग्रवाल
  • सिंदखेडा - जयकुमार रावल
  • शिरपूर - काशीराम पावरा
  • रावेर - अमोल जावले
  • भुसावळ - संजय सावकारे
  • जळगाव शहर - सुरेश भोळे
  • चाळीसगाव - मंगेश चव्हाण
  • जामनेर -गिरीश महाजन
  • जळगाव (जामोद) - संजय कुटे
  • देवली - राजेश बकाने
  • अमगांव - संजय पुरम
  • आर्मोली - कृष्णा गजबे
  • किनवट - भीमराव केरम
  • भोकर - क्षीजया चव्हाण
  • नायगाव - राजेश पवार
  • मुखेड - तुषार राठोड
  • हिंगोली - तानाजी मुटकुले
  • जिंतूर - मेघना बोर्डीकर
  • परतूर - बबनराव लोणीकर
  • बदनापूर -नारायण कुचे
  • भोकरदन -संतोष दानवे
  • फुलंब्री - अनुराधा चव्हाण
  • औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
  • गंगापूर - प्रशांत बंब
  • बगलान - दिलीप बोरसे
  • चंदवड - राहुल अहेर
  • नाशिक पुर्व - राहुल ढिकाले
  • नाशिक पश्चिम - सीमाताई हिरे
  • नालासोपारा - राजन नाईक
  • भिवंडी पश्चिम - महेश चौघुले
  • मुरबाड - किसन कथोरे
  • कल्याम पूर्व - सुलभा गायकवाड
  • डोंबिवली - रवींद्र चव्हाण
  • ठाणे - संजय केळकर
  • ऐरोली - गणेश नाईक
  • बेलापूर - मंदा म्हात्रे
  • दहिसर - मनीषा चौधरी
  • मुलुंड - मिहिर कोटेचा
  • कांदिवली पूर्व - अतुल भातखलकर
  • चारकोप - योगेश सागर
  • मालाड पश्चिम - विनोद शेलार
  • गोरेगाव - विद्या ठाकूर
  • अंधेरी पश्चिम - अमित साटम
  • विले पार्ले - पराग अलवणी
  • घाटकोपर पश्चिम - राम कदम
  • वांद्रे पश्चिम - आशिष शेलार
  • सायन कोलीवाडा- तमिल सेल्वन
  • वडाळा - कालिदास कोळंबकर
  • मलबार हिल - मंगलप्रभात लोढा
  • कुलाबा - राहुल नार्वेकर
  • पनवेल - प्रशांत ठाकूर
  • उरन - महेश बाल्दी
  • दौंड- राहुल कुल
  • चिंचवड - शंकर जगताप
  • भोसरी -महेश लांडगे
  • शिवाजीनगर - सिद्धार्थ शिरोले
  • कोथरुड - चंद्रकांत पाटील
  • पर्वती - माधुरी मिसाळ
  • शिर्डी - राधाकृष्ण विखे पाटील
  • शेवगाव - मोनिका राजले
  • राहुरी शिवाजीराव कर्डिले
  • श्रीगोंदा - प्रतिभा पाचपुते
  • कर्जत जामखेड - राम शिंदे
  • केज - नमिता मुंदडा
  • निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर
  • औसा - अभिमन्यू पवार
  • तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील
  • सोलापूर शहर उत्तर - विजयकुमार देशमुख
  • अक्कलकोट - सचिन कल्याणशेट्टी
  • सोलापूर दक्षिण - सुभाष देशमुख
  • मान -जयकुमार गोरे
  • कराड दक्षिण - अतुल भोसले
  • सातारा - शिवेंद्रराजे भोसले
  • कणकवली - नितेश राणे
  • कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक
  • इचलकरंजी - राहुल आवाडे
  • मिरज - सुरेश खाडे
  • सांगली - सुधीर गाडगीळ 

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shaina NC on Vidhan sabha Result | विजय आपलाच होणार, शायना एनसींना विश्वास ABP MajhaAmol Mitkari on Vidhan Sabha Result | अजित पवारांचा पराभव झाला तर आव्हाडांचा गुलाम म्हणून काम करेलKisse Pracharache : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?Kisse Pracharache Seg 03 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget