एक्स्प्लोर
भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा
भाजपने केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. लातूरमध्ये सुधाकर राव शृंगारे, तर अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाकीच्या 14 जागांवर विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीला अखेर मुहूर्त सापडला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या 184 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा यामध्ये करण्यात आली असून 14 विद्यमान खासदारांनाच पुन्हा संधी देण्यात आली आहे.
भाजप महाराष्ट्रात 25 जागा लढवणार आहे. भाजपने केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. लातूरमध्ये सुधाकरराव शृंगारे, तर अहमदनगरमधून डॉ. सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाकीच्या 14 जागांवर विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे.
सुधाकर शृंगारे हे वडवळ-नागनाथ गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. सुधाकर शृंगारे बौद्ध समाजाचे असून व्यवसायाने बिल्डर आहेत. शिवाय ते पैशांनी प्रबळ उमेदवार असल्याचं कळतं.
तर सुजय विखे पाटील नुकतेच काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झाले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे ते पुत्र आहेत.
भाजपचे महाराष्ट्रातील उमेदवार
नंदुरबार - हीना गावित
धुळे - सुभाष भामरे
रावेर- रक्षा खडसे
अकोला - संजय धोत्रे
वर्धा - रामदास तडस
नागपूर - नितीन गडकरी
गडचिरोली-चिमुर - अशोक नेते
चंद्रपूर- हंसराज अहिर
जालना - रावसाहेब दानवे
भिवंडी - कपिल पाटील
मुंबई उत्तर - गोपाळ शेट्टी
मुंबई उत्तर मध्य - पूनम महाजन
अहमदनगर - सुजय विखे पाटील
बीड - डॉ. प्रीतम मुंडे
लातूर - सुधाकरराव शृंगारे
सांगली - संजयकाका पाटील
भाजप मुंबईतील सहापैकी तीन जागांवर निवडणूक लढवणार आहे. मात्र किरीट सोमय्या खासदार असलेल्या ईशान्य मुंबई मतदारसंघ वगळता इतर जागांवरील उमेदवारांची घोषणा झाली. शिवसेनेकडून सोमय्यांच्या नावाला विरोध असल्यामुळे सोमय्यांबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची चर्चा आहे.
सोलापुरात सुशीलकुमार शिंदे, बारामतीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात कोणते उमेदवार द्यायचे, याबाबत अद्याप भाजपचा निर्णय झालेला दिसत नाही. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीकडून माढ्याचा तिढा सुटत नसल्यामुळे भाजप त्याठिकाणीही आस्ते कदम घेताना दिसत आहे.
भाजपचे विद्यमान खासदार असलेल्या 'या' जागांचे उमेदवार अद्याप घोषित नाहीत
ईशान्य मुंबई - किरीट सोमय्या
दिंडोरी - हरिश्चंद्र चव्हाण
सोलापूर - शरद बनसोडे
जळगाव - अशोक पाटील
भाजपने केवळ अहमदनगर आणि लातूरच्या उमेदवारांमध्ये बदल केले आहेत. सुजय विखे यांच्या भाजपप्रवेशानंतर नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधी यांचा पत्ता कट होणं निश्चित मानलं जात होतं. तर लातूरमधून विद्यमान खासदार सुनील गायकवाडांनाही दुसरी संधी नाकारली आहे. लातूरचे उमेदवार सुधाकर शृंगारे हे वडवळ-नागनाथ गटातून जिल्हा परिषदेवर निवडून गेले होते. पालकमंत्री संभाजी पाटील - निलंगेकर यांच्या ते जवळचे मानले जातात.
पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, नितीन गडकरी, राजनाथ सिंह यासारख्या भाजपच्या बड्या नेत्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी हे वाराणसीतून, गृहमंत्री राजनाथ सिंह लखनौमधून तर भाजपाध्यक्ष अमित शाह गांधीनगरमधून निवडणूक लढवणार आहेत. गांधीनगर हा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा मतदारसंघ आहे. त्यामुळे अडवाणींच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. सुषमा स्वराज, उमा भारती यांनी लोकसभा निवडणूक लढणार नसल्याची घोषणा आधीच केली होती.
देशभरातील महत्त्वाचे उमेदवार
वाराणसी - नरेंद्र मोदी
लखनौ - राजनाथ सिंह
नागपूर - नितीन गडकरी
गांधीनगर - अमित शाह
बागपत - डॉ सत्यपाल सिंह
गाजियाबाद - वीके सिंह
गौतम बुद्ध नगर - महेश शर्मा
मथुरा- हेमा मालिनी
अमेठी - स्मृती इरानी
उत्तर कन्नड - अनंत कुमार हेगडे
उन्नाव - साक्षी महाराज
अरुणाचल पूर्व - किरेन रीजीजू
आसनसोल- बाबुल सुप्रियो
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement